भक्ती करावी अंतरंगी (सुमंत उवाच – ६६)
Category:
साहित्य - ललितमी किती देवाचं करतो, मला किती माहित्ये, मी केवढे श्लोक पाठ केले, माझं ज्ञान किती अगाध आहे हे दाखवण्या पेक्षा ते जर आचरणी आणले तर? चमत्कारच होईल.
Category:
साहित्य - ललितमी किती देवाचं करतो, मला किती माहित्ये, मी केवढे श्लोक पाठ केले, माझं ज्ञान किती अगाध आहे हे दाखवण्या पेक्षा ते जर आचरणी आणले तर? चमत्कारच होईल.
Category:
कथा साहित्य - ललितत्या व्यक्तीचे शब्द एखाद्या विषारी बाणासारखे रवींद्रच्या कानात घुसले आणि त्याचा चेहरा पांढरा फिकट पडला. “काय…….”, रवींद्र जोरात किंचाळला ” तो मी होतो……. म्हणजे …….. तो मी होतो की आहे?” रवींद्रने आता काही झालं तरी याच्या तळाशी जायचेच असा निर्धार केला होता.
Category:
कथा साहित्य - ललितरवींद्रची पाण्यातली हालचाल मंद होऊ लागली होती. त्याचा श्वास कमी कमी होत चालला होता. तो वाचवायला आला होता खरा त्या बाळाला, पण पाण्यात उडी मारल्या पासून तो जणू काही स्वप्नातून सत्यात उतरला होता. त्या बाळाला आणि त्या अण्णांच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला त्या काळोखात शोधत होता. पण तो सोडून त्या पुष्करणी मधे बाकी कोणाचंही नामोनिशाण नव्हतं. तो आता स्वतःला वाचवायच्या स्थितीतही नव्हता, त्याचा श्वास खूपच मंद होत होता आणि तो जणू आता जलसमाधी मिळणार या स्थितीत त्या पुष्करणी च्या तळाशी त्या काळोख्या रात्री बुडत होता. तळाशी बऱ्याच वेली होत्या, गाळ बसून झालेला चिखल होता. त्याचे डोळे हळूहळू मिटत होते, हात आणि पाय आता सैल झाल्या सारखे स्तब्ध झाले होते.
Category:
कथा साहित्य - ललितसंध्याकाळी सूर्यास्ताचा समय….. समुद्रावरून वारा प्रचंड वेगाने वहात होता. समुद्रावरचे काठ म्हणजेच सुरुचं बन अक्षरशः त्या वादळी वाऱ्याच्या तडाख्याने हेलकावे खात होतं. थंडीचे दिवस असले तरी आभाळ भरून आलं होतं आणि आता अवकाळी पाऊस पडणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. रवींद्र वाडीत फेरफटका मारत होता. ताई आणि तिचे मिस्टर दुपारी काही कामा निमित्त श्रीवर्धन ला गेले होते. गाडी होती त्यांची बरोबर, त्यामूळे प्रवासाची चिंता नव्हती. रात्रीच्या जेवणात धरू नकोस असे सांगून ताई गेली होती. श्रीवर्धन ला एका आश्रमाला भेट द्यायला ते गेले होते. रविंद्रने त्यांना का? कशासाठी? वगैरे प्रश्न विचारायची तसदी घेतली नव्हतीच, त्याला बरच होतं की ते. त्याला जे कार्य तडीस न्यायचे होते त्यासाठी एकांत गरजेचा होताच त्यामुळे त्याने नुसतं ठीक आहे म्हणत विषय सम्पवला. मी कदाचित मित्राकडे जाईन जेवून झाल्यावर असे कानावर घालून ठेवले. आणि ताईकडे घराची एक किल्ली देऊन ठेवली.
Category:
कथा साहित्य - ललितरवींद्र ने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ताईच्या डोक्यात खोलवर गाडल्या गेलेल्या गोष्टींना चिथावणी देत होती. पुष्करणी, पाणी, भैरोबा, लहानसा जीव या गोष्टींनी तर तिला आतून पूर्णपणे हादरवून टाकले होते. तिच्या डोळ्यांसमोर एकदम ५० वर्षांपूर्वी च्या घडामोडी जशाच्या तश्या धावू लागल्या.
