लेखसंग्रह

कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ?

Category:

 

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाच्या गाथेत अनेक घराणी कामी आल्याचा उल्लेख आहे. छत्रपतींची इमानेइतबारे एकनिष्ठेने सेवा करण्यात ज्या दोन जाती इतिहास प्रसिद्ध आहेत त्यामध्ये महार समाज, ज्यांचा शिवाजी महाराज आदराने “नाईक” म्हणून उल्लेख करीत आणि दुसरा समाज कायस्थ प्रभूंचा होता. राजापूरचे बाळाजी आवजी चिटणीस, हिरडस मावळातील बाजी प्रभू देशपांडे आणि रोहीड खोरेकर देशपांडे नरस प्रभू गुप्ते या घराण्यातील पुरुषांनी स्वराज्याची सेवा हाच कुळधर्म मानला. मुत्सद्देगिरी, शौर्य आणि त्यागाची कमाल केली.

लेखसंग्रह

मराठी चित्रपटांशी संबंधित वाद सोडविण्यासाठी संयुक्त समिती – गृहमंत्री

Category:

 

मराठी चित्रपटांशी संबंधित वाद सोडवून धोरणात्मक निर्णयांसाठी शासन स्तरावर एक समिती स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली.

लेखसंग्रह

न्याययंत्रणेला भ्रष्ट्राचाराचा विळखा

Category:

 

सर्व क्षेत्रात वाढत चाललेला भ्रष्ट्राचार चिताजनक ठरत आहे. भ्रष्ट्राचाराची पाळेमुळे खोलवर रुजल्यामुळे वरवरच्या उपायांनी तो आटोक्यात येण्यासारखा नाही. आजवर न्यायसंस्था भ्रष्ट्राचारापासून दूर होती. पण अलीकडेच याही क्षेत्रात भ्रष्ट्राचाराच्या घटना आढळल्याने खळबळ माजली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रकमेच्या अपहार करणार्‍या न्यायाधिशांवर काय कारवाई केली जाते याकडे सयार्‍यांचे लक्ष लागले आहे.

लेखसंग्रह

रक्तदाते शोधा आता ऑनलाईन

Category:

 

आता रक्तदात्यांची सूचीही ग्लोबल होत आहे. रक्तदात्यांची माहिती देणार्‍या अनेक वेबसाईटस सुरु होत आहेत आणि त्या लोकप्रियही होत आहेत.

लेखसंग्रह

डायल २६११, देशाचे सुरक्षा कवच !

Category:

 

जगात सुरक्षा आणि संरक्षणासाठी विविध उपाय योजना तयार केल्या व राबवल्या जातात. कोणताही प्रगत देश असो आता पर्यंत यातील कोणतीही यंत्रणा वा कार्यप्रणाली हा ठोस किंवा निश्चित उपाय होऊ शकला नाही. अमेरिका, चीन, ईस्रायल, जपान सारखे देश आजही पर्यायी उपायासाठी चाचपडत आहेत. यावर पुण्यातील शास्त्रज्ञ, टेलीकॉम्युनिकेशन इंजिनिअर तथा माजी तंत्रज्ञान सल्लागार भारत सरकार श्री. दिनकर बोर्डे यांनी तयार केलेल्या “डायल २६११” या परियोजनेमुळे जगाला एक कायमस्वरुपी नागरी, सामाजिक, विभागीय, अंतर्गत, सीमावर्ती, तटवर्ती, अवकाशीय आणि देशीय सुरक्षा आणि संरक्षणासाठीचा ठोस व परिणामकारक उपाय मिळणार आहे

लेखसंग्रह

फसवणुकीचे धंदे

Category:

 

