हार्ट’फिल
Category:
साहित्य - ललित
March 16, 2022
Category:
साहित्य - ललित
March 16, 2022
Category:
साहित्य - ललितमिलिंद राधिकाला घेऊन, डाॅ. परांजपे यांच्या मॅटर्निटी होममध्ये आला होता. गेल्याच वर्षी त्याचं राधिकाशी, शुभमंगल झालं होतं. वर्षभरातच ‘बाप’ होणार असल्याची गोड बातमी, राधिकाने त्याच्या कानात हळूच सांगितली होती. रिसेप्शनिस्टनं राधिकाचं नाव पुकारल्यावर, दोघेही डाॅक्टरांच्या केबिनमध्ये गेले. डाॅक्टरांनी राधिकाची तपासणी करुन काही गोळ्या व टाॅनिक्सची नावं त्यांच्या असिस्टंटला लिहून द्यायला सांगितली. त्या लेडी असिस्टंटकडे पाहून, मिलिंदला काॅलेजमधील दिवस आठवले. ती असिस्टंट, मीरा ही त्याची मैत्रीण होती. पुढच्याच महिन्यांत डिलीव्हरीची तारीख असल्याने डाॅक्टरांनी राधिकाला काळजी घ्यायला सांगितली.
March 15, 2022
Category:
साहित्य - ललितआज दादांचा २४वा स्मृतिदिन! त्यानिमित्ताने आज तीन स्त्रियांना पुरस्कार दिला जाणार आहे. त्यातील पहिली आहे, सौ. सुप्रिया शेखर शिंदे! हिने शिल्पकलेत प्रावीण्य मिळवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ शिल्प घडवण्यात भारतातील पहिल्या स्त्री शिल्पकाराचा मान मिळवला.
March 14, 2022
Category:
साहित्य - ललित१९९० च्या जून महिन्यातील मुंबईची सकाळ.. आमचं ‘सूडचक्र’ चित्रपटाचं सर्व युनिट ‘किरण’ बंगल्यावर पोहोचलं. दहा वाजता मुहूर्ताचा नारळ वाढवून, शुटींगला प्रारंभ झाला.. लेडी इन्स्पेक्टरच्या गेटअपमध्ये ती कॅमेऱ्यासमोर आली आणि मी पहातच राहिलो.. ती होती चित्रपटाची डॅशिंग नायिका, वर्षा उसगांवकर!!
March 10, 2022
Category:
साहित्य - ललितफिर वही दिल लाया हूॅं’ चित्रपटात, आशा पारेख होती. खांद्यावर गिटार घेऊन, लाल टी शर्ट व पांढऱ्या पॅन्टमधील बागेतून गात चालणारा जाॅय, तरुणींच्या दिलाची ‘धडकन’ झाला. या चित्रपटातील सर्वच गाणी अप्रतिम आहेत. कितीही वेळा ती ऐकली किंवा पाहिली तरी ‘दिला’चं समाधान काही होत नाही.
March 9, 2022
Category:
साहित्य - ललितमाणसाच्या जीवनात स्त्रीचा सहवास सुरु होतो, तो आईपासून. त्यानंतर मावशी, आत्या, काकू, आजी, पणजी, भाची, पुतणी, मुलगी, सून, नात या नात्यांची भर पडत जाते.
जीवनातील प्रत्येक वळणावर स्त्री कोणत्या ना कोणत्या भूमिकेतून त्याला आयुष्यभर भेटतच रहाते. काहीजणी, काही क्षणांसाठी भेटतात तर काही शेवटपर्यंत साथ देतात. मात्र प्रत्येकीची नोंद ही त्यांच्या मनाच्या ‘हार्ड डिस्क’मध्ये झालेली असते. जी कधीही ‘करप्ट’ होत नाही.
March 8, 2022
Category:
साहित्य - ललितगोपाळ देऊसकर यांनी बालगंधर्व रंगमंदिरासाठी, बालगंधर्वांची दोन रूपातील केलेली पूर्णाकृती चित्रे सुप्रसिद्ध आहेत. ही चित्रे करण्यासाठी माॅडेल म्हणून ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते, विवेक यांची निवड केली होती. स्त्री रुपातील रुक्मिणीचा हात चितारताना मऊसुत, गुलाबी रंगाचा पंजा असणारी स्त्री, गोपाळ देऊसकरांना हवी होती. हृदयनाथ मंगेशकरच्या लग्न समारंभात, कॅमल कंपनीच्या मालकांची पत्नी, रजनी दांडेकर हिचा हात पाहिल्यावर गोपाळ देऊसकरांना चित्रासाठी तो योग्य वाटला. ही रजनी, पूर्वाश्रमीची संगीत रंगभूमीचे गायक नट, अनंत वर्तक यांची कन्या होती. तिचा हात पाहून त्यांनी तो हुबेहूब चितारला व चित्राला जिवंतपणा आला.
March 8, 2022
Category:
साहित्य - ललितविकीमध्ये गेलं की, दोन पाठमोरे काॅम्प्युटर ऑपरेटर एकामागे एक बसलेले दिसतात. त्यातील पहिल्याकडे मी पेनड्राईव देतो. तो ‘स्माईल’ देऊन माझी फाईल ओपन करतो. डिझाईन मधील मजकूर वाचतो. कुठे शुद्धलेखन चुकलं असेल तर नजरेस आणून देतो. प्रिंट सोडतो. आत जाऊन प्रिंट आणून देतो. वेळ असेल तर त्याच्या कलेक्शनमधील, काही फोटो पेनड्राईव्हमध्ये लोड करुन देतो. हे सर्व आपुलकीने करणाऱ्या माझ्या मित्राचं नाव आहे. सावंत ‘विकी’!
March 7, 2022
Category:
साहित्य - ललितसर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंतच्या प्रत्येक प्रसंगाला, घटनेला जुळणारी गाणी लतादीदींनी गायलेली आहेत. ती ऐकली की, आपण त्या काळात जाऊन येतो. म्हणूनच त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता शतकानुशतके अबाधित राहील.
March 6, 2022
Category:
साहित्य - ललितचंदेरी दुनियेत कारकिर्द करताना, अनेकजण संपर्कात येतात. मग ते नायक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ कोणीही असू शकतं. त्यांच्याशी पाऱ्यासारखं अलिप्त रहाणं ज्याला जमलं, तोच खरा! अन्यथा जीवनात नैराश्य येतं. दोघींच्याही जीवनात तशा गोष्टी घडलेल्या आहेत. वहिदानं त्या गोष्टींवर पडदा टाकलाय. दिप्ती विसरण्याचा प्रयत्न करतेय.
March 5, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti