साहित्य - ललित

व्यंकटेश माडगुळकर – हरहुन्नरी लेखक

Category:

 

नवकथा लेखकामध्ये ज्यांनी पन्नाशीच्या दशकात मराठी कथेला वेगळ वळण दिलं त्या लेखकांच्या नामावलीत व्यंकटेश माडगुळकर याचं नाव अग्रस्थानी आहे. किंबहुना ना.सी. फडके यांच्या चाकोरीबद्ध प्रेमाच्या  आणि वि.स.खांडेकर यांच्या ध्येयवादी नायकांच्या कथांमध्ये अडकलेल्या मराठी कथेला वेगळ रूप दिलं. मराठी कथेला सामान्याची कथा बनवली

साहित्य - ललित

हुक्का पार्लर

Category:

 

नाम्या शेट बाहेरून लॉक लावलेल्या खोलीच्या दरवाजाला असलेल्या ग्रील पलीकडे बोंबलणाऱ्या स्वतःच्या वीस वर्षाच्या मुलाकडे असहायपणे बघत होता. त्याच्याकडे बघता बघता त्याला हुंदका अनावर झाला.

साहित्य - ललित

एस टी डेपो – तुमचा माझा सर्वांचा

Category:

 

महाराष्ट्रातल्या एसटी डेपोचा चेहरा एकसारखा असतो, किंबहुना तो वेगळा  नसतोच. मोठ पटांगण. त्याच्या एकाबाजूने एसटी येण्याचा मार्ग, दुसऱ्या बाजूने बाहेर जाण्याचा मार्ग व मध्यभागी डेपो. येण्याच्या मार्गाच्या सुरवातीला उसाच गुऱ्हाळ, त्याच नाव कनिफनाथ रसवंती गृह. मालक फडतरे बंधू, मला न उलगडलेलं एक कोडं आहे की सगळ्याच उसाच्या गुऱ्हाळाची नावं कनिफनाथ व मालक फडतरे बंधू का ?

साहित्य - ललित

पावसाचे संदर्भ…

Category:

 

रिमझिम पाऊस चालू असताना झाडांनी आपले कांद्याचे हात पसरून घ्यायला सुरुवात केलेली.. जिकडे तिकडे ओली ओली माती मधूनच वा-याची गार लहर.. अगदी अंगावर शहारे आणणारी… आसपासच्या नदी नाल्यात खळखळ सुरू झालेली.. भिजलेल्या पाखरांचे फांदी आड दडणे.. वाऱ्याच्या लहरीने झाडांचे शहारणे.. या गोष्टी जितक्या सूक्ष्म निरीक्षणातून येतात तितक्याच त्या सुंदर वाटतात..

साहित्य - ललित

ती ‘खूप काही’ करते..

Category:

 

तिच्या नकळत ‘ती’ काय काय करते याची जाणीव तिलाही नसते..तेव्हा, अशी आपली एखादी ‘गृहिणी’ मैत्रीण, बहीण, शेजारीण आपल्याला भेटली तर ‘ती’ काही करत नाही असं म्हणून तिला दुखावण्यापेक्षा ‘ती’ खूप काही करते हे तिला सांगुया..’ती’ एक शक्ती तत्व आहे याची तिला जाणीव करून देऊया.

साहित्य - ललित

किशोरची ‘किमया रोबोटिक्स’

Category:

 

झूम मिटिंग संपवून किशोर आपल्या आलिशान केबिन मधील खुर्चीत विसावला. गेल्या महिन्या दोन महिन्यात जगात खूप उलथापालथ घडली होती आणि त्याचे परिणाम साऱ्यांनाच भोगायला लागत होते. किशोरची ‘किमया रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ ही मुख्यत्वेकरून ऑटोमोबाईल च्या क्षेत्रात काम करणारी कंपनी सुद्धा त्याला अपवाद नव्हती. शून्यापासून प्रवास करून तो येथवर पोहचला होता. प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्ती च्या बळावर आतापर्यत त्याने जे स्वप्न पाहिले होते ते यशस्वी करत आणले होता.

साहित्य - ललित

जिकडे तिकडे खड्डेच खड्डे..!

Category:

 

भूतलावर कोठेही जा खड्डा पाहायला मिळतोच या खड्ड्याला ना देशाचे बंधन असते ना प्रांताचे ना प्रदेशाचे.. फरक एवढाच की कुठला खड्डा मोठा असेल तर कुठला लहान… कुठला खड्डा मुद्दामहून पडलेला असेल तर कुठला निसर्गतः तयार झाला असेल.. अशी खड्डा निर्मितीची खूप कारणे सांगता येतील..

साहित्य - ललित

कोकण – ग्रीष्माचे आणि पावसाळ्याचे

Category:

 

कोकणी माणूस  दणक्यात होळी साजरा करून सुखावलेला असतो. चैत्राचे आगमन होते. चैत्रपालवी झाडांवर फुलू लागलेली असते. चैत्र संपून वैशाख सुरु होतो. कोकणाला उन्हाचे चटके जाणवू लागलेले असतात. मातीचा लाल रंग उठून दिसू लागतो…….