दिनविशेष

चिपको आंदोलनाला आज ४९ वर्ष पूर्ण झाली

Category:

 

जंगलात तब्बल अडीच हजार झाडांचा लिलाव त्यावेळी करण्यात आला. गावातील आंदोलकांनी विरोध केला, तरीही लिलाव झालाच. ठेकेदारांना लोकांच्या विरोधाची कल्पना होती. त्यांनी कार्यकर्त्यांना लोकांची जुनी देणी देण्याच्या निमित्ताने चामोलीत बोलावून घेतले. त्यांच्या गाफीलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांनी गुपचूप रेनीच्या जंगलात मजूर पाठविले. एका छोट्या झाडांची कत्तल करण्यासाठी आलेल्या मजुरांना पाहिलं आणि धावत गावात ही खबर दिली. पण, गावात फक्त १५-२० स्त्रिया आणि काही छोटी मुले होती. पुरुष मंडळींना निरोप कळवून ते परत येईपर्यंत दोन-तीन दिवस लागणार. तोपर्यंत जंगलतोड अटळ होती. हे लक्षात येताच गावातील महिला आपल्या मुलांसह जंगलात आल्या. बायकांसह सगळी लहान मुलं झाडाला चिकटून उभी राहिली.

  March 26, 2022


दिनविशेष

मुंबईचा जावई’ चित्रपटाची बावन्न वर्षे

Category:

 

या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. प्रथम तुज पाहता जीव वेडावला, आज कुणीतरी यावे, कारे दुरावा कारे अबोला, कशी करु स्वागता अशी या चित्रपटात गाणी आहेत. या चित्रपटाचे काही चित्रीकरण गिरगावातील खोताची वाडीतील खंडेराव ब्लॉक येथे झाले होते.

  March 25, 2022


व्यक्ती-परिचय

डॉमिनोज पिझाचा जनक टॉम मोनॅगम

Category:

 

तीन दुकानांची आठवण देणारी तीन टिंबे, तीन डॉट्स डॉमिनोजच्या लाल, निळ्या लोगोवर अवतरली. मुळात सुरुवातीला गडद लाल, निळा व शुभ्र पांढरा रंग वापरण्यामागे लोकांचं लक्ष वेधणं हा हेतू होता. हे तीन रंग खूप प्रामुख्याने दिसतात हे लक्षात घेऊन ते निवडताना तीन दुकानांची आठवण तीन टिंबांसह लोगोवर उमटली.

  March 25, 2022


व्यक्ती-परिचय

वास्तववादी चित्रकार एस. एम. पंडीत

Category:

 

१९३८मध्ये त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात चित्रपटांचे पोस्टर करण्यापासून झाली. मेट्रो गोल्डविन मेयर कंपनीची पोस्टरे त्या वेळी अमेरिकेतून येत असत. ही पोस्टरे इथेच तयार करू शकेल अशा भारतीय चित्रकारांच्या शोधात कंपनी होती. त्यासाठी पंडित यांची निवड झाली. या कामासाठी तैलरंगाऐवजी अपारदर्शक जलरंगांचा (पोस्टर कलर) वापर पंडित यांनी सुरू केला. त्यांची कामे ‘मेट्रो’ सिनेमागृहाच्या शोकेसमध्ये झळकू लागली आणि रसिकांचे आकर्षण ठरू लागली. त्यानंतरच भारतामध्ये हिंदी चित्रपटांसाठीची पोस्टर निर्मिती सुरू झाली.

  March 25, 2022


व्यक्ती-परिचय

पहिली “सिक्रेट रेडीओ सर्विस” चालवण्याऱ्या उषा मेहता

Category:

 

डॉ. राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन आणि पुरुषोत्तम त्रिकमदास यांच्यासह अनेक नेत्यांनी गुप्त काँग्रेस रेडिओला मदत केली. रेडिओ प्रसारणाने गांधी आणि भारतातील इतर प्रमुख नेते यांच्याकडून संदेश पाठविला. अधिकार्यांना रोखण्यासाठी,आयोजकांनी स्टेशन जवळजवळ दररोज स्थानांतरित केले. या रेडिओ स्टेशनवरून इंग्रजांनी सेन्सर केलेल्या सगळ्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत असत. गांधीजींना अटक झालेली आहे, काँग्रेसचे इतर लोक जेलमध्ये आहेत, मेरठमध्ये सैनिकांनी उठाव केला त्यामध्ये 300 सैनिक मारले गेले. अशा अनेक बातम्या त्यावेळी या सिक्रेट रेडिओने लोकांपर्यंत पोहोचवल्या.

