पॅलेस ऑन व्हील्स : रेल्वेचा फिरता महाल
Category:
लेखसंग्रहभारतीय रेल्वेमधील स्वप्ननगरीचं सुख अनुभवावयाचं असेल, तर ‘पॅलेस ऑन व्हील्स’ या एकमेव अतिश्रीमंत गाडीचं नाव समोर येतं. देशाचा अभिमान, असलेली ही राजेशाही गाडी नवी दिल्लीहून निघून पुढे जैसलमेर, जयपूर, जोधपूर, रणथंबोर (व्याघ्र प्रकल्प), आग्रा असा आठ दिवसांचा आरामदायी व आनंददायी प्रवास घडविते. या गाडीचा प्रत्येक डबा म्हणजे पारंपरिक भारतीय पद्धतीनं सजविलेला महालच आहे.