धोका फुफ्फुसाच्या कर्करोगाचा
Category:
अवर्गिकृतधूम्रपान हे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. सिगारेटच्या धूरातील कार्सिनोजेन्समुळे हा कर्करोग जडतो. हा कर्करोग जडल्यानंतर रुग्ण वाचण्याची शक्यता अत्यल्प असते. निदानानंतर या कर्करोगाचे साठ टक्के रुग्ण वर्षभरातच मृत्यूमुखी पडतात. या व्याधीपासून दूर राहायचे असेल तर ताबडतोब धूम्रपान सोडायला हवे.