  March 25, 2022


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण होर्णेकर

Category:

 

अरुण होर्णेकरांनी आजवर ‘दिवा जळू दे सारी रात’सारख्या मेलोड्रामापासून ‘हैदोस’, ‘भोगसम्राट’सारख्या हिट् ॲ‍ण्ड हॉट नाटकांपर्यंत.. आणि ‘बेकेट’,‘वेटिंग फॉर गोदो’, ‘गिधाडे’ सारख्या ॲ‍टब्सर्ड, प्रश्नयोगिक, तसंच वास्तववादी नाटकांपासून ते ‘सख्खे शेजारी’सारख्या रेव्ह्यू प्रकारातल्या नाटकांपर्यंत सगळ्या पिंड-प्रकृतीची आणि प्रवृत्तीची नाटकं केली आहेत.

  March 25, 2022


व्यक्ती-परिचय

आत्मचरित्रकार मधुकर केचे

Category:

 

केचे ह्यांना आपल्या हयातीत १९८४ ला महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त झाला, १९८५ मधे घाटंजी येथील ३७ व्या विदर्भ साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना बहाल झाले. १९९० ला तेल्हारा येथील मराठी प्राध्यापक परिषदेच्या अध्यक्षपदाची यशस्वी धुरा त्यांनी सांभाळली. तसेच केचे हे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे व महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे सदस्य होते. अमरावती येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते.

  March 25, 2022


दिनविशेष

लॉकडाऊनची दोन वर्षं

Category:

 

कडाऊन करण्याची तीन प्रमुख कारणे होती. पहिले उद्दिष्ट म्हणजे, विषाणूची साखळी तोडणे. साखळी तोडली, तर विषाणूचे पेशीविभाजन रोखले जाईल. दुसरे म्हणजे, बाधित व्यक्तिंमध्ये वाढ झाली, तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तयारी करायला आरोग्य यंत्रणेला अवधी मिळेल आणि तिसरे उद्दिष्ट म्हणजे, मानवी वर्तणुकीवर काम करणे. याचा अर्थ पुरुष, स्त्रिया आणि मुलांना हात धुणे, मास्क घालणे आणि सुरक्षित वावराचे नियम पाळण्याची सवय लावणे.

  March 24, 2022


व्यक्ती-परिचय

WWE मधील ‘द अंडरटेकर’ मार्क कॉलॉवे

Category:

 

पंचविस वर्षापुर्वी मार्कला हा खेळ मुळीच खेळायचा नव्हता. अमेरिकेल्या प्रत्येक उंचपु-या आणि धिप्पाड मुलाचं जे एकमेव स्वप्न असतं तेच त्याचंही होतं – बास्केटबॉल! ह्युस्टन (टेक्सास) मधल्या कॅथरीन आणि फ्रॅंक कॉलॉवे या उच्च मध्यमवर्गीय दाम्पत्याच्या पाच मुलांपैकी मार्क हे शेंडेफळ. बास्केटबॉलचं जीतकं वेड तीतकंच कौशल्यही भारीच.

  March 24, 2022


व्यक्ती-परिचय

जाहिरात निर्माते ऍडगुरु प्रल्हाद कक्कर

Category:

 

१९७७ साली त्यांनी उत्पत्ति फिल्म प्रोडक्शनची स्थापना केली. जाहिरातबाजीत त्यांचा वेगळा ठसा आहे. नव्या उद्योगाला मार्गदर्शन करणे व युवकांना त्यांचा व्यवसाय धंदा करण्यात मदत करण्याचे कार्य सध्या ते करतात.

  March 24, 2022