अवर्गिकृत

डॉ.संजय गोविंदराव पोहरकर – एक अष्टपैलू व्यक्तिमत्व…!

Category:

 

नाशिकच्या ९१ वर्षाची परंपरा असणार्‍या “ वसंत व्याख्यानमालेत ” सावरकरी विचारांचे पुष्प गुंफण्यासाठी संजय पोहरकरांना २०१२ या वर्षात विशेषत्वाने पाचारण करण्यात आले. टिळक, आगरकरांनी ज्या व्याख्यानमालेत आपले विचार मांडलेत; त्या मंचावर उभे राहण्याच्या विचारानेही कितीतरी गर्भगळीत होतात, तिथे अधिकारवाणीने आपले विचार निर्भीडपणे अभिव्यक्त करणारा आत्मा म्हणजे संजय पोहरकर होत.

अवर्गिकृत

माती परिक्षणाची फिरती प्रयोगशाळा…

Category:

 

शेतकऱ्यांना जिल्हा पातळीवर येऊन माती परिक्षण करुन घेणे शक्य होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना परिस्थितीनुसार मातीमधील नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शीयम, मॅग्नेशियम यासारखे गुणधर्म लक्षात येत नाहीत व त्यासाठी काय करावे हे ही समजत नाही. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने फिरती माती परिक्षण प्रयोगशाळा तयार केली आहे.

अवर्गिकृत

संगमेश्वरी नौका

Category:

 

सागरी सुरक्षेचे महत्व लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली. याच आरमाराची शान असलेली ‘संगमेश्वरी’ नौका रत्नागिरी जिल्ह्याच्या निढळेवाडी येथील सुतारांनी तयार केल्याचे सांगितले जाते. सुतारकलेची ही परंपरा जोपासत आजही या गावात नौका तयार करण्याचा व्यवसाय करण्यात येतो.

अवर्गिकृत

मर्ढेकरांची कविता – आला आषाढ श्रावण

Category:

 

मर्ढेकरांची “आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी ;” ही कविता पहिल्यांदा वाचल्यावर निसर्गवर्णनपर कविता वाटते. परंतु कवितेतील हा पाउस वेगळाच आहे. ह्या कवितेला दुसऱ्या महायुध्दात अमेरीकेने जपानवर टाकलेल्या अणुबाँबचा संदर्भ आहे. अमेरीकेने जपानमधील हीरोशिमा व नागासकी याशहरांवर अणुबॉंब टाकल्यावर पडलेला किरणोत्सर्गी असा हा पाऊस आहे.

अवर्गिकृत

पंजाबमधील पोलीस महासंचालक शशिकांत यांचा पराक्रम

Category:

 

पंजाबमधील पोलीस महासंचालक शशिकांत यांनी, कारागृहातील गुन्हेगारांना शारीरिक सुख (वैवाहिक जीवनातील) मिळवून देण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली.अश्या प्रकारची परवानगी मिळाल्यावर, दृष्ट कसाबही त्याच्या बायकोला वा प्रीयेसीला कारागृहात आणण्याची परवानगी मागेल, आम्ही ती देणार काय ? आतंकवादी कारवाया केल्यावरही, भारतीय कारागृहात बायकोसोबत सुख उपभोगता येते, असे समजल्यावर सीमेपलीकडील आतंकवाद्यांना तर, अपार आनंदच होईल.

अवर्गिकृत

औचित्य जागतिक दृष्टीदान दिनाचे !

Category:

 

मानवाच्या शरीराची पंच इंद्रिये त्यांना नेमून दिलेले कार्य करणारी असतील तर त्यांचा उपयोग आहे. शरीरावर नुसती पंचेंद्रिये असून काय फायदा? ती सशक्त, सुद्रुढ व कार्यरत नसतील तर काय कामाची? तसेच अगदी सुंदर रेखीव मासोळीदार काळेभोर टपोरे डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीत तर त्यांचा काय उपयोग? दैनंदिन जीवनात पदोपदी डोळ्यांची आवश्यकता भासते.

अवर्गिकृत

कशी असते जमिनीची मोजणी

Category:

 

आपल्याकडे स्वत:च्या मालकीची अथवा वडिलोपार्जीत जमीन असेल तर त्याची मोजणी ही आपल्याला करावीच लागते. जमिनीची मोजणी कशी केली जाते ? दिवसेंदिवस जमिनीचा होणारा विकास, शहरीकरण, औद्योगिकरण अन्य विकासाची कामे यासाठी होणारा जमिनीचा वापर, तसेच आपापसातील हद्दीचे वाद सोडविण्यासाठी त्या जमिनीची प्रथम मोजणी करुन मूळ नकाशाच्या आधारे हद्दीच्या खुणा कायम करुन भूमापकाकडून दाखले दिले जातात.

अवर्गिकृत

सरकारी कर्ज आणि भारतीय……..

Category:

 

तुम्हास कदाचित माहित नसेल आपण ( भारतीय ) दर माणशी रुपये तेहतीस हजार ( रु. ३३,०००/- ) सरकारी कर्जात बुडालेलो आहोत.