साहित्य - ललित

बालरंगभूमी माझ्या नजरेतून- (भाग १-प्रस्तावना)

Category:

 

१९७९ साली पहीलं बालनाट्य लिहीलं तेंव्हापासून बालरंगभूमीशी माझं नात जुळलं. रंगदेवतेच्या कृपेने गेली ४१ वर्षे बालरंगभूमी वर कार्यरत राहून बाल मनोरंजनाचे कार्य करत आहे. बालरंगभूमीच्या सहवासात चार दशके राहील्यावर मला जे दिसलं, जाणवलं, ते माझ्या शब्दातुन मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

साहित्य - ललित

आदिवासी मुलींच्या सान्निध्यात (उगवता छत्तीसगड – Part 6)

Category:

 

आदिवासी तरुण मुली व बाया बांबूच्या आकर्षक वस्तू बनिविण्याचे १५ दिवस शिक्षण घेऊन परत आपआपल्या खेड्यात व्यवसाय चालू करणार होत्या. ते सर्व विकण्याची जबाबदारी खाजगी कंपनी घेणार होती. बाई प्रांज्वळपणे सुरेख हिंदीत सर्व माहिती देत होत्या. प्रशिक्षण देणाऱ्या बाईंना मुंबई बद्दल कुतहूल होते.त्यात आम्ही विमानाने आलो, म्हणजे आकाशातून कसे आलो ह्या बद्दल त्या निरागसपणे प्रश्न विचारत होत्या.

लेखसंग्रह

शिवरायांनी केलेली जगातील सर्वोतम गुंतवणूक

Category:

 

आपण असं शिकायला हवं जणू आपण नेहमीसाठी जगणार आहोत आणि असं जगायला हवं जणू उद्याच मरणार आहोत. विद्येसारखा बंधू नाही. विद्येसारखा मित्र नाही. विद्येसारखे धन नाही, आणि विद्येसारखे सुखही नाही.

साहित्य - ललित

कंगोरा घाटी राष्ट्रीय उद्यान (उगवता छत्तीसगड – Part 5)

Category:

 

जंगलातील एक रस्ता कोटमसार गुहे कडे जातो. या गुहा हे एक नैसर्गिक गूढ आहे. १९०० सालात ह्या गूढ गुहेचा प्रथम शोध लागल्याची नोंद आहे. ह्या गुहेच्या अंतर्भागातील माहितीची नोंद कुठेही नसल्याने  ही गुहा अज्ञानातच राहिली. १९५१ साली निसर्ग संशोधक डॉ.शंकर तिवारी यांनी ह्या गूढ गुहेच्या खाली उतरून त्याचा सखोल अभ्यास केला. ही गुहा जमिनीखाली ३०० मीटर असून तळाला रुंदी २० ते ७२ मीटर इतकी विशाल आहे.

साहित्य - ललित

बस्तरचा दशहरा  सोहळा (उगवता छत्तीसगड – Part 4)

Category:

 

जगदलपुर मधील धरमपुर भागात उभारलेले विभागीय मानववंशशास्त्र संग्रहालय (zonal anthropological museum Z.A.M.) म्हणजे छत्तीसगडराज्याच्या मुकुटातील मानाचा तुरा आहे. मानव वंशशास्त्र, त्याचा विकास व संस्कृती शास्त्र या विषयावर आधारीत बस्तर मधील विविध आदिवासी जमातीचा जिवंत वाटणारा इतिहास म्हणजे विभागीय मानववंशशास्त्र संग्रहालय. ह्या संग्रहालयात आदिवासींचे अनेक पुतळे आहेत. त्याच बरोबर आदिवासींची घरे, त्यांचे दाग दागिने, शेतीची अवजारे, प्राण्यांची शिकार करण्याची आयुधे, शिकार केलेल्या प्राण्यांची डोकी, शिंगे, नदीत चालणाऱ्या होड्या, मासे पकडण्याची अनेक तऱ्हेची आयुधे या सर्व गोष्टी भव्य दालनात काचेच्या कपाटात  मांडलेल्या आहेत.

