साहित्य - ललित

मसनातलं जिनं

Category:

 

भर दुपारची येळ व्हती.वर आभाळातुन सुर्य आग वकत व्हता.उन्हाळ्याचे दिवस आसल्यानं सगळा परिसर भकास दिसत व्हता.रस्त्यानं चिट पाखरूबी नवतं.आश्यात शिवराम मसनजोगी,त्याची बायको शेवंती,पोरगी सारजी आन पोरगं पिर्‍या बाभळगावच्या दिशेनं निंघाले होते.

साहित्य - ललित

सोंग

Category:

 

पिंट्या अन बाळ्या दोघं लय जिगरी दोस्त व्हते.दोघबी शेजारी शेजारीच राहायचे.एकाच वयाचे आसल्यानं ते शाळत बी संगमंगच व्हते.जिवणातल्या जवळपास सगळ्याच उन्हाळ्या पावसाळ्यात ते साथीलं व्हते.नेहमी एकमेकांचे सुख दुख वाटुन घेयाचे.तेह्यचे लग्न बी दहा पंधरा दिवसांच्या अंतरानच झाले व्हते.

साहित्य - ललित

मोरे चं मोर

Category:

 

गावाच्या खालतुन गायरानातल्या जंगलात दोन-चार पारद्यायचे पालं पडले व्हते.पालं ठोकले की शिरस्त्यापरमाणं त्या पारद्यायनं पाटलाच्या घरी जाऊन आपली नावं नोंदवली.त्या काळात बाहेरचं कोणी गावात राह्यालं आलं की त्याची नोंद पाटलाकडं करायचे..

साहित्य - ललित

बर्म्युडा

Category:

 

जवळपास सगळ्या शहरात हे चित्र दिसते. पनीर पिझ्झा खाऊन गुबगुबीत झालेलं कुत्रं मालकासोबत डुलत डुलत अख्ख्या कॉलनीत फिरून वजन हलकं करूनच घरी जातं. त्याच्या सर्व विधी आटोपतांना मालकाच्या चेहर्‍यावर इतके संतुष्टीचे भाव उमटतात की जणू काही त्यांचाच भार कमी झालाय.

साहित्य - ललित

श्वेतांबरा

Category:

 

आज नवरात्रीचा दुसरा दिवस..देवी ब्रह्मचारिणीचा.. देवी ब्रह्मचारिणी म्हणजे देवी पार्वती. शंकरदेवांना प्राप्त करण्यासाठी पार्वतीने घोर तपश्चर्या केली..साहजिकच या काळात ती शुभ्रवस्त्र परीधान करीत असे.. म्हणूनच आजच्या दिवशी महिला पांढरेवस्त्र परीधान करून देवी ब्रह्मचारिणीची पूजा करत आहेत..

साहित्य - ललित

बहु काय बोलू आतां..?

Category:

 

मराठीची पताका क्षितिजापार नेऊन ठेवणारी ज्ञानशलाका म्हणजे ज्ञानेश्वरी.. महाराष्ट्र शारदेच्या चरणी तिच्या सुपुत्राने अर्पण केलेलं सदोदित सहस्त्रदलकमल म्हणजे ज्ञानेश्वरी, माऊलीच्या कळवळ्याने भक्ती-ज्ञानाचा साक्षात अमृतार्णव पाजणारी चिद्विलासी अखंडता म्हणजे ज्ञानेश्वरी.

साहित्य - ललित

जत्रा

Category:

 

मोठ्याबाबा हे आमचं खांबे गावचे ग्रामदैवत! कायम सुखा दुःखाला आम्ही त्याला साकडं घालणार “यंदाचा पाऊस, कसा? काय? किती? कधी? कोणत्या नखितरात ? पिकं कोंती करू? दुखणं, बहानं, पोरा पोरींच्या लग्नाच्या अडचणी, सासु सुनाचा तंटा, पोरीचा सासुरवास ” या सगळ्या गोष्टींना आम्ही तिथं देवापुढे गाऱ्हाणं मांडायचं अन् मग तिथून एकदा हिरवा देवानं कंदील दिला की तसं घडलंच समजायचं. म्हणून सगळ्यांचा तिथं जाम विश्वास बसलेला.

साहित्य - ललित

कॅाफी पुराण

Category:

 

घरी कॅाफी व्हायची ती फक्त भजनी ग्रूप घरी येणार असेल तेव्हा!किंवा अजिबात कधीही चहा न प्यायलेले, “फक्त कॅाफीच” पिणारे पाहुणे घरी येणार असतील, तेव्हा!तेव्हाही शेजारच्या वाण्याकडून कॅाफी पावडर आणायची आणि साधी कॅाफि बनवायची!
भजनी मंडळाच्या वेळी मात्र छान दाट, ताजी वेलची , जायफळ पावडर घालून, खास कॅाफी बनवली जायची! मला ती गोड कॅाफी आवडायची, आणि जास्ती ती उकळत असतांनाचा वास आवडायचा!.. इतकंच माझं कॅाफी बद्दल प्रेम आणि ज्ञान !
जेव्हा कॅाफी बाटल्यातून, छोट्या साशा तून मिळायला लागली तेव्हा ब्रू,टाटा,नेस कॅफी अशी त्यांची नांवे कळायला लागली.

साहित्य - ललित

हाल्या भुसा खातो

Category:

 

पोळ्याचा सन दोन दिवसावर आलता.घरात अठरा विश्व दारीद्र्य.त्यात घरातला सगळा दाळदानाबी संपला व्हता.देवालं निवदालंपण दाळ,गुळ नव्हते.पहाटं उठल्या उठल्याच बायकोनं किरकिर कराया सुरवातं केलती.“मी हाय मनुन टिकली या घरात….” हे जगातलं सगळ्यात जास्त बोललं जाणारं वाक्य तीनं पुन्हा एकदा मलं फेकुन मारलं व्हतं..

साहित्य - ललित

मुंबापुरीच्या झुकझुक गाडीतले प्रवासी

Category:

 

लेखाचे शीर्षक वाचून म्हटलं असाल ना की काय पोरकटपणा आहे म्हणुन? अहो, आपला लोकल प्रवास जर शांतपणे आठवाल तर तुम्हांला जाणवेल की लहानपणी जे आपण जगायचो तेच बालपण आपण लोकल प्रवासात पण जगतो.