Category:
कथा साहित्य - ललितसकाळचे ७ वाजले तरी रवींद्र अजून उठला नाही हे पाहून ताईने खोलीत जाऊन हाक मारली, तशी “उठतो ग” असे उत्तर तिला ऐकायला आले. आई ला जाऊन ३ दिवस झाले होते. ताई आणि तिचे मिस्टर दिवस कार्य होई पर्यंत तिथेच राहणार होते. दोन्ही काका परत मुंबई ला गेले होते ते दहाव्याला येतो असे सांगूनच. मावसभाऊ बाजूच्या गावातच असल्याने त्याने २ दिवस चक्कर मारली होती. पूर्वी गावात दिवस कार्य असले की तेराव्या दिवशी गाव जेवायचे, पण आता तसे राहिले नव्हते, परिस्थिती बदलली होती. वरची पाखाडी, खालची पाखाडी आता विभागली गेली होती आणि त्यात सुद्धा गावात शिल्लक अशी किती लोकं होती. अर्ध्याहून जास्त शहरात शिकायला, नोकरीला स्थायिक, काही म्हातारी माणसं आणि जी काही तरुण शिल्लक होती त्यातली अर्धी पर्यटनाच्या नादाला लागून दारूच्या नशेत गाडली गेली होती. त्यामुळे आईच्या दिवस कार्याला काही गाव जेवणार नाही हे रवींद्र ला ठाऊक होते.
Category:
साहित्य - ललितपरकीय वेशभूषा आत्मसात करावी जरूर, पण त्याने आपल्या संस्कृतीला बाधा पोचत नाही ना याचा विचार व्हायला हवा.
Category:
कथा साहित्य - ललितअंधार दाटून आला होता, आणि रवींद्र त्या अंधारात चालत जात होता. आजूबाजूला किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र रातकिड्यांचा आवाज कानात घुमत होता तर पायाखालची माती काटे, गवत, लहान खडे यांनी चालायला अडथळा आणत होती. पण रवींद्रचे लक्ष पुढे काळोखात जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या व्यक्तीवर खिळले होते आणि पुसट दिसत असणाऱ्या त्या व्यक्तीच्या मागे तो भान हरपल्या सारखं चालत जात होता. ना त्याच्या हातात टॉर्च किंवा काही दिवा नव्हता, ना त्या पुढे चालत असलेल्या व्यक्तीच्या हातात काही होते, केवळ चंद्राच्या प्रकाशात दिसेल एवढ्याच प्रकाशात ती व्यक्ती चालत होती पण, पायाखालची वाट, ती जागा, त्या व्यक्तीला अगदी तोंडपाठ असल्यासारखी वाटत होती. उलट रवींद्रचे लक्ष त्याच व्यक्ती कडे असल्याने तोच मधे मधे अडखळत होता, त्या व्यक्तीच्या हातात काहीसं असल्यासारखं त्याला दिसलं होत.
Category:
साहित्य - ललितपाणी हे जीवनावश्यक, या पृथ्वी वरचे अमृतचं जणू काही, पण आज त्याचा उपयोग आपण करून घेतोय पण त्याची साठवण? 100% होत्ये का? तर अजिबात नाही.
Category:
कथा साहित्य - ललितरवीने हातातला कप बाजूला ठेवला, “ताई काय बोलत्येस तू? कसला आजार? काय सांगत्येस तू हे”, रवीने ताईच्या खांद्यांना हाताने गदगदा हलवून विचारले, त्याच्या चेहऱ्यावर अशक्य गूढ भाव निर्माण झाले होते पण ताईने आपलं तोंड घट्ट मिटून घेतलं होतं, नकारार्थी मान हलवून ती सांगायचं टाळायचा प्रयत्न करत होती. “प्लिज ताई बोल ना ग, काय झालं होतं तुला? अण्णा मुंबईला काम आहे सांगून गेले होते ते आठवतंय मला चांगलंच, भयानक पाऊस होता तेव्हा, अगदी श्रावणातील ऐन दिवस, इथल्या पुजाऱ्याने भैरोबाच्या आवरातल्या महादेवाच्या मंदिरात असणे गरजेचेच होते, पण पण…. अण्णांनी अचानक एका संध्याकाळी आईला सांगितलं रात्री मुंबई ला जात असल्याचं.
Copyright © 2025 | Marathisrushti