साहित्य - ललित

बस्तर परिसर (उगवता छत्तीसगड – Part 3)

Category:

 

जंगलाचे वरदान असलेला ह्या  बस्तर प्रदेशात अनेक औषधी वृक्षांच्या जाती, विविध प्राणी व पक्षी आढळतात. ह्या सर्वांचा आदिवासीच्या जीवनाशी निगडीत संबंध आहे. बस्तर प्रदेशातील अदिवासींचे  जीवन जंगलावर अवलंबून आहे. बस्तर भागातील आदिवासींच्या मुख्य जमातीची नावे आहेत अबूज मारिया, बायसन  हॉर्न मारिया, भात्र, हलबा, गद्वा, आणि गोंडा. त्यांच्यात अनेक पोटजाती सुद्धा आहेत. विलक्षण किरटया आवाजात गायले जाणारे लोकसंगीत, बायसनचे (गवा) शिंग डोक्यावर बांधून केलेले “काकसर नृत्य” हा आदिवासी जीवनाचा अविभाज्य घटक आहे.

साहित्य - ललित

पुरखुती मुक्तांगण (उगवता छत्तीसगड – २)

Category:

 

हा संपूर्ण परिसर म्हणजे एखादे नन्दनवनच आहे. सूर्यास्ताच्या संधीप्रकाशात उजळून जाणारा जलाशय म्हणजे चित्रकाराचे दिवा स्वप्नच आहे असे वाटते.जलाशयाच्या बाजूनी उत्तम बाग, नाना तर्हेच्या फुलांचे,  हिरव्यागार झुडपांचे ताटवे ह्यांची लागवड केली आहे. हा नयनरम्य आनंद मनमुराद लुटण्यासाठी छत्तीसगडपर्यटन विभागाने  शिशवी रंगात राहण्यासाठी  प्रशस्त कॉटेजीस् तयार केली आहेत.

लेखसंग्रह

आजारपण.. नको रे देवा !

Category:

 

काही जुने किस्से सांगणार होते; पण फ्रेश स्टॉकसुद्धा तयार झालाय! …म्हणजे काय.. तर कोरोनातून अगदीच उठतोय आम्ही..! हा आजारपणाचा अनुभव माझ्या मुलींसाठी खास् होता. गेली दोन वर्षे घरात सुरक्षित राहून साधा सर्दी खोकला सुद्धा मुळी नव्हता, आणि आता झालं ते एकदम सगळंच! शिशुवर्गांत जायला लागल्यापासून अगदी नेमाने २-३ महिन्यांतून एकदा दोघी किंवा दोघींपैकी एक, कसलंसं इन्फेक्शन घेऊन यायची, आणि मग सगळं घर झोपायचं..! …सांगते! 🙂

साहित्य - ललित

अनवट पर्यटन – (उगवता छत्तीसगड – १)

Category:

 

मध्य प्रदेश राज्यातील दहा छत्तीसगढी आणि सहा गोंडी भाषिक दक्षिण-पूर्व जिल्ह्यांचे विभाजन करून १ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगड या राज्याची स्थापना झाली. रायपुर हे छत्तीसगड राज्याचे राजधानीचे शहर. छत्तीसकिल्ले असलेले राज्य म्हणून ह्या राज्याला छत्तीसगड असे नांव दिले. ह्या प्रदेशाचा इतिहास रामायण, महाभारत काळापासून होता. वैदिक आणि पौराणिक काळापासून छत्तीसगड अनेक संस्कृतीच्या प्रगती आणि विकासाचे केंद्र होते. येथील पुरातन मंदिरे आणि त्यांचे अवशेष असे दर्शवित आहेत की वैष्णव, शैव, शक, बौद्ध संस्कृतीचा विविध काळात ह्या प्रदेशावर प्रभाव होता.