फिजी
शहरे आणि गावे

फिजी

Category:

 

फिजीचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Fiji; फिजीयन: Matanitu ko Viti; फिजी हिंदी: फ़िजी गणराज्य) हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक द्वीप-देश आहे. हा देश सुमारे ३३२ बेटे असलेल्या द्वीपसमूहाचा बनला असून ह्यांपैकी ११० बेटांवर लोकवस्ती आहे. व्हिटी लेवू व व्हानुआ लेवू ही येथील प्रमुख बेटे आहेत. फिजीची राजधानी सुवा व्हिटी लेवू बेटावरच वसली आहे व ७५ टक्के रहिवासी सुवा महानगर परिसरामध्ये वास्तव्यास आहेत.

चिली
शहरे आणि गावे

चिली

Category:

 

चिलीचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Chile RepChile.ogg उच्चार (सहाय्य·माहिती)) हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे. चिलीच्या पश्चिमेला व दक्षिणेला प्रशांत महासागर, उत्तरेला पेरू, ईशान्येला बोलिव्हिया तर पूर्वेला आर्जेन्टिना हे देश आहेत. चिलीला ६,४३५ किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे[३]. प्रशांत महासागरातील ईस्टर द्वीप चिलीच्या अधिपत्याखाली येते तर अंटार्क्टिका खंडाच्या १२,५०,००० वर्ग किमी भागावर चिलीने आपला हक्क सांगितला आहे.

चीन
शहरे आणि गावे

चीन

Category:

 

चीन (इंग्रजी: China/ चायना; नवी चिनी चित्रलिपी: 中国; जुनी चिनी चित्रलिपी: 中國; फीनयीन: Zhōngguó; उच्चार: चाँऽऽग्-कुओऽ; अर्थ: जगाच्या मध्यभागी वसलेला देश), अधिकृ्त नाव:- चीनचे जनतेचे प्रजासत्ताक (नवी चिनी चित्रलिपी: 中华人民共和国; जुनी चिनी चित्रलिपी: 中華人民共和國; फीनयीन: Zhōnghuá Rénmín Gònghéguó; उच्चार: चाँऽऽग्-हुआऽ रऽन्-मीऽन् कोंग्-हऽ-कुओऽ) हा आशियातला, जगातला सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. बौद्ध धर्म हा चीनचा प्रमुख धर्म असून देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये ९१% (१२२ कोटी) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे

कोलंबिया
शहरे आणि गावे

कोलंबिया

Category:

 

कोलंबिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्य भागातील एक देश आहे. कोलंबियाच्या पूर्वेला ब्राझिल व व्हेनेझुएला, दक्षिणेला इक्वेडोर व पेरू हे देश, उत्तरेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. इतर बहुसंख्य दक्षिण अमेरिकेतील देशांप्रमाणे कोलंबियाची राष्ट्रभाषा स्पॅनिश आहे. बोगोता ही कोलंबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

कोमोरोस
शहरे आणि गावे

कोमोरोस

Category:

 

कोमोरोस हा हिंदी महासागरातील आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍याजवळील एक द्वीप-देश आहे. कोमोरोस आफ्रिका खंडातील तिसरा सर्वांत छोटा देश आहे. १९१२ ते १९७५ ह्या काळामध्ये कोमोरोस ही फ्रान्स देशाची वसाहत होती. मोरोनी ही कोमोरोसची राजधानी व प्रमुख शहर आहे.

p-4111-Republic of the Congo
शहरे आणि गावे

काँगोचे प्रजासत्ताक (काँगो)

Category:

 

इ.स. १९६० सालापर्यंत काँगो ही फ्रान्सची एक वसाहत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँगोमध्ये लष्करी, कम्युनिस्ट, लोकशाही इत्यादी अनेक प्रकारच्या राजवटींचे प्रयोग झाले. सध्या येथे अध्यक्षीय सरकार असून १९९७ सालापासून डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो हा काँगोचा राष्ट्राध्यक्ष आहे. स्वातंत्र्यापासूनच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेला काँगो यादवी, अराजकता, दोन राजकीय गटांमधील चकमकी इत्यादी कारणांस्तव आजही अशांत व अस्थिर आहे.

p-4109-Democratic Republic of the Congo
शहरे आणि गावे

काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक

Category:

 

काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (किंवा डी.आर. काँगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. काँगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे.

हंगेरी
शहरे आणि गावे

हंगेरी

Category:

 

हंगेरी (स्थानिक मॉज्यॉरोर्शाग) हा मध्य युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. हंगेरीच्या उत्तरेला स्लोव्हाकिया, पूर्वेला युक्रेन व रोमेनिया, दक्षिणेला सर्बिया व क्रोएशिया, नैऋत्येला स्लोव्हेनिया तर पश्चिमेला ऑस्ट्रिया हे देश स्थित आहेत. बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

होन्डुरास
शहरे आणि गावे

होन्डुरास

Category:

 

होन्डुरासचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. होन्डुरासच्या उत्तर व पूर्वेस कॅरिबियन समुद्र, नैऋत्येस प्रशांत महासागर, दक्षिणेस निकाराग्वा तर पूर्वेस ग्वातेमाला व एल साल्व्हाडोर हे देश आहेत. तेगुसिगल्पा ही होन्डुरासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

कोस्टा रिका
शहरे आणि गावे

कोस्टा रिका

Category:

 

कोस्ता रिकाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. कोस्टा रिकाच्या उत्तरेला निकाराग्वा, आग्नेयेला पनामा, पूर्वेला कॅरिबियन समुद्र तर पश्चिम व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे. सान होजे ही कोस्टा रिकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.