C-प्रसाद सदाशिव कुळकर्णी
आलिया भोगासी
Category:
लेखसंग्रहअखेर तिनेच या सगळ्यावर मार्ग काढून, फक्त झाडू पोछा करण्याची घरं (म्हणजे आमच्यासारखी) वगळून, जिथे झाडू पोछा सहित भांडी अशी एकत्रित कामं असलेली तिची घरं होती तेव्हढीच करायची असा निर्णय घेतला. त्यामुळे तिचं दहा ठिकाणी फिरणं कमी झालं, घरी लवकर जाता येऊ लागलं आणि अर्थात मिळकतही सुरू राहिली.
January 4, 2023
उणा आनंद…….
Category:
कथा साहित्य - ललित
December 14, 2022
योगेश्वर श्रीकृष्ण
Category:
लेखसंग्रह“ज्या वेळी धर्म लयाला जाऊ लागेल, अधर्म प्रबळ होऊ लागेल त्या वेळी, सज्जनांच्या संरक्षणासाठी, दुर्जनांच्या विनाशासाठी आणि धर्माची मुहूर्तमेढ पुन्हा रोवण्यासाठी, प्रत्येक युगात मी जन्म घेईन”. या स्वतःच्या वचनाला जागत, त्याने द्वापारयुगात जन्म घेतला.
December 13, 2022
जेवण संस्कृती पाटपंगत – डायनिंग टेबल ते…….कुठेही.
Category:
लेखसंग्रहआपल्याला बोलायला देत नाही म्हणून वाईट वाटायचं, क्वचित रागही यायचा. पुढे मोठं झाल्यावर यामागचा आईचा उद्देश कळायला लागला. आपल्या पोटात पुरेसं अन्न जावं, गप्पांच्या नादात खाण्याकडे दुर्लक्ष होऊन आपण अर्धपोटी राहू नये हा स्वच्छ निखळ हेतू असायचा आ.मु.जे. ब. च्या मागचा. घरातल्या स्त्रिया आज्जी, आई, ताई सकाळपासून स्वयंपाकघरात कामात असायच्या. त्यात सणवार असला की गोडाधोडाचं, म्हणजे आणखी काम वाढायचं.
November 25, 2022
विरह, दोन दिवसांचा
Category:
लेखसंग्रहमाझ्या बायकोने काढले. कसे काढले तिलाच माहित. खूऽऽऽप खूऽऽऽप त्रास होत होता तिला, लक्ष कशा कशात लागत नव्हतं, जीवन असार आहे असं वाटू लागलं होतं. तसा मी(आयुष्याचा साथीदार)आणि आमचा लेक घरातच होतो जवळच तिच्या, म्हणजे काही जास्त त्रास झाला तर काळजी घ्यायला. लग्नाचा नवरा, पोटचा पोर पण त्याची कमतरता का कुठे आमच्यामुळे भरून येणारय??? आणि आमच्याकडे, आमच्या आजूबाजूला तो सतत तिला दिसत होता, त्यामुळे अपमान, असूया, डोक्याची आग, विरहाचं दुःख आणखीनच वाढत होतं.
September 18, 2022
पंडितांचा बटाटावडा
Category:
लेखसंग्रहएकेका पदार्थाचा काय महिमा असतो नाही? पुरणपोळी, मोदक, श्रीखंड, बासुंदी, मणगणं…जाऊदे, थांबतो इथेच. विचारानेही त्रास होतो हो उगाच. आता इथे मी मला आवडणारे पदार्थ घेतलेयत. दुसरं कुणी त्याच्या आवडीच्या पदार्थांची यादी सांगेल. व्यक्ती तितक्या प्रकृ… आवडी. प्रत्येक प्रांतातील नागरिकांना तिथल्या परंपरागत पदार्थांचा मनापासून अभिमान असतो
September 17, 2022
गोष्ट त्या दोघांची
Category:
कथा साहित्य - ललितगिरिजाआत्या अणि तिचे यजमान रत्नाकर. आम्ही त्यांना काकाच म्हणायचो. दोघांचा संसार तसा वाढलेल्या वयावरच सुरू झाला. रत्नाकर आपल्या लग्नाचं वय उलटुन गेलेल्या बहिणीसाठी थांबून राहिले होते आणि गिरीजाआत्याचं लग्न जुळत नव्हतं म्हणून ती बिनलग्नाची राहिली होती. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी हे प्रपोजल दोघांच्याही समोर आलं होतं. परंतू प्रत्येक गोष्ट घडण्याची नियतीने एक वेळ निश्चित केलेली असते. आपल्या बहिणीसाठी रत्नाकरनी त्यावेळी या लग्नाला नकार दिला. अखेर बहिणही अविवाहित राहूनच स्वर्गवासी झाली. परंतू गिरीजाआत्या आणि रत्नाकरकरकाकांचं लग्न मात्र ती हयात असतानाच झालं. यालाच म्हणतात नियतीचा खेळ.
September 16, 2022
रंग काळा
Category:
लेखसंग्रहआपली काळया रंगाशी सोबत अगदी जन्मल्यापासून असते. पूर्वी आणि काही प्रमाणात आजही नवजात बाळाला न्हाऊ माखु घातल्यावर कानाखाली काळं तीट आणि घरात पाडलेलं काजळ, डोळे भरून लावलं जायचं. काळं तीट दृष्ट लागू नये म्हणून आणि काजळ डोळ्यांची निगा राखायला.
पुढे शाळेत जायला लागल्यावर सोबत असणारी काळीकुट्ट सिंगल किंवा डबल पाटी. त्या पाटीवर सर्वप्रथम श्री हे अक्षर काढायचं. स्पंजपेटी दप्तरात बाळगायची.
September 15, 2022
धर्माधिकारी गुरुजी
Category:
लेखसंग्रहआमच्याकडे धार्मिक विधी, नैमित्तिक पूजा अर्चा, एकादष्णी ,संकष्टी, श्रावणमासातील पूजा हे नित्याचच होतं. त्या लहानशा घरातला एक कोपरा देवघराने भरलेला होता. तात्यांची रोज भल्या पहाटे उठून पूजा चालायची. त्यांचं आध्यात्मिक पुस्तकांचं वाचनही प्रचंड होतं. घरात इतरही साहित्य संग्रह प्रचंड होता. थोडक्यात सांगायचं तर वाचन श्रीमंती भरपूर होती.
September 14, 2022