भुरळ घालणारा निसर्ग
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितआजच्या धावत्या आयुष्यातील सर्वात मोठी कमतरता म्हणजे वेळेचा अभाव.परंतु कधीकधी वेळ लागतो परंतु बोलण्यासाठी पुरेसे नसते. तो दिवस होता जेव्हा आमच्या ऑफिसचा कॉफी ब्रेक होता.जेमतेम दुपारी १२ वाजले असतील पण तो आमच्या ऑफेसचा कॉफीची वेळ.
Category:
लेखसंग्रहआजकाल कोणतीही वस्तु विकत घेण्यासाठी घराबाहेर पडून बाजारात जावेच लागते असे काही नाही. आजच्या डिजिटल युगात टाचणी पासुन फ्रिज पर्यन्त जवळपास सर्व गोष्टी ऑनलाईन घरी मागवणे शक्य झाले आहे. अगदी हॉटेल मध्ये जाऊन जेवण्याची जरी इच्छा झाली तरी ऑनलाईन जेवणच घरी मागवणे शक्य आहे आज.
Category:
साहित्य - ललितदेश, संस्कृती, भाषा, वेषभूषा, रहाणीमान आणि आचार-विचार अशा सगळ्याच आघाड्यांवरती एक वेगळेपण मिरवणारे हे जपानी. जपान देशाने त्यांचं वेगळेपण खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा जपलेले आहे. जगभरात जपानी खाद्यपदार्थ खुप लोकप्रिय आहेत हे आपण जाणतो. आजकालच्या लहानग्यांना आणि नवीन पिढीला नारुतो, डोरेमॉन इत्यादी पात्रांद्वारे जपानच्या संस्कृतीबद्दल किंवा भाषेबद्दल माहिती झालेली आहे.
Category:
साहित्य - ललितरागिणी ती डायरी पाहून विचारात पडली, नचिकेत ने यापूर्वी तिला कधीच या डायरी बद्दल सांगितले नव्हते वा तिनेही कधी त्याच्या जवळ ती पाहिली नव्हती. त्या डायरीत काय लिहिलं असणार या विचाराने तिचं कामात लक्षच लागत नव्हतं. मनात कल्लोळ सुरू होता. स्वतःशीच पुटपुटत ती विचारात गुंतली होती. कसेबसे तिने काम आटोपले आणि डायरी घेऊन ती बेडवर बसली.
Category:
साहित्य - ललितविदेशी नि त्यातल्यात्यात पाश्चिमात्य संस्कृतीबद्दल माझ्या मनात गैरसमजाचं काहूर माजलं होतं. पारतंत्र्याच्या काळात भारतीयांवर इंग्रजानी केलेल्या अन्याय, अत्याचारांमुळे त्यांच्याविषयी मनात घृणाच अधिक होती. परंतु सगळेच गोरे तसे नसतात याची अनुभूती कॅनडातील गोऱ्या लोकांच्या बाबतीत मला आली. अनेक चांगल्या, अनुकरणीय गोष्टी इथे पहायला मिळाल्या नि शिकता आल्या. त्यांची आगळी संस्कृती अनुभवता आली.
Category:
साहित्य - ललितविदेशदौरा नि तोही विमानातून ……! विचारच न केलेला बरा. सगळे कल्पने पलिकडचे, स्वप्नवत वाटावे असेच ! शेजारच्या शहरात जायचे म्हटले तरी दहा वेळा विचार करावा लागायचा. खर्चाचा कधी ताळमेळ बसायचाच नाही. जग आज प्रगत झालंय, माणूस चंद्रावर जाऊन पोहोचलाय. मंगळ, शुक्राचा तो वेध घेतोय …….. तिथे विमानातून विदेशदौरा, ही तशी आज सामान्य गोष्टच ! त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारणही नव्हते. पण आम्हा सामान्य माणसांच्या दृष्टीने ही गोष्ट तशी मोठीच !
Category:
साहित्य - ललितपरमेश्वर कोणाला भरभरून प्रतिभा देईल सांगता येत नाही.काही जणांना आपल्याकडे प्रतिभेच लेणं आहे याची जाण असते तर काहीना आपल्याकडे प्रतिभा आहे याची जाणीवच नसते. सुदैवाने शांताबाईकडे ह्याची जाणीव फार लवकर झाली. कॉलेज मध्ये असतानाच शांताबाई कवितेकडे वळल्या.
Category:
साहित्य - ललितमंत्रोच्चारयुक्त जप हा झाला आध्यात्मीक उपासनेचा एक भाग.मनुष्य जेव्हा रोग व्याधींनी त्रस्त होतो तेव्हा त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज भासते व तो दैवी शक्तीच्या उपासनेकडे वळतो.आपणास आरोग्य देतो “सुर्य “व मारक शक्ती ही त्याचाच पुत्र “यम “याकडे असते.त्या दोघांचा कर्ता शिव.म्हणुनच त्यांच्या कृपेच्या अपेक्षेत गायत्री व मृत्युंजय मत्रांचे अनन्य महत्व आहे.मृत्यु अटळ असला तरी त्याच्या अनुषंगाने अवती- भोवतीच्या स्नेहजनांना येणार्या भितीवजा वलया ला सुसह्य करता आले तरी तो जणु मृत्यूवर विजयच म्हणजे “मृत्यूंजय” ह्या कल्पनेवर आधारित प्रस्तुत लेखात विद्यमान परिस्थीतीचा आढावा घेत विविध दृष्टीकोनांना हाताळीत, मृत्युनंतर काय ह्या प्रश्नचिन्हाला अलगद स्पर्श केला आहे.
Category:
साहित्य - ललितभारतातील सर्वच प्रमुख नद्यांच्यामागे एखादी लोककथा (दंतकथा) दडलेली आहे. अशीच लोककथा नायगारा धबधब्याच्या बाबतीत असेल का याचा मी विचार करीत होतो. अमेरिका, कॅनडा ही प्रगत राष्ट्रे ! विज्ञान क्षेत्रात त्यांची प्रगती उल्लेखनिय ! त्यामुळे अशा निराधार दंत कथांवर त्यांचा विश्वास नसावा, अशीच माझी भावना! त्यामुळे नदी किंवा धबधब्याबाबत अशी एखादी लोककथा प्रचलित असेल असे मला वाटले नाही. परंतु बोटीत बसून धबधब्याजवळ जाताना कुणीतरी ‘मेड ऑफ दी मिस्ट’ असा शब्दोच्चार केल्याचे मी ऐकले. ही ‘मेड ऑफ दी मिस्ट’ काय भानगड आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली; अधिक चौकशीअंती ती एक लोककथा असल्याचे समजले.
Copyright © 2025 | Marathisrushti