अग्निशमन दिवस
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानमुंबई बंदरात व्हिक्टोरिया गोदीत उभ्या असलेल्या ‘एस.एस. फोर्ट स्टिकीन’ या बोटीला १४ एप्रिल १९४४ रोजी लागलेली आग विझविताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी आणि जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. म्हणून १४ एप्रिल हा दिवस ‘अग्निशमन दिवस’ म्हणून पाळण्यात येतो. तसेच दरवर्षी १४ एप्रिल ते २० एप्रिल ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो.