व्यक्ती-परिचय

पुण्यात वाहतूकव्यवस्थापन करणाऱ्या प्रभाताई नेने

Category:

 

साधारण २००० साली ‘निर्धार’या संस्थेच्या श्रीमती शीला पद्मनाभन यांनी नागरिकांना एक आवाहन केले की, त्यांना स्कूल गेट व्हॉलेंटियर हवेत. कल्पना अशी होती की, शाळा भरताना आणि सुटताना शाळेसमोरील रस्त्यावर हे कार्यकर्ते विद्यार्थ्यांची सुरक्षा सांभाळतील आणि ट्राफिक कंट्रोल करतील. प्रभा नेने या आजींनी आपले नाव त्यासाठी नोंदवले आणि त्यांनी ह्या सेवेस सुरवात केली. सकाळी ७-७.३० वाजता सिंबायोसिस शाळेबाहेर उभ्या राहून बेशिस्त वाहतुकीतून मुलांना सुखरूप शाळेत वा रिक्षेपर्यंत पोहचवणे. प्रसंगी वाहतूक थाबवून मुलांना रस्ता करून देणे हे सुरु झाले.

  May 30, 2022


व्यक्ती-परिचय

प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कृतीचे व्यासंगी संशोधक देवदत्त रामकृष्ण भांडारकर

Category:

 

बादशाह पाचवे जॉर्ज हिंदुस्थान भेटीस ५ डिंसेबर १९११ रोजी आले, त्या वेळी त्यांच्यासाठी एलिफंटा (घारापुरी) बेटाची मार्गदर्शिका देवदत्तांनी तयार केली. अखंड शिळेतून एकसंघ कोरुन काढलेल्या त्रिमुर्ति-मंदिराचे वैशिष्ट्य तीत स्पष्ट केले आहे. देवदत्तांचे अत्यंत महत्त्वाचे संशोधन म्हणजे विदिशा जवळील बीसनगर येथील उत्खनन आणि त्यात सापडलेला ‘खाम्‌ बाबा पिलर’ हा गोलाकार स्तंभ. ग्रीक राजदूत हीलिओडोरस याने आपल्या वासुदेवभक्तीचे आदरचिन्ह म्हणून हा स्तंभ उभारला. तो दोन पोलादी पट्टयांवर उभा आहे. आजूबाजूचे बांधकाम पक्क्या विटांचे, चुनखडीच्या गिलाव्याचे आहे.

  May 30, 2022


दिनविशेष

गोवा राज्य स्थापना दिन

Category:

 

इंग्रज १९४७ मध्ये भारतातून बाहेर गेले. पण पोर्तुगीज त्यांच्या ताब्यातील प्रदेश सोडत नव्हते. अखेर भारतीय लष्कराने दमण, दीव आणि गोवा हा प्रदेश ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत १९ डिसेंबर १९६१ रोजी जिंकला आणि भारतात विलीन केला. केंद्र सरकारने त्यावेळी दमण, दीव आणि गोवा यांना केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा दिला. नंतर ३० मे १९८७ रोजी गोवा या केंद्रशासीत प्रदेशाला भारताच्या घटक राज्याचा दर्जा देण्यात आला पण दमण आणि दीव यांचा केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा कायम ठेवण्यात आला. यामुळे १९ डिसेंबर हा गोवा मुक्ती संग्राम दिन आणि ३० मे हा गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा करतात.

  May 30, 2022


व्यक्ती-परिचय

चित्रकार दीनानाथ दलाल

Category:

 

दलाल १९३८च्या सुमारास बा. द. सातोस्कर यांच्या सागर प्रकाशनासाठी काम करू लागले. मामा वरेरकर यांच्या ‘वैमानिक हल्ला’ या पुस्तकासाठी दलालांनी पहिले मुखपृष्ठ केले. त्याच टिपणात नेमकेपणाने म्हटले आहे, पुस्तकाची मुखपृष्ठे आणि आतील चित्रे म्हणजे, फक्त सजावट नसते, तर पुस्तकाचा आशय दृश्य प्रतिमांनी समृद्ध करणारी, पुस्तकाला व्यक्तिमत्त्व देणारी, पुस्तकाशी संवादी अशी ती नवनिर्मिती असते. याची जाणीव दलालांच्या मुखपृष्ठांनी प्रथम दिली.

