लेखसंग्रह

श्री स्वामी समर्थ ह्यांचा प्रभावी मंत्र आणि जप करण्याचे लाभ

Category:

 

‘श्री स्वामी समर्थ’, हा शास्त्र शुद्ध-स्वयंभू आणि स्वत: श्री स्वामी समर्थाची अनुमती असलेला मंत्र आहे. या लेखाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ मंत्राची माहिती आपण पाहणार आहोत.

लेखसंग्रह

सोप्या शब्दांचा मोठा आशय

Category:

 

या ओळी निव्वळ वाचल्या तरी समजतात. कारण ते शब्द समाजाच्या भट्टीतून आले आहेत. कोठेही आढेवेढे, जड शब्द, गूढ भाव असं काही काहीच त्यात नाही. व्यसनांनी ‘बहकलेल्या’ समाजाला त्या गर्तेतून बाहेर काढून देवघराकडे ओढत नेणारा आध्यात्मिक भाव सामान्यांना सहज कळावा, त्या भावांमध्ये तो लोटपोट व्हावा म्हणून शब्द सहज सुचतात. ते वाचा आणि सुधारणा करा…

लेखसंग्रह

विपरीत ज्ञान

Category:

 

ऐक्याचं मुद्दल जर मोडत नसेल आणि भक्तीचा विलास जर करता येत असेल, ऐक्याच्या मुद्दलाला धक्का न लागता म्हणजे अद्वैत अवस्थेला धक्का न लागता जर भक्ती होत असेल तर का न करावी? सागराला बाधा न येता जर त्याच्या वरची लाट त्याच्या वरचा तरंग होऊन मजा जर भोगता येत असेल तर का न भोगावी?

लेखसंग्रह

मंदिर संकल्पना आणि तत्वज्ञान

Category:

 

भारताची जगभर मंदिरांचा देश अशी ओळख आहे. हजारो वर्षांपासून इथे मंदिरे उभारली गेली. काही नगरांमधे अक्षरश: शेकड्यात मंदिरे आहेत. भुवनेश्वर) (ओडिशा). कांचीपुरम (तमिळनाडू), पट्टदकल आणि हम्पी (कर्नाटक), मसरूर (हिमाचल प्रदेश), खजुराहो (मध्य प्रदेश), अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आजही अशी बरीच गावे आणि त्यातील मंदिरे आपण बघू शकतो.

लेखसंग्रह

इच्छाशक्ती

Category:

 

एक प्रसंग आठवतो. पंडित जसराज यांची मैफल ऐकण्याकरिता नामवंत रसिक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जमलेले. पंडितजींची मैफल रंगली. भैरवीला त्यांनी विठ्ठलाचे भजन गाऊन ‘विठ्ठला विठ्ठला’ असा आर्त स्वर लावला. डोळे मिटून गात होते. एकरूप झाले होते

लेखसंग्रह

अर्थव्यवस्थेसाठी हिंदू मंदिरे का महत्त्वाची आहेत?

Category:

 

भारतातील मंदिरे देशातील समृद्ध धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा प्रतिबिबित करतात. भारतामध्ये २ दशलक्षाहून अधिक मंदिरे आहेत, ज्यापैकी अनेक मंदिरे महान श्रद्धा आणि चमत्कारांची ठिकाणे मानली जातात, जगभरातील भक्तांना आकर्षित करतात. आधुनिकतेच्या या युगात आपली संस्कृती, चालीरीती आणि धर्म कसे जपायचे आणि अंगिकारायचे हे आपण भारतीयांना माहीत आहे.

लेखसंग्रह

महर्षी  वाल्मिकी

Category:

 

महाकवी महर्षी वाल्मिकी; ज्यांनी  हिंदू संस्कृतीचा प्राण असलेल्या अजरामर रामायण या महाकाव्याची रचना केलेली आहे. त्यांच्या जन्माच्या तारखेची नोंद कुठेही आढळत नाही.प्राचीन भारतात त्रेता युगातील काळात त्यांचा जन्म व निर्वाण केव्हा झाला, या संबंधी निश्चित माहिती आढळत नाही.

लेखसंग्रह

रामायण – नेतृत्व गुणधर्म

Category:

 

रामायण हा भारताचा गौरवशाली इतिहास आहे. देव, नर, वानर, राक्षस ह्या सर्व मानव जातीच होत्या. त्यांच्यामधील परस्पर संबंध, रावणाची दहशत, त्या दहशतीचा कायमचा नि:पात करण्यासाठी राम जन्माला येण्यापूर्वीच त्याकाळच्या सक्रिय ऋषीवृंदाने केलेला रावण वधाचा संकल्प व ह्यासाठी एकत्र येऊन कोणी कोणी काय काय करायचे या तपशीलासह केलेली योजना व रामाच्या माध्यमातून तो रावणवध प्रत्यक्ष घडवून आणणे हे सर्व त्यावेळच्या जागतिक राजकारणाचे रोमहर्षक वर्णन वाल्मीकिंनी रामायणात केलेले आहे. 

लेखसंग्रह

पौरोहित्य – एक सामाजिक जबाबदादी

Category:

 

 हिंदू समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. हर्शोल्हासित होऊन सण व्रत वैकल्ये आपल्या कुटुंबा सहित किंवा सांघिक शक्ती द्वारा साजरी करणे हा या समाजाचा मुख्य गाभा आहे. हि ब्रत वैकाल्ये जेव्हा आपल्या कुटुंबा बरोबर साजरी केली जातात तेव्हा हा वारसा नकळत पणे आपण आपल्या पुढच्या पिढीला देत असतो, आपसी बंध बळकट करत असतो, हा संस्काराचा आनंदाचा ठेवा कोणत्याही भौतिक सुखापेक्षाही मोठा आहे याचा आदर्श घालून देत असतो

लेखसंग्रह

कौल रघुनाथाचा

Category:

 

कौल रघुनाथाचा हे 27 ओळींचे अत्यंत मौलिक असे वेणास्वामीने रामरायाला मागितलेले पसायदान आहे. कौल म्हणजे आधार, आश्वासन, संमती. या कौल रघुनाथामध्ये वेणास्वामींनी आपल्या कल्पनेने रामरायाच्या राज्याभिषेकाचे वर्णन फार सुंदर शब्दात केले आहे.