व्यक्ती-परिचय

दुर्गाबाई भागवत

Category:

 

त्यांनी संशोधनपर , समीक्षात्मक , वैचारिक , कथा , चरित्र, संपादन , अनुवाद, बालसाहित्य , ललितगद्य असे विविधअंगी लेखन केले. त्यांची सुमारे सत्तर पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. दुर्गाबाई विणकाम, भरतकाम, स्वयंपाक यामध्ये पारंगत होत्या . त्यांनी काही नव्या पाककृतीही शोधून काढल्या आहेत. दुर्गाबाईंचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. तर हायस्कुलमधील शिक्षण अहमदनगर, नाशिक, धारवाड आणि पुणे यथे झाले. त्यांनी ‘ अर्ली बुद्धिस्ट ज्युरिस ज्यूरिसप्रूडन्स ‘ हा विषय घेऊन एम.ए केले. विद्यार्थीदशेत असताना त्यांनी महात्मा गांधींच्या चळवळीतही भाग घेतला होता. भारताच्या आद्य स्त्री-शास्त्रज्ञ कमला सोहोनी या त्यांच्या भगिनी होत्या. दुर्गाबाईचे फ्रेंच, जर्मन, संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते.

व्यक्ती-परिचय

सुप्रसिद्ध कवी अनिल

Category:

 

कवि अनिल यांनी १९३० च्या सुमारास काव्यलेखनास सुरवात केली. त्या काळात जबरदस्त लोकप्रिय असणाऱ्या रवीकिरण मंडळाच्या कवितेपेक्षा त्यांची कविता वेगळी असल्यामुळे लोकांना ती आवडली. त्यांची सुरवातीची कविता ऋजू , भावपूर्ण , सौम्य शब्दाच्या कलेची होती. ‘फुलवात’ या त्यांच्या पहिल्या संग्रहानंतर तीन वर्षाने आलेल्या ‘ प्रेम ‘ आणि ‘ जीवन ‘ या संग्रहात त्यांनी मुक्तछंदात दीर्घ कविता लिहिली त्यामुळे कवि अनिल मराठी मुक्तछंदात्मक कवितांचे प्रणेते समजले जातात. त्यानंतर त्यांनी कला आणि संस्कृती यांच्या परस्पर संबंधावर भाष्य करणारे ‘ भग्नमूर्ती ‘ हे खंडकाव्य लिहिले .

व्यक्ती-परिचय

लेखिका मालतीबाई बेडेकर

Category:

 

मालतीबाई बेडेकर उर्फ विभावरी शिरुरकर यांची ‘ हिंदोळ्यावर ‘ ह्या कादंबरीतून वैचारिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या स्त्रीमुक्तीचा महत्वाचा टप्पा गाठला होता आणि आजही आपण किती पुरोगामी आहोत यांचा विचार करणे आवश्यक आहे. पुढे त्यांनी विभावरी शिरुरकर या नावाने विरलेले स्वप्न , बळी , बाई , दोघांचे विश्व आणि इतर कथा , शबरी ही पुस्तके लिहिली आहेत . तर रानफुले , हिंदू-व्यवहार धर्मशास्त्र , स्त्रियांच्या हक्कांची सुधारणा ही पुस्तके त्यांनी ‘ बाळूताई खरे ‘ या नावाने लिहिली.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ अभिनेते दारासिंग स्मृतिदिन

Category:

 

१०० हून अधिक चित्रपटांत दारा सिंग यांनी अभिनय केला होता. १९७८ साली दारासिंग यांना रुस्तम-ए-हिंद या किताबाने गौरवण्यात आले होते. २००३ साली ते राज्यसभेचे खासदारही झाले.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ अभिनेते प्राण स्मृतिदिन.

Category:

 

त्यांना “यमला जट’ या पंजाबी सिनेमात अभिनय करण्याची संधी पहिल्यांदा मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांना उपकार, आँसू बन गये फूल, बेईमान या चित्रपटांमधील उत्कृष्ट भूमिकांबद्दल फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. याशिवाय अन्य अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. तर चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा वाढदिवस.

Category:

 

‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले. ’कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌’ हे मोहन जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक. मोहन जोशी यांनी मराठी, हिंदीसह भोजपुरी आणि कन्नड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी आजपर्यंत २५० चित्रपटात काम केले आहे. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.

व्यक्ती-परिचय

मराठी लेखक सुहास शिरवळकर यांचा स्मृतिदिन.

Category:

 

सुहास शिरवळकर हे एक जबरदस्त लोकप्रिय लेखक होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘पुण्यापासून गोव्यापर्यंत आणि पुण्यापासून नागपूरपर्यंत मी चालत गेलो तर प्रत्येक गावात मला माझा चाहता भेटेल. मला हॉटेलात जेवावं लागणार नाही. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या ‘ दुनियादारी ‘ या पहिल्याच कादंबरीला भरपूर लोकप्रियता लाभली आणि लेखक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला.

व्यक्ती-परिचय

महाकवी कालिदास दिन

Category:

 

महकवी कालिदास यांचे वाङमय प्रसिद्ध असले, तरीदेखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यांच्याबद्दल एक लोककथेनुसार अशी आख्यायिका आहे की, विद्योत्तमा नावाच्या एका राजकुुमारीने जो तिला शास्त्रार्थात हरवेल त्याच्याशी लग्न करायचे ठरवले होते. राज्यातील सर्व विद्वानांना ती हरवते. तिचा सूड उगवण्यासाठी राज्यातील सर्वात मूर्ख व्यक्तीचा शोध घेऊन, त्याला जिंकवून तिचा विवाह लावून दिला जातो. कालांतराने हे जेव्हा तिला कळते तेव्हा ती व्यक्तीचा अपमान करते. ती म्हणते, ‘अस्ति कश्चित् वाग्‌विशेषः? आपल्या वाणीमध्ये काही विशेषत: आहे?’ राजकन्या रागात त्या व्यक्तीला हाकलून देते.

व्यक्ती-परिचय

ट्रॅजिडी किंग अभिनेते दिलीपकुमार

Category:

 

पेशावर मधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खान यांनी कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत मुंबईला आल्यावरही किशोरवयीन युसूफच्या तसे मनातही कधी आले नव्हते. उलट लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहून बारा मुले, इतर नातेवाईक आणि पै-पाहुण्यांचे करता करता थकून गेलेल्या अम्मीचे कष्ट काही प्रमाणात कमी करता यावेत यासाठी लवकरात लवकर कमावता होणे याच एका उद्देशाने झपाटलेल्या युसूफने एकदा वडिलांशी उडालेला खटका मनाला लावून घेत तिरमिरीत घर सोडून थेट पुणे गाठले.

व्यक्ती-परिचय

महाराष्ट्राची ‘मर्लिन मन्रो’ अभिनेत्री पद्मा चव्हाण

Category:

 

अभिनयासाठी आवश्यक असलेले बोलके डोळे, क्षणाक्षणाला चेहऱ्यावरती बदलणारे भाव व आकर्षक व्यक्तीमत्व हे सर्व गुण त्यांना लाभले होते. १९५९ मध्ये भालजी पेंढारकर यांनी ‘आकाशगंगा’ नामक चित्रपट तयार केला होता. त्या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि त्यांचा चंदेरी दुनियेत प्रवेश झाला.