एकांकिकेला कथेचे “कलम”
Category:
साहित्य - ललितमागील आठवड्यात माझ्या शालेय मैत्रिणीच्या मुलीने फोन केला- पुढील महिन्यात तळेगांवला होणाऱ्या एका एकांकिका -वाचन स्पर्धेसाठी तिला (माझ्याकडे एखादी रेडिमेड असली तर ती किंवा नवी लिहिणं शक्य असेल तर नवी) माझी एक एकांकिका १५ ऑगस्टच्या आत हवी होती. पात्रं तीन हवीत आणि वाचन -कालावधी किमान एक तास ! ती “पुरुषोत्तम” आणि “फिरोदिया” वाली नवी पिढीची आणि मी एकांकिका -लेखन थांबवून २५ हून अधिक वर्षे झालेली.