  May 30, 2022


व्यक्ती-परिचय

चित्रकार सावळाराम हळदणकर

Category:

 

१९२५ मध्ये त्यांना त्यांच्या मॉहमेडन पिलग्रिम या कॅन्व्हासवरील तैलरंगातील फकिराच्या चित्राला बाँबे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले. त्यांच्या निर्मितीत प्रामुख्याने व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे व पौराणिक विषयांवरील प्रसंगचित्रे यांचा समावेश होतो. जलरंग व तैलरंगया दोन्ही माध्यमांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांतील तंत्रविशिष्ट बारकावेत्यांनी विलक्षण कौशल्याने आपल्या चित्रांतून दर्शविले; पण त्यांनी शुद्ध पारदर्शक जलरंगांत रंगविलेली चित्रे त्यांतील अप्रतिम तंत्रकौशल्यासाठी देश-विदेशात वाखाणली गेली. चित्रांत साधलेले छायाप्रकाशाचे परिणाम, चित्रणासाठी वापरलेल्या कमी-अधिक जाडीच्या रंगछटा व रंगलेपनाचे कौशल्य ही त्यांची शैलीवैशिष्ट्ये जलरंग व तैलरंग या दोन्ही माध्यमांत जाणवतात.

  May 30, 2022


व्यक्ती-परिचय

इतिहास संशोधक डॉ.पांडुरंग पिसुर्लेकर

Category:

 

पिसुर्लेकरांनी या अभिलेखागाराखालील दप्तरखाना सुधारला; त्यातील कागदपत्रे खंडवार लावली आणि त्यासंबंधी सूची व दोन मार्गदर्शिका प्रसिध्द केल्या. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पणजी येथे इतिहास संशोधनकेंद्र स्थापन केले. त्याचे संचालकपद पिसुर्लेकरांकडे होते. गोमांतकातील पहिले हिंदू इतिहास संशोधक असणारे डॉ. पिसुर्लेकर पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेली सर्व ऐतिहासिक कागदपत्रे भारतीय पुराभिलेखागारात आणण्यासाठी आयुष्यभर झटले. पोर्तुगीज दफ्तरातील साडेचारशे वर्षातील सर्व कागदपत्रे अभ्यासून त्यांनी ‘पोर्तुगीज मराठे संबंध’ हा अप्रतिम साधनग्रंथ लिहिला.

  May 30, 2022


दिनविशेष

आंतरराराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस

Category:

 

गिर्यारोहण हा साहसी क्रीडाप्रकार आहे की नाही याबद्दल जगभर जरी वाद सुरु आहे. मात्र निसर्गातील प्रतिकुलतेशी गिर्यारोहणात झुंजल्याशिवाय कोणत्याही शिखर किंवा सुळक्याचा माथा सर करताच येत नाही या वस्तुस्थितीबाबत मात्र कोणाचेही दुमत नक्कीच नाही.

  May 29, 2022


दिनविशेष

भद्रकाली प्रॉडक्शनचा वर्धापन दिन

Category:

 

‘चाकरमानी’ हे ‘भद्रकाली प्रॉडक्शनचं’ पहिलं नाटक होते. त्यानंतर त्यांनी ‘केला तुका झाला माका’, ‘वस्त्रहरण’, ‘घास रे रामा’, ‘पांडगो इलो रे बा इलो’, ‘अफलातून’ ‘रातराणी’ ‘भैया हातपाय पसरी’ यांसारखी ३८ नाटकं केली. ‘भैया हात पाय पसरी’ चे १०१ प्रयोग केले….

  May 29, 2022


व्यक्ती-परिचय

उद्योगमहर्षी शंतनुराव किर्लोस्कर

Category:

 

फ्रेड शुले ह्या जर्मन उद्योजकाने काढलेले उद्गार अतिशय समर्पक आहेत. तो म्हणाला होता, ‘माझ्यासाठी शंतनुराव हे भारतातील क्रमांक दोनचे व्यक्तिमत्त्व आहे. पहिला क्रमांक महात्मा गांधींचा आहे.’

  May 28, 2022


दिनविशेष

आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन

Category:

 

नोकरी करताना वेळ नाही हे पालुपद फक्त स्वत:च्या संदर्भात, बाकी इतरांसाठी धावतपळत ती सगळी कामं करतच असते. एवढंच कशाला, नोकरी करून निवृत्त झाल्यावरसुद्धा ती घरातली सारी कामं स्वत:वर ओढून घेते. इतकी वर्ष माझं तसं घराकडे दुर्लक्षच झालं म्हणत पोळ्या करणा:या बाईला सुटी देते. आपण आहे ना काम करायला, मग कशाला पैसे खर्च करा म्हणत कामच करते. स्वत:वर पैसे खर्च करण्याआधी दहादा विचार करते. स्वत:च्या ‘फिटनेस’साठी तर एक पैसा खर्च करायलाही तयार होत नाही. ती विचार करते, त्यापेक्षा मी घरात थोडं जास्त काम करेन. भाजी आणायला गेल्यावर थोडं जास्त चालायला जाईन. पण हे एवढंच करून ती फिट राहू शकत नाही. त्यासाठी रोज वेगळा वेळ काढून व्यायामच करायला हवा. आणि स्वत:कडे अजिबात दुर्लक्ष न करता स्वत:साठी वेळ काढायलाच हवा.

  May 28, 2022