व्यक्ती-परिचय

महान शास्त्रज्ञ मादाम मेरी क्युरी

Category:

 

पहिल्या महायुद्धात मॅडम क्युरी यांनी मोठे योगदान दिले. त्यांनी फिरती रेडिओग्राफीची एक मोटार तयार केली आणि अनेक जखमी सैनिकांवर उपचार केले. या मोटारीकरिता लागणारी ऊर्जा रेडियम निस्सारणातून निर्माण होणा-या रंगहीन वायूमधून मिळत असे. हा वायू म्हणजे रेडॉन हे नंतर समजले.

व्यक्ती-परिचय

कार्टून्स ‘स्कूबी डू’च्या जनकांपैकी एक केन स्पिअर्स

Category:

 

स्कूबी हा कुत्रा आणि त्याला पाळणारे मित्रमंडळ, कोठेही काही चुकीचे घडत असेल तर तेथे पोहोचते पण दांडगटांपुढे आपले काही चालणार नाही असे त्यांना वाटत असतानाच स्कूबीच्या करामतींमुळे, दुष्टांना धडा शिकवला जातो, अशा स्वरूपाची ही मालिका मुळात जॉन केनेडींच्या हत्येनंतर, ‘चित्रवाणी सचेतपटांमध्ये फार हिंसाचार असतो’ या तक्रारीला उत्तर म्हणून सुरू झाली.

व्यक्ती-परिचय

कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन

Category:

 

कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला.

व्यक्ती-परिचय

’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील लक्ष्मीकांत

Category:

 

बऱ्याचदा लक्ष्मीकांतजींना ‘चाल’ लावण्यास विशेष आनंद वाटे, सोपी चाल हे त्यांचे वैशिष्टय़. ‘सरगम’चे परबत के उस पार, ‘खलनायक’चे चोली के पीछे क्या है, ‘हम पाँच’चे आती है पालखी सरकार की, ‘एक दूजे के लिए’चे हम बने तुम बने, ‘हम’चे जुम्मा चुम्मा दे दे ही उदाहरणे पुरेशी आहेत.

व्यक्ती-परिचय

प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

Category:

 

गिरीश कर्नाड दिग्दर्शित ‘चेलुवी’ या कन्नड सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणा-या सोनालीने केवळ देशांतच नव्हे, तर परदेशातही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

व्यक्ती-परिचय

शाहीर अनंत फंदी

Category:

 

अनंतफंदीस “फंदी” नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले

व्यक्ती-परिचय

मराठी चित्रपट अभिनेता अभिनय बेर्डे

Category:

 

अभिनय बेर्डे ने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केला. मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनयला ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होते.

व्यक्ती-परिचय

जयपूर अत्रोली घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. दिनकर पणशीकर

Category:

 

‘कट्यार काळजात घुसली’ नाटकात पं. वसंतराव देशपांडे यांच्यासमवेत भूमिका साकारण्याची संधी पं. दिनकर पणशीकरांना लाभली. ‘आडा चौताला’ सारख्या कमी प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या २०० बंदिशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी बहुमूल्य ठेवा मानला जातो.

व्यक्ती-परिचय

मराठमोळे चित्रकार वासुदेव गायतोंडे

Category:

 

इन्स्टिट्यूटसमोरच्या बाकावर बसून समुद्राकडे पाहत गायतोंडे तासन्तास चिंतन करत. नाट्य, नृत्य, चित्र अशा सर्व कलांमध्ये काहीतरी नवीन करू पाहणार्यात कलाकारांचा इथे राबता असे आणि परस्परांत संवादही असे. गायतोंडे इथेच अल्काझी, विजया मेहता इत्यादींच्या संपर्कात आले.

व्यक्ती-परिचय

प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे

Category:

 

शून्यातून उद्योग सुरू करून त्यांनी गरवारे मोटर्स, गरवारे नायलॉन्स, गरवारे प्लॅस्टिक्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन, गरवारे वॉल रोप्स अशा अनेक कंपन्या त्यांनी स्थापन केल्या.