साहित्य - ललित

शर्यत ????

Category:

 

‘ससा कासव शर्यतीची परंपरा’ पुन्हा सुरु करण्यासाठी, आम्ही कुठला ही त्याग करायला तैयार आहोत. आम्हाला सस्यांनी सुचवलेले फेर-बदल मान्य आहे. स्पर्धेत, ससा जिंको किंवा कासव, परंपरा अक्षुण, राहिली पाहिजे, हे महत्वपूर्ण. सर्व सभासदांनी साधु-साधु म्हणत, कासव राजाच्या उदात्त विचारांचे स्वागत केले. नंदन वनात शर्यतीची तैयारी सुरु झाली…या वेळी कोण जिंकणार ????

साहित्य - ललित

एकाकिंका : मला काय त्याचे? (भाग ४)

Category:

 

अन्यायाच्या आणि अत्याचारांच्या निर्दयी पाषाणांनी बांधलेल्या उंच उंच भिंतींमुळे माझ्या मनातल्या आशा गुदमरुन पडल्यात. तिची अस्पष्ट साद भिंतींआडून माझ्या कानावर येऊन आदळते आणि माझे दुःख अनावर होतात. माझी ताई…. माझी ताई… आई बाबा वारल्यानंतर माझ्या ताईनेच माझा सांभाळ केला. माझं शिक्षण पूर्ण केलं, एवढंच नाही तर माझं लग्नही लावून दिलं. माझ्यासाठी तिने स्वतः लग्न नाही केलं. पुष्कळ त्याग केला रे तिने आमच्यासाठी. आम्ही सगळे सुखी होतो आणि एक दिवस आमच्या सुखाला कुणाची तरी नजर लागली.

साहित्य - ललित

एकांकिंका : मला काय त्याचे? (भाग ३)

Category:

 

रामाने सीतेला सोडलं, रामाने सीतेला सोडलं हा एकच मंत्र आम्ही जपत आहोत. रामाने सीतेचा स्वीकार केला तर त्या युगातल्या लोकांना त्रास झाला आणि रामाने सीतेचा त्याग केला तर ह्या युगातल्या लोकांना त्रास होतोय. अरे मग रामाने करायचं काय? सीतेचा त्याग केल्यानंतर श्रीरामांनी परस्त्री सहवास धरला नाही. उलट रघूकुळातल्या पुरुषांच्या मनात सुद्धा परस्त्री येणार नाही असा आदर्श प्रभूरामचंद्रांनी घालून दिलाय, ह्याकडे कोण पाहत नाही. आणि न्यायाची भाषा न्यायाच्या दलालांनी करु नये.

साहित्य - ललित

एकांकिका : मला काय त्याचे? (भाग २)

Category:

 

मोहन – कसं असतं मित्रा, कलाकार एखादी भुमिका करत असताना त्या भुमिकेशी एकरुप असणं गरजेचं असतं, परंतु त्याच क्षणी त्याला हे कळलं पाहिजे की त्याची व्यक्तिगत आयुष्यातली भुमिका वेगळी आहे. नाहीतर त्याचा मनावर परिणाम होतो, याला सरळ साध्या सोप्या भाषेत, वेड लागणं असं म्हणतात.

विनायक – अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी वेडा आहे. 

साहित्य - ललित

एकांकिका : मला काय त्याचे? (भाग १)

Category:

 

त्यावेळी मी केवळ ५ वर्षांचा होतो. माझी आई थकलेल्या हातांनी मला जेवण भरवत होती “हा घास काऊचा, हा घास चिऊचा, हा घास….”… आणि अचानक वादळ यावं असं कुणीतरी आलं नि मला गर्रकन भिरकावून दिलं. क्षणभर कळलंच नाही काय झालं? मी रडत होतो हुंदके देत होतो. डोक्यातून घळाघळा रक्त वाहत होतं. मला काहीच कळत नव्हतं, काही कळण्यासारखं ते वय नव्हतं. चार-पाच जण माझ्या आईला काहीतरी करत होते. मी मात्र काहीच करु शकलो नाही. केवळ आई आई म्हणून विव्हळत होतो. कळायला लागलं तेव्हा कळलं की माझ्या आईवर धर्मांधांनी बलात्कार केला होता. आईईईई आईईईई (मोठ्याने रडतो)…

साहित्य - ललित

कविता, मीटर आणि मी

Category:

 

आजचे प्रश्न कवितेच्या माध्यमातून उभे करू थोडे ही यश मिळाले, तर काही मिळविण्याचे समाधान नक्कीच मिळेल. मग कविता मीटर मध्ये असो किंवा नसो.

साहित्य - ललित

औषध

Category:

 

मी खोकल्यावरील गोळ्या घेण्यासाठी एका औषधाच्या दुकानात गेलो. दुकानदाराला म्हणालो मला 2 गोळ्या दे ! त्याने मला 5 गोळ्यांच पाकीट दिल आणि पैसे सुट्टे नसल्याच कारण पुढे केलं. मी त्या गोळ्या घेणच नाकारल आणि निघून आलो. मला दोन गोळ्यांची गरज असताना मी पाच गोळ्या विकत घ्याव्याच का ?

साहित्य - ललित

वृक्षांचे देवत्व

Category:

 

वृक्षांच्या रक्षणासाठी वृक्षांवर देवतांचे निवास स्थान आहे, ही परिकल्पना लोकांच्या मनात रुजविण्यचा प्रयत्न आपल्या प्राचीन ऋषिंनी केला. वट वृक्षावर –ब्रह्मा, विष्णु आणि कुबेर….