लेखसंग्रह

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग ३

Category:

 

आमचे नेते व बुद्धिवंत या नीतीचं समर्थनच करतात, हाच प्रगतीचा मार्ग आहे असं सांगत असतात. मी सुद्धा तुम्‍हाला हेच सांगतो की, भारताला असंच परतंत्र होऊ दे ! विचित्र वाटलं ? धक्‍का बसला ?  पण खरोखरच सांगतो, आपल्‍या उन्नतीसाठी आपल्‍यापुढे हाच एकमात्र मार्ग आहे.

लेखसंग्रह

लिव्ह इन रिलेशनशिप आणि भारतीय विवाह संस्था

Category:

 

पूर्वी योग्य ‘वर किंवा वधु’ शोधण्याची संपूर्ण जवाबदारी मुलाच्या किंवा मुलीच्या आई-वडिलांवर असे. ‘बदल हा काळाचा नियम आहे’ असे म्हंटले जाते. त्याचप्रमाणे जसे परकीय संस्कृतीचा इथल्या संस्कृतीवर होत असलेले आक्रमण वाढत आहे आणि त्याच्या परिणाम इथल्या विवाह संस्थेवर सुद्धा होत आहे.

लेखसंग्रह

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग २

Category:

 

आज आर्थिक, वित्तीय व औद्योगिक क्षेत्रात परदेशियांनी (पाश्चिमात्यांनी) आपल्‍यावर आक्रमणच केलेलें आहे. ‘बळी तो कान पिळी’ या न्‍यायानें सगळीकडे आम्हांस ते त्‍यांच्‍या मर्जीप्रमाणें वाकवतात. शस्‍त्रास्‍त्रनिर्मिती करणार्‍या परदेशी कंपन्‍या चालाव्‍यात म्‍हणून अविकसित देशांना शस्‍त्र विक्री केली जाते . रासायनिक युद्धतंत्रविषयक  ( केमिकल वॉरफेअर ) ज्ञानातून कीटकनाशकांची ( पेस्टिसाइडस् ) निर्मिती होते , त्‍या हानिकारक उत्‍पादनांवर विकसित देशांत बंदी घातली जाते आणि इकडे तेच तंत्र भारतीय कंपन्‍यांना पुरवलें जातें.

लेखसंग्रह

मराठी भाषा दिन, एक मंथन

Category:

 

ज्या दिवशी माझी मातृभाषा मराठी ही माझी अस्मिता ठरेल आणि या अस्मितेचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी आपण प्रत्येक जण जीवापाड प्रयत्न करू करत राहू अगदी वर्षातल्या प्रत्येक दिवशी तरच, आपण ठामपणे म्हणू शकतो की मी मराठी माणूस आहे आणि मी महाराष्ट्रीयन आहे. माझी भाषा माझी अस्मिता आहे आणि या अस्मितेच्या रक्षणासाठी मी अविरत प्रयत्न करीन. तरच मराठी माणूस असल्याचा मला अभिमान आहे. असे आपण म्हणू शकतो.

लेखसंग्रह

सर सलामत तो पगडी पचास

Category:

 

हेल्मेट वापरण्याचा मुख्य उद्देश म्हणजे यात सामान्य नागरिकांच्या जीवनाचे धोक्याचे प्रमाण कमी होते. पण त्यासाठी सरकारानेच ‘प्रबोधन’ करायला पाहिजे असे म्हणणे हि मोठी शोकांतिका आहे. पुणेसारख्या शहरांमध्ये धर्माच्या नावाखाली हेल्मेट सक्तीला विरोध दर्शविण्यात आले. त्यांना एवढंच म्हणावे लागेल, “सर सलामत तो पगडी पचास”.

लेखसंग्रह

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग १-ब

Category:

 

आमचे ज्ञानी विद्वान आजही शंका काढतात की आमची संस्‍कृती इतकी प्राचीन असती तर तसे अनेक पुरावे सापडायला हवे होते. खरं म्‍हणजे अशी शंका मांडण्‍यापूर्वी त्‍यांनीं कांहीं गोष्‍टी ध्‍यानांत घ्‍यायला हव्‍या. एक म्‍हणजे भारतातील हवामान. भारतातल्‍या मान्‍सूनच्‍या पावसामुळे व दमट हवेमुळे लाकडी बांधकाम व भूर्जपत्रांवरील लेखन हें नष्‍ट होणारच ; तें शतकानुशतके टिकणें अशक्‍यच आहे. भारतातील सर्वच महत्त्वाची शहरें हजारो वर्षांपासून ‘जिवंत शहरे’ (Living Cities) आहेत हे सर्वमान्‍य ऐतिहासिक सत्‍यही येथें लक्षात घ्‍यायला हवें.

लेखसंग्रह

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग १-अ

Category:

 

भारतावर परचक्र आलेलं आहे याची किती लोकांना कल्‍पना आहे ? आपण परकीयांची गुलामगिरी स्‍वेच्‍छेने पत्‍करली आहे याची किती लोकांना जाणीव आहे ? ही गुलामगिरी बौद्धिक, आर्थिक, औद्योगिक व सांस्‍कृतिक आहे हे किती लोकांच्‍या लक्षात आलं आहे ? अन् अशा तर्‍हेची गुलामगिरी राजकीय पारतंत्र्याइतकीच भयानक आहे. याचा किती लोकांनी विचार केला आहे ?

लेखसंग्रह

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : प्रास्ताविक

Category:

 

प्रस्तुत लेखकानें १९९३ सालीं जागतिकीकरणातील धोक्यांविषयीं एक लेख लिहिला होता, व तो ‘जागतिक मराठी अकादमी, बडोदा चॅप्टर’ यांच्या  ‘संवाद’ या अनियतकालिकात १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला होता. परिस्थितीत , या १९९३च्या लेखाची पुनर्भेट  प्रस्तुत लेखकाला आवश्यक व उपयुक्त वाटली. कांहीं तत्कालीन कारणांनें हा लेख भाषणसदृश लिहिलेला आहे, हें ध्यानांत घ्यावें. तसेंच, परकीय जन हे कसे भारतीय विचारांवर परिणाम करत आलेले आहेत, याचा ऊहापोह इतिहासात जाऊन, लेखाच्या सुरुवातीच्या भागात, केलेला आहे, याचीही वाचकांनी नोंद घ्यावी.  

लेखसंग्रह

आपल्या हक्काचा दिव्यातील राक्षस

Category:

 

लहानपणी सर्वाना गोष्टी ऐकायला किंवा वाचायला आवडतात. गोष्टीमधून आपण एका नवीन दुनियेची सफर करून येतो. जसे आपण मोठे होतो, तसे आपण कामामध्ये अडकत जातो आणि लहानपणातील गोष्टीच्या दुनियेतून बाहेर पडून वास्तविक दुनियेत रमून जातो.

लेखसंग्रह

बॅड पॅच- एक संघर्ष…!!!

Category:

 

प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘बॅड पॅच’ येतो. शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात, करीयर मध्ये काहीतरी बिघडतं, नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो, पैशांची बिकट वाट लागते… नड येते ….. आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!