सामर्थ्य आहे चळवळीचे?
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनमहावितरणच्या राज्यातील अतिरेकी भारनियमनाविरुद्ध आम्ही गेल्या आठवड्यात समठा विकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात छेडलेले आंदोलन बरेच गाजले. अकोल्याचा अपवाद वगळता इतर ठिकाणी आंदोलन शांततापूर्ण राहिले. बऱ्याच ठिकाणी वीज मंडळ अधिकाऱ्यांनीच आंदोलनकर्त्यांची बाजू समजून घेऊन आणि त्यांचा सन्मान ठेवीत स्वत:च कार्यालयातील पंखे, ट्यूब लाईट्स, वातानुकूल यंत्रे काढून ठेवलीत, अथवा बंद ठेवली.