कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

शोध

Category:

 

लपून सावली आड पृथ्वीच्या पाहतो चंद्र आमावस्येच्या दिवशी जसा चांदणीकडे पाहतो तसा मी लपून रात्रीच्या काळोखा आड प्रकाशातील तुझ्याकडे आहेस तू उत्तर ध्रुव आणि मी दक्षिण ! आपल्या दोघांच्या मध्ये उभी आहे समाजाने आखलेली भिंत विषुववृत्त नावाची

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

श्री हनुमान जन्मकथा

Category:

 

श्री हनुमान जन्मकथा वंदन तुज मारुतीराया तुझा आशीर्वाद मिळाया न कळे कुणास तुझी माया भक्ताविना १ रुद्राचे तू रुप असता शक्तीची तू देवता अचाट कामे क्षणांत ह्या पृथ्वीवरी २ शक्ती बुद्धी नि सेवा ह्याचा तूं मुर्तीमंत ठेवा भक्तीभाव मनीं यावा हीच माझी इच्छा ३ शक्तीचे तूं दैवत बुद्धीदाता तूं होत शक्ती नि बुद्धी एकांत मिळे तुझ्या आशिर्वादे ४ हनुमंताची जन्मकथा आनंद होई सांगता चितीं समाधान देता तुमच्या ठायीं ५ अंजनी एक वानरी भक्ती तिची शिवावरी रात्रंदिनी भजन करी सदाशिवाचे ६ प्रभू भक्तीचा भूकेला पावन होई भक्ताला लक्ष देई शंकेला भक्तांच्या ७ भक्तीचा महिमा थोर सर्वांसी उघडे द्वार असेल नर अथवा वानर कुणासही पावत असे ८ अंजनीची पाहून भक्ति शिव प्रसन्न होती आशिर्वाद तिजला देती विश्वनाथे ९ अंजनी होती वानरी इच्छा ती करी तुम्ही यावे उदरीं लाभावा प्रभू सहवास १०

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

एक होता शशी

Category:

 

एक होता शशी !! वाढवली दाढी मिशी !! झाला तो ऋषी !! गेला काशी !!राहिला उपाशी !!संबंध तोडला सर्वांशी !!नाते जोडले देवाशी !!