जर्मनी
शहरे आणि गावे

जर्मनी

Category:

 

जर्मनी हा जगातल्या औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांपैकी एक देश असून तो युरोप खंडाच्या मध्यभागी आहे. जर्मनीमध्ये भारतासारखी संसदीय लोकशाही पद्धत असून त्याची प्रथम स्थापना १८७१ मध्ये झाली.

डेन्मार्क
शहरे आणि गावे

डेन्मार्क

Category:

 

डेन्मार्क हा उत्तर युरोपामधील व स्कँडिनेव्हियातील एक देश आहे. हा देश अतिशय विकसीत असून या देशाचे दरडोई उत्पन्न अति उच्च आहे. डेन्मार्क हा देश दूध व दूग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. कोपनहेगन ही डेन्मार्क ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

जिबूती
शहरे आणि गावे

जिबूती

Category:

 

जिबूती हा पूर्व आफ्रिकेतील आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. जिबूतीच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिम व दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला सोमालिया देश आहेत.

डॉमिनिका
शहरे आणि गावे

डॉमिनिका

Category:

 

डॉमिनिका हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. हा देश कॅरिबियन समुद्रामध्ये ग्वादेलोपच्या दक्षिणेस व मार्टिनिकच्या उत्तरेस ७५० चौरस किमी क्षेत्रफळाच्या बेटावर वसला असून २००१ साली येथील लोकसंख्या केवळ ७१,२९३ इतकी होती. रुसाउ ही डॉमिनिकाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

p-4093-Cameroon
शहरे आणि गावे

कामेरून

Category:

 

कामेरून हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. इतर आफ्रिकन देशांच्या तुलनेत कामेरूनला राजकीय व सामाजिक स्थैर्य लाभले आहे.

गांबिया
शहरे आणि गावे

गांबिया

Category:

 

गांबिया हा पश्चिम आफ्रिकेतील देश आहे. हा आफ्रिका खंडातील सर्वात छोटा देश आहे. गांबियाच्या पूर्व, उत्तर व दक्षिण दिशांना सेनेगल हा देश तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. गांबिया ह्याच नावाच्या पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या नदीच्या भोवताली हा देश वसला असून बंजुल ही गांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

p-4091-Cambodia
शहरे आणि गावे

कंबोडिया

Category:

 

इसवी सनाच्या अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत बहुतांश इंडोचायना द्वीपकल्पावर राज्य गाजवणाऱ्या सामर्थ्यवान हिंदू-बौद्ध ख्मेर साम्राज्याचे वारसदार राज्य म्हणजेच आजचा आधुनिक कंबोडिया म्हणता येईल.आधुनिक कंबोडियाची राजधानी फ्नोम पेन्ह येथे वसलेली आहे.

p-4095-Canada
शहरे आणि गावे

कॅनडा

Category:

 

कॅनडा हा उत्तर अमेरिकेतील एक प्रमुख देश आहे. रशियानंतर कॅनडा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे.

p-4089-Cabo Verde
शहरे आणि गावे

केप व्हर्दे

Category:

 

काबो व्हर्देचे प्रजासत्ताक (पोर्तुगीज: República de Cabo Verde; लोकप्रिय नाव: केप व्हर्दे) हा पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ १० बेटांच्या द्वीपसमूहावर वसलेला एक देश आहे. हा द्वीपसमूह अटलांटिक महासागरामध्ये पश्चिम आफ्रिकेच्या ५७० किमी पश्चिमेस स्थित आहे. १५व्या शतकापर्यंत पूर्णपणे निर्मनुष्य असलेला हा द्वीपसमूह १४६० साली पोर्तुगीजांनी शोधुन काढला व तिथे वसाहत स्थापन केली. आफ्रिकेतील गुलामांना युरोपामध्ये नेणारी जहाजे येथे थांबा घेत असत. ह्यामुळे १७व्या व १८व्या शतकात केप व्हर्देची भरभराट झाली. १९व्या शतकात गुलागिरीवर बंदी घालण्यात आल्यानंतर केप व्हर्देची अर्थव्यवस्था खालावत गेली. १९७५ मध्ये पोर्तुगालने केप व्हर्देला स्वातंत्र्य मंजूर केले. सध्या केप व्हर्दे संयुक्त राष्ट्रे, आफ्रिकन संघ इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. २०१५ साली ५.२५ लाख लोकसंख्या असलेल्या केप व्हर्देचे बहुसंख्य रहिवासी मिश्र युरोपीय व आफ्रिकन वंशाचे आहे.

मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
शहरे आणि गावे

मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक

Category:

 

मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हा आफ्रिकेच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. ह्याच्या उत्तरेला चाड, ईशान्येला सुदान, पूर्वेला दक्षिण सुदान, दक्षिणेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक व काँगोचे प्रजासत्ताक तर पश्चिमेला कामेरून हे देश आहेत. युबांगी ही काँगो नदीची एक प्रमुख उपनदी मआप्रच्या दक्षिण दिशेने वाहते. बांगुई ही मआप्रची राजधानी व सर्वात मोठे शहर ह्याच नदीवर वसलेले आहे.