कन्फ्युज्ड माइण्डसेटमध्ये माणसं आपल्याला कोणतं बक्षीस लागलं बुवा, हे बघायला आणि चकटफू डिनर चाखायला सपत्नीक जातातही. आणि तिथेच फसतात. तिथे गेल्यावर तुमच्या बायकोच्या हातात येतो एखादा लेमनसेट. किंमत साधारण शंभर-सव्वाशे रुपये. हॉटेलचा पंचतारांकित भपका, बुफे जेवण याचा नाही म्हटलं तरी काही परिणाम तुमच्यावर होतोच. तुमच्या डोळ्यांमधले चंचल ससे मग एक डुलकी काढतात आणि आसपासची मार्केटिंग करणारी कासवं आपलं डोकं वर काढतात. एखादी तरुणी मधाळ आवाजात एखाद्या प्लॅण्टेशनची, रिसॉर्ट किंवा मोटेलची किंवा टाइम शेअरिंगची योजना तुमच्या गळी उतरवू लागते. तिला तुम्ही पटकन नाहीही म्हणू शकत नाही. किंवा नाही म्हणायला तुम्ही मध्यमवर्गीय सबबीने पटकन सांगता की मी आता चेकबुक आणलेलं नाही. इथेच तुम्ही अडकता. ती लगेच म्हणते ‘हरकत नाही, तुम्ही आता फॉर्म भरा. मी माझा एक माणूस तुमच्यासोबत घरी पाठवते. तुम्ही त्याच्यासोबत डाऊनपेमेण्टचा चेक द्या.’ एका लेमनसेट आणि बेचव जेवणाच्या बदल्यात तुम्ही लाख-सव्वालाखाच्या व्यवहारात अडकलेला असता.

लेखसंग्रह

मैत्र आत्म्याला भिडणारे (फ्रेंडशिप डे विशेष)

Category:

 

कोणाचे तरी कोठे तरी मैत्रीचे नाते जुळते. बऱ्याच वेळा मैत्री व्यक्तीसापेक्ष असते. पण तसा विचार केला तर आवडीच्या क्षेत्रात कार्यरत असल्यास त्या क्षेत्राशीही मैत्रीचे बंध निर्माण होतात. मग अशा मैत्रीला काय नाव द्याल ? कशी असेल त्याची अनुभूती ? जाणून घ्यायचेय ? नेमके हेच प्रश्न समोर ठेवून आम्ही बोलते केले प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि प्रकाश आमटे यांना…

लेखसंग्रह

वाणिज्य शाखेतील डॉक्टरेटची पदवी

Category:

 

Ph.D. या पदवीसाठीचे महाराष्ट्रातील नियम बदलत आहेत. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील सर्वोच्च अशा या पदवी परीक्षेसंदर्भात बरेच विचारमंथनही चालू आहे. नियमांच्या चौकटीशिवाय खरा प्रश्न असतो तो विद्यारर्थ्याला कार्यप्रेरित करण्याचा, त्याला प्रोत्साहन देण्याचा ! संशोधनाच्या कार्याचा उद्देश विद्यार्थी उच्चविद्याविभूषित होणे हा आहेच, परंतु त्याचा अभ्यास हा समाजाला उपयोगी, हितकारक कसा बनेल हे पाहणेदेखील आवश्यक आहे. डॉक्टरेट करणार्‍या विद्यार्थ्याला प्रेरणा मिळावी, या दृष्टीकोनातून लिहिलेला लेख……..

लेखसंग्रह

“पहिला” दिवस शिक्षकाचा !

Category:

 

शैक्षणिक क्षेत्राचा आधारस्तंभ म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध. हे नातेसंबंध कसे निर्माण होतात, किती बहरतात, वाढतात, का खुरटेच राहतात, यावर त्या दोघांचे आणि शाळेचेही भवितव्य अवलंबून असते. हे नातेसंबंध रुजतात शिक्षक व विद्यार्थी यांच्या पहिल्या भेटीतच. म्हणूनच शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्गावर जाताना प्रत्येक शिक्षकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज ते जे बोलतील, जसे वागतील त्याचेच पडसाद वर्गात वर्षभर उमटणार आहेत. यामुळे पहिल्याच भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांची मने जाणून घेण्याचा, जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यास हा प्रयत्न नक्की यशस्वी होऊ शकतो.

लेखसंग्रह

खासदार वेतनवाढविरोधात ऑनलाइन याचिका

Category:

 

खासदारांच्या वेतनवाढीच्या मागणीच्या विरोधात जनमताचा रेटा तयार व्हावा, याकरिता पुण्यातील सजग नागरिक मंचाने ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. जागरूक नागरिकांनी त्यास पाठींबा देण्याची विनंती केली आहे. आपण ही त्यास पाठींबा द्यावा ही विनंती .