विंडो सीट
Category:
साहित्य - ललितआता प्रवासाचे दिवस संपलेले आहेत.. कधी प्रवास केला तर तो खाजगी गाडीने होतो.. तेव्हाही खिडकीतून बाहेर पहाताना पळणारी झाडं, विजेच्या खांबावरील वरखाली होणाऱ्या तारा, एखाद्या पुलावरुन जाताना दिसणारे नदीचे विशाल पात्र, घाटातून गाडी वळताना आपले शरीर शेजारच्या व्यक्तीवर रेलणे हे अनुभवून जुन्या आठवणींना नकळत उजाळा मिळतो व मी गालातल्या गालात हसतो.