लेखसंग्रह

सिनेमा बनताना – मौसम

Category:

 

”मेरी  इश्क के लाखो  झटके “ गाण्याच्या वेळी काही स्टेप शर्मिला टागोरला येत नव्हत्या. त्यावेळी शेजारच्या सेटवर सरोजखान डान्स डायरेक्ट करत होत्या त्यांना गुलजारनी विनंती करून या गाण्याच्या स्टेप बसवायला सांगितल्या.

लेखसंग्रह

चित्तरंजन प्रकल्प – रेल्वे इंजिन कारखाना

Category:

 

चित्तरंजन प्रकल्पामुळे रेल्वेला लागणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींत भारत स्वावलंबी झाला. परदेशी गंगाजळीत मोलाची भर पडली आणि एक आदर्श, नव्याने बांधलेलं अद्ययावत शहर म्हणून चित्तरंजनची भारतभर ख्याती झाली.

लेखसंग्रह

सिनेमा बनताना – दो बिघा जमीन

Category:

 

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रिमिअरला राजकपूर व कृष्णाकपूर आले होते. चित्रपट पाहिल्यावर राजकपूर एकदम गप्प झाला. काही बोलेना. घरी आल्यावर कृष्णाकपूरने गप्प राहण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला “हाच तो चित्रपट आहे जो मला बनवायचा आहे” म्हणजे आवाराच्या  देश विदेशातील तुफान यशानंतरही त्याला या चित्रपटाबद्दल इतका आदर होता.

लेखसंग्रह

रेल्वेची इंजिने

Category:

 

इलेक्ट्रिकची इंजिनं आली आणि गाड्यांचे वेग वाढले. इंजिनड्रायव्हरचं जीवन सुसह्य झालं. मालगाड्यांच्या डब्यांची संख्या वाढू लागली. सन १९६२ पासून, म्हणजेच जेव्हा मालगाड्यांच्या डब्यांची संख्या वाढू लागली तेव्हापासून, डिझेल इंजिनाचं आगमन झालं. डिझेलवर चालणाऱ्या इंजिनाची हॉर्सपॉवर २६०० ते ५५०० पर्यंत असल्याने लांब पल्ल्याच्या २२ ते २५ डब्यांच्या प्रवासी गाड्यांचा वेग वाढला.

लेखसंग्रह

सिनेमा बनताना – बॉम्बे टू गोवा

Category:

 

”दिल तेरा है, मै भी तेरी हु सनम “ या गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चन याचे गुडघे सोलवटले होते, पण सांगणार कोणाला? नवखा होता ना, त्याही परिस्थितीत त्याने गुडघ्याला रुमाल बांधून शुटींग केले. “देखाना हाय रे सोचाना “ गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चनला १०२ ताप होता. एक दिवस शुटींग थांबले. पण शुटींग जास्त थांबवून चालणार नव्हते म्हणून मेहमूदने त्याला सांगितले तुला जमतील तश्या स्टेप्स कर, व सहकलाकारांना  त्याला प्रत्येक सीन नंतर टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्या असे सांगितले. तरीही त्याने असा काही डान्स केला कि शंकाही येत नाही कि त्याने तापामध्ये शुटींग केले असेल.

लेखसंग्रह

उत्कृष्ट अभिनेता -संजीव कुमार

Category:

 

संजीवकुमारने प्रत्येक रोल आव्हान म्हणून स्वीकारला. त्याची लांबी बघितली नाही कारण त्याला आपल्या अभिनयाच्या ताकदिवर पूर्ण विश्वास होता, त्याला दस्तक चित्रपट मिळाला.त्या चित्रपटाला अवॉर्ड मिळाले ( ह्या चित्रपटातील “ हम हे मताए कुचा बाजार की तरहा “ या गाण्यात संजीवकुमारची अगतिकता,चीड द्वेष पाहिली की संजीवकुमार काय चीज आहे हे लक्षात येते फक्त पाच ते दहा सेकंद त्याच्यावर शूट आहे ) कोशिश मध्ये तर एकही वाक्य नव्हते ,जे बोलायचे होते ते डोळे  व देहबोलीतून.नया दिन नई  रात ह्या चित्रपटासाठी आधी दिलीपकुमारला विचारले होते पण त्याने सांगितले की “ माझ्या पेक्षा  संजीवकुमार काम जास्त चांगले करेल.” उलझन चित्रपटांच्यावेळी सुलक्षणा पंडित त्याच्या प्रेमात पडली,पण त्याने नकार दिला.

लेखसंग्रह

बेन हर (१९६०)

Category:

 

एखाद्या सिनेमाचा आस्वाद करताना त्याचे थिम म्युझीक त्या सिनेमाशी किती एकरुप होउ शकते याचे सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे बेन हर. सिनेमाच्या प्रत्येक फ्रेमला जिवंत करणारे एक विलक्षण पार्श्वसंगीत बेन हर हा सिनेमा पाहताना तुम्ही अनुभवत राहता. इतके की सिनेमा संपल्यानंतरही बरेच तास ते तुमच्या डोक्यातून जात नाही. ते सारे प्रसंग तुम्हाला राहून राहून आठवत राहतात..अगदी तुमच्या स्वप्नातही..ही कमाल मिल्कस रोजाच्या जबरदस्त थीम संगीताची आहे.