लेखसंग्रह

मराठी कलाकारांचा वाङमयीन स्पर्श

Category:

 

आपल्या आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवताना, थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन, योग्य शिक्षण आणि अनुभवाची शिदोरी उपयुक्त पडते. उल्लेख करता येतील असे अनेक नामवंत कलाकार मंडळी मराठी मनोरंजन विश्वाला लाभले ज्यांनी मराठी वाङमय कृतीचं अक्षरश: सोनं केलं.

लेखसंग्रह

राजकारणात उतरू इच्छिणार्‍यांना निवडणुक लढविण्यासाठी राजकीय योग्यता परीक्षा अनिवार्य करावी ….????

Category:

 

फक्त भारतात एक विशेष अपवाद आहे ते म्हणजे कोणत्याही राजकीय व्यक्तीला कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही राजकारणात उतरण्यासाठी. तरी ही राजकीय मंडळी जर निवडून आली तर ते जनतेसाठी नियम व कायदे संसदेत बनविणार

लेखसंग्रह

“औद्योगिक अस्पृश्यता आणि फाजिल उत्सवप्रियता”

Category:

 

मी मायमराठी प्रेमळ व तेजाळ संस्कृति रक्तातच भिनलेला आहे! तेव्हा उत्सवप्रियतेच्या विरूध्द टोकाची भूमिका घेणारा आहे, असा गैरसमज कृपया होऊ देऊ नका. फक्त माझी अट एवढीच आहे की, कंत्राटदारीसारख्या मुख्य व मराठी घरं नासवणार्‍या इतर अनेक अवदसांना (कॅपिटेशन फी घेणारे शिक्षणसम्राट, भ्रष्ट नोकरशहा व राजकारणी इ.) लाथ मारून बाहेर काढून मराठी घरांमधून ’गोकुळ‘ निर्माण झालं पाहिजे, गणपतीच्या रिध्दी-सिध्दी परप्रांतियांच्या नव्हे, तर प्रथम आमच्या घरात पाणी भरताना दिसल्या पाहिजेत

लेखसंग्रह

“औद्योगिक-शांतता की,स्मशान-शांतता? मजूर-कंत्राटदारी की,औद्योगिक-अस्पृश्यता?”

Category:

 

ही ’इंटरनॅशनल् लेबर ऑर्गनायझेशन्च्या‘ जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथील कार्यालयाच्या दर्शनी भागावर लिहिलेली घोषणा, हल्ली मला बकवास वाटू लागलीय. विशेषतः महाराष्ट्राच्या ’कॅनव्हास‘वर तर मराठी कामगार-कर्मचार्‍र्यांची थडगी बांधण्याची ’कंत्राटी‘ कामे, जागोजागी घाऊक पध्दतीनं चालू असताना… अशासारखं घोषवाक्य आपल्याला वाकुल्या दाखवत अंतःकरणात दूर कुठेतरी कळ उमटवून जातं.

लेखसंग्रह

ठाण्यातील कामगार भीमराव भंडारेंची ’आत्महत्या‘…की, ’सरकारी हत्या‘(?)

Category:

 

लोकमान्य टिळक म्हणाले होते की, ”शेतकरी व कामकरी (कामगार) हेच या देशाचे मालक आहेत!“… याचा साधा सरळ अर्थ हा की, समाजातील इतर अभिजनवर्ग हा कामगारांनी निर्माण केलेल्या ’अतिरिक्त मूल्याचा‘ आणि निसर्गशक्तिच्या (विशेषतः सूर्यप्रकाश) सहाय्यानं शेतकर्‍यांनी निर्मिलेल्या अतिरिक्त खाद्यान्नांचा, तसेच इतर पूरक गोष्टींचा (उदा. कापूस) आधार घेऊन जगत असतो.

लेखसंग्रह

वाचवा रें वाचवा ….!!!!! या आण्णा पासुन…… भारत सरकारचा टाहो.

Category:

 

राळेगणसिद्धीचे समाजसेवक अण्णा हजारे आतां सगळ्या देशाचे गांधीवादी युगपुरुष झाले आहेत . ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत आणि त्यांचा लढा आता सगळ्या देशाचा झालाआहे.

लेखसंग्रह

स्त्री मुक्तीचा खरा अर्थ – ’’आर्थिक स्वावलंबन‘‘

Category:

 

एवढी प्रचंड स्त्रीची ओळख असतांनाही अजूनही स्त्री जन्मा हीच तूझी कहानी ह्वदयी अमृत नयनी पाणी या विचाराप्रमाणे जिवन जगत आहे. प्रत्येक स्त्री ही राणी लक्ष्मीबाई आहे. परंतु आजचे दुष्य बघीतले तर तीची दषा लग्नापुर्वी ’राणी‘ लग्नानंतर ’लक्ष्मी‘ आणि मुल झाली की ’बाई‘ अशी झाली आहे. भारतीय स्त्रीचे जीवन यमुनेच्या प्रवाहाप्रमाणे संथ वाहत आहे.

लेखसंग्रह

कॉंग्रेसचा दिग्गीराजा तो ‘बाब्या’

Category:

 

काँगेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह उर्फ दिग्गीराजा पुन्हा बरळले. अर्थातच ते नेहमीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला निशाना बनविण्यास चुकले नाहीत. त्यांचीही मजबुरी असेल कदाचित्‌! हायकमांडला खुश करण्यासाठी काय काय करावे लागते, त्याचा समृद्ध अनुभव त्यांच्या पाठीशी आणि गाठीशी आहेच.

लेखसंग्रह

स्वातंत्र्य की परतंत्र

Category:

 

निसर्गाने संपन्नता बहाल केलेली असतानाही नशिबी आलेले अठरा विश्वे दारिद्र्याचे भोग, असुरक्षिततेने सदैव जिवाला लागलेला घोर आणि त्यामुळे आलेली अस्थिरता… या सर्वांमध्ये काश्मिरवासीयांमध्ये कुठेतरी तुटलेपण आले आहे. मुख्य प्रवाहापासून पद्धतशीरपणे दूर ठेवण्यात आल्याचा असंतोष काश्मीरी जनतेत खदखदत आहे. काश्मीर भारतापासून अलग होऊ नये, यासाठी तेथील दहशतवाद उखडून टाकण्यासोबतच भारताला समांतर पातळीवर दुसरे युद्ध जिकावे लागेल, ते म्हणजे काश्मिरी जनतेचे मन जिंकण्याचे.

लेखसंग्रह

राजसाहेब, माफ़ करा, पण…..

Category:

 

माननीय राजसाहेब ठाकरेजी, तुम्ही मला ओळखत नसाल पण मी तुम्हाला ओळखतो. तुम्हाला कोण नाही ओळखत? मी आपल्याच महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य नागरिक आहे. म्हणजे तुमचे फ़ोटो मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवणारा, कामाला दांडी मारुन तुमचे भाषण ऎकायला येणारा, टी.व्ही मध्ये जर तुमची मुलाखात असेल तर सगळी कामं बाजूला ठेऊन ते पाहणारा, तुमच्या चळवळींना (अहिंसक मार्गाने) पाठींबा देणारा आणि मतदानाच्या वेळी तुम्हाला मत देणारा, मी एक सर्वसामान्य मराठी हिंदु नागरिक आहे.