व्यक्ती-परिचय

सर एडमंड हिलरी

Category:

 

हिमालयातील या सर्वोच्च शिखराला नेपाळी भाषेत सागरमाथा म्हणजे आकाशदेवता म्हटले जाते; तर तिबेटीमध्ये या शिखराला चोमुलुंग्मा म्हणजे विश्वदेवता म्हटले जाते. हिमालयाची भव्यता, तेथील गूढगंभीर आणि अंतर्मुख करणारे वातावरण, निसर्गाची हरक्षणाला पालटणारी रूपे आणि नजर बांधून ठेवणारे दिव्य सौंदर्य लक्षात घेतले तर ही नावे किती अर्थपूर्ण आहेत, हे ध्यानात येते. अशा या शिखरावर पाऊल ठेवावे ही तमाम गिर्यारोहकांची आकांक्षा असते. त्याची पूर्ती होणे अवघड आहे, हे माहीत असूनही असे स्वप्न पाहणारे अनेक असतात.

व्यक्ती-परिचय

गुग्लिएल्मो मार्कोनी

Category:

 

अनेक शास्त्रज्ञांनी हॅन्रिच हर्ट्झच्या बिनतारी संदेशांच्या प्रयोगांमधून हवेतून जात असलेल्या अदृश्य लहरींचे अस्तित्व स्वत:ही तसेच प्रयोग करून तपासले होते. त्यामुळे अशा लहरी आपल्या डोळ्यांना दिसत नसल्या तरी त्या प्रत्यक्षात असतात या विषयी कुणाच्याच मनात शंका नसायच्या. तसेच मॅक्सवेलनेही इलेक्ट्रोमॅग्नेटीक लहरींच्या संदर्भात मांडलेली समीकरणेसुद्धा पडताळून पाहतात येतात, हेही अनेक जणांना पटले होते. पण या सगळ्याचा उपयोग प्रत्यक्षात कुठे आणि कसा करता येईल हे मात्र कुणालाच उमगत नव्हते.

व्यक्ती-परिचय

ब्रूसली

Category:

 

ब्रूसलीच्या वडिलांनी ब्रूसलीच्या वयाच्या १८ वर्षी हाँगकाँग सोडण्याचा निर्णय घेतला. नाइलाजाने घेतलेला हा निर्णय मात्र ब्रूस लीचं आयुष्यच बदलवणारा ठरला. युनिव्हसिर्टी ऑफ वॉशिंग्टनमध्ये ड्रामा विषयात डिग्रीचं शिक्षण घ्यायला सुरूवात केली. शिक्षणाची गाडी सुरू असतानाच त्याच्यातलं मार्शल आर्ट्स मात्र त्याला स्वस्थ बसू देईना. अमेरिकेतच त्याने मार्शल आर्ट्स शिकवायला सुरूवात केली, तेव्हा त्याचं वय होतं १८.

व्यक्ती-परिचय

उस्ताद अली अकबर खान

Category:

 

उस्तादजींना त्यांच्या वडीलांकडून अनेक वाद्याचे प्रशिक्षण मिळाले पण ते सरोदकडे जास्त आकर्षित झाले .त्यांचे वडील अलाउदिन खान कडक शिस्तीचे होते. पहाटेच त्यांचे संगीताचे धडे सुरु होत ते अठरा तास चालत. उस्तादजी तबला आणि पखवाज त्यांच्या काकांकडून आफताबुददीन खान यांच्याकडून शिकले. सुप्रसिद्ध सरोद वादक तामीर बरन आणि सुप्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष यांच्याकडेही शिकले त्यावेळी ते शिबपूर येथे येत असत.

व्यक्ती-परिचय

मराठी शायर भाऊसाहेब पाटणकर

Category:

 

भाऊसाहेब पाटणकर यांना ‘ जिंदादिल ‘ भाऊसाहेब पाटणकर म्ह्णून ओळखले जात होते. मराठीत गजल मोठ्या प्रमाणात लिहली जात असताना स्वतंत्र शेर मात्र कमीच म्हणजे जवळ जवळ लिहीले जात नसत . गंमत म्हणजे गजलांचा सुकाळ व्हायाच्या आधी मराठीत उच्च दर्जाचे शेर लिहणारा एक जबरदस्त शायर निर्माण झाला होता तो शायर म्हणजे भाऊसाहेब पाटणकर ते यवतमाळ येथे रहावयास होते.

व्यक्ती-परिचय

क्रांतिकारक मंगल पांडे

Category:

 

३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती. मात्र १९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. मार्च २९, १८५७ रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. “मर्दहो, उठा !” अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, “आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा ! तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे !! चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निःपात करा!!!”

व्यक्ती-परिचय

जयंत नारळीकर

Category:

 

आपल्या भारत देशाने जगाला अनेक गणितज्ञ आणि खगोल वैद्यानिक दिले आहेत. अश्या थोर असामी पैकी एक आहेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर हे एक थोर शास्त्रज्ञ तर आहेतच पण उत्तम लेखकही आहेत. त्यांनी फक्त विज्ञान विषयावर गंभीर पुस्तकेच नाही लिहिली तर विज्ञानाची छटा असलेल्या कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या आहेत. जयंत विष्णू नारळीकर यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या.

व्यक्ती-परिचय

प्रा. रंगनाथ पठारे

Category:

 

प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीस हून अधिक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात.

व्यक्ती-परिचय

मृणाल सेन

Category:

 

मृणाल सेन याना इतकी जगभरातून अवॉर्ड्स मिळाली आहेत त्याची यादी काढायची झाली तर खूप मोठी होईल. त्याच्या अवॉर्ड्स मिळालेल्या चित्रपटांची नावे भुवन शोम , चोरस , मृगया , अकलेर संधने , कलकत्ता ७१ , खरजी , पूनासचा , आकाश कुसुम , अंतरेंन , ओका ओरी कथा , परशुराम , एक दिन प्रतिदिन ,खंडहर , एक दिन अचानक ह्या चित्रपटांना वेगवेगळ्या कामाबद्दल अवॉर्ड्स मिळली आहेत. मृणाल सेन यांनी अनेक डॉक्यूमेंटरीज बनवल्या आहेत. मृणाल सेन याना १९७९ साली पदमभूषण अवॉर्ड मिळाले , तर २००५ साली दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाले .

व्यक्ती-परिचय

सुप्रसिद्ध अभिनेते वसंत शिंदे

Category:

 

वसंत शिंदे यांनी १९४६ पासून १९९६ पर्यंत ४० दिग्दर्शकांकडे कामे केली अगदी दादासाहेब फाळके यांच्यापासून संजय सुरकरपर्यंत जवळ जवळ सर्वच म्हणावे लागतील. त्यांना ‘ सांगत्ये ऐका ‘ या चित्रपटासाठी ‘ दादासाहेब फाळके गौरवचिन्ह ‘ मिळाले, तर नाटक आणि चित्रपट यांच्यामधील भूमिकांसाठी ‘ दिनकर कामण्णा सुवर्णपदक ‘ मिळाले , शांताबाई हुबळीकर पुरस्कार , बालगंधर्व पुरस्कार , चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.