Puding-300
खाद्ययात्रा

आजचा विषय पुडिंग भाग दोन

Category:

 

जेलीचे एक पाकीट घेऊन त्यावरील सूचनेप्रमाणे जेली बनवावी व फ्रिजमध्ये अर्धवट सेट झाली की त्यात फळांचे काप मिसळून पुन्हा सेट होण्यास फ्रिजमध्ये ठेवावी. अर्धा लिटर दुधाचे कस्टर्ड बनवून गार करून घ्यावे. सेट झालेल्या जेलीवर या गार कस्टर्डचा थर द्यावा. पुन्हा थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून नंतर त्यावर क्रीम पसरून घालावे. नंतर सुक्या चेरीज, डाळिंबाचे दाणे, काजू – बदामाचे काप यापैकी कशानेही आवडीप्रमाणे सजावट करावी.

  January 16, 2017


आजचा विषय मेथी भाग दोन
खाद्ययात्रा

आजचा विषय मेथी भाग दोन

Category:

 

सतलज नदीच्या पाण्यावर पोसलेली, पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील कसूर येथील मेथी उत्तम स्वादाची समजली जाते. या स्थानावरूनच तिला ‘कसुरी मेथी’ हे नाव मिळालं. भारतातील पंजाब राज्यातही तिचं उत्पादन होतं. तिची वाळवलेली पानं ‘कसुरी मेथी’ म्हणून विकली जातात. ही पानं कित्येक पंजाबी आणि उत्तर हिंदुस्तानी पदार्थांमध्ये स्वादासाठी वापरली जातात.

  January 16, 2017


alive-300
खाद्ययात्रा

अळीव पराठा

Category:

 

एक वाटी दूध गरम करून त्यात अळीव भिजत घालावे. दोन तासाने तुपावर रवा भाजून घ्यावा, त्यात खोबरं, चिमूटभर मीठ, अळिवासकट दूध आणि उरलेलं दूध घालून रवा शिजवावा, त्यात गूळ घालून मऊ सांजा करावा, जायफळ घालावं. कणकेमध्ये चवीला मीठ आणि एक मोठा चमचा तेल घालून सैलसर कणीक भिजवावी. थोडय़ा वेळाने कणकीच्या पारीत सांजा भरून, लाटून पोळ्या भाजाव्या. हा पराठा खायलाही चविष्ट आणि पौष्टिकही असतो.

  January 16, 2017


shevgyachi-Paane-300
खाद्ययात्रा

आजचा विषय शेवग्याची पाने

Category:

 

भारतात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूत शेवग्याची शेती केली जाते. आयुर्वेदिक दृष्ट्या शेवग्याची पाने ही औषधी असुन यामध्ये अ ब क हि जिवनसत्वे, लोह, कँल्शीअम यासारखी खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. पानांची पावडरची प्रक्रिया करून पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येतात, असुन त्याला जगभरात मोठी मागणी आहे.

  January 16, 2017


tikhat-chutni-300
खाद्ययात्रा

तिखट चटणी

Category:

 

सुक्या मिरच्यांचे तुकडे साधारण एक तासभर पाण्यात भिजत घालावेत. मग ह्या भिजवलेल्या सुक्या मिरच्या, लसूण आणि मीठ एकत्र करून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करावे.

  January 16, 2017