साहित्य - ललित

आज सोचा तो…..’ – वाताहतीचे अर्काइव्ह !

Category:

 

“आत” मध्ये कोलाहल सतत सुरु असतात. दरवेळी नव्या सूर्याच्या स्वागताला बाहेरच्या अंगणात जाणं जमतंच असं नाही. तो सूर्यही तसा झाकोळलेलाच असतो. मागच्या परसदारातील किंचित काळोख्या तुळशीवृंदावनापाशी तिचा संयत सूर सापडतो. काल-परवा घडून गेलेल्या, पुसट न झालेल्या काळाच्या गोधड्या पुकारत असतात आणि त्यांच्या घट्ट उबेत बरंच काही पुनःपुन्हा साचत असतं, सापडतही असतं.

लेखसंग्रह

परिचय’ – नात्यांची नव्याने ओळख !

Category:

 

एकाच छताखाली राहणारी ,रक्ताचे नाते असणारी मंडळी एकमेकांना “परिचित “असतीलच असे नाही. सध्याच्या काळात तर हे ठळकपणे अधोरेखित होतंय. एक नितांतसुंदर ,कॊटुंबिक ,अभिनयसंपन्न चित्रपट म्हणजे “परिचय ” ! यात रूढार्थाने प्रेमकहाणी नाही ,खलनायक नाही , रक्त वगैरे चुकूनही नाही (नाही म्हणायला आजारी संजीवकुमार खोकतो ,तेव्हा रक्ताचे डाग दिसतात.) अढी ,गैरसमज ,अहंकार यामुळे निरगाठी पडलेली नातेवाईक मंडळी येथे अपरिहार्यपणे (आणि सुरुवातीलातरी मनाविरुद्ध ) एकत्र राहात असतात. त्यांचाही नियतीमुळे नाईलाज झालेला असतो.

कोशिश’ – शब्देविणू संवादू !
लेखसंग्रह

कोशिश’ – शब्देविणू संवादू !

Category:

 

“कोशिश” हा हिंदी नव्हें तर भारतीय चित्रसृष्टीतील मैलाचा दगड आहे. हा एकच चित्रपट करून गुलजार ,संजीवकुमार ,जया भादुरी आणि असरानी थांबले असते तरी चिरकाल आपल्या स्मरणात राहिले असते .नाही म्हणायला आपले प्रेक्षक म्हणून अपरिमित नुकसान झाले असते हा भाग अलाहिदा . कारण कोशिश नंतरही त्यांनी आपल्याला एकाहून एक नजराणे बहाल करून श्रीमंत करून टाकलेले आहे.

लेखसंग्रह

अंगूर’ – स्मितहास्याची प्रसन्न माळ !

Category:

 

विनोदाची खूप रूपे आहेत. मराठीजनांना “पुलंच्या “रूपाने निखळ विनोद काय असतो याचा प्रदीर्घ अनुभव आहे. ऍक्शन विनोद बऱ्याच जणांना आवडतो. द्वयर्थी विनोदानेही एकेकाळी धुमाकूळ घातला होता. प्रत्येक कलावंताची स्वतंत्र शैली असते. विनोदाचा शिडकावा दैनंदिन जीवनात कोणाला नको असतो? पण काहीतरी अंगविक्षेप करून /चाळे करून तात्कालिक हसू फ़ुटेलही पण गुलजारसारखी व्यक्ती तेथेही आपल्या अभिजाततेचा हात सोडत नाही. “अंगूर ” हा परिस्थितीजन्य विनोदाचा एक उत्तम नमुना आहे.

लेखसंग्रह

आली माझ्या घरी ही “शाळा “!

Category:

 

गेले काही महीने माझ्या घरात माझ्या नातीसाठी सकाळी नऊ ते अकरा चाळीस असा पहिलीचा वर्ग बसतो. चाळीस चिल्लीपिल्ली आपापल्या घरट्यातून स्वतःच्या घरून वर्ग घेणाऱ्या टीचरना हैराण करून सोडतात. नातीबरोबर मी वर्गाला बसतो- वही शोधून दे, पेन्सिलला टोक, पान नंबर हुडकून दे वगैरे मदतनीसाची कामे करत. मस्त मनोरंजन असतं ते आणि माझ्या आज्जी म्हणायच्या तसे “गुरं वळणं ! “

आठवणींचे निर्माल्य !
लेखसंग्रह

आठवणींचे निर्माल्य !

Category:

 

१९९६ साली माउलींच्या संजीवन समाधीला ७०० वर्षे पूर्ण झाली त्यावेळचे बरेच काही आठवत आहे. बाबा महाराज सातारकर यांचे वेल्हाळ “कैवल्याचा पुतळा ” बघणे/ऐकणे त्यावेळी मस्ट होते. माऊलींची लडिवाळ भाषा बाबा महाराजांनी अलगद टिपली आहे. प्रा. राम शेवाळकर यांच्या ओघवत्या आणि नादमयी भाषेत संत ज्ञानेश्वरांविषयी व्याख्यान ऐकायला मिळाले. येथेही पांडित्य नव्हते पण बरीच अज्ञात दालने खुली झाली. माउलींचा “योगी ” प्रवास दृगोच्चर झाला.

साहित्य - ललित

पुनर्निर्मिती ( रीक्रीएशन ) !

Category:

 

“सकाळ ” उघडला आणि आनंददायी वृत्त वाचले – ” अमेरिकन कवयित्रीला साहित्याचे नोबेल पारितोषिक ! ” चक्क काव्य या साहित्य प्रकाराला सर्वोच्च सन्मान !

साहित्य - ललित

नमकीन’- एक हरवलेली अभिजात कविता !

Category:

 

ग्रामीण संस्कृतीवर भाष्य करणारा हा चित्रपट – काहिसा दुर्लक्षित ! यात राजकारण नाही ,अतिरेकी नाहीत फक्त एक छोटासा जीव असलेले कथाबीज आहे. अशा विषयावर इतकी सुंदर चित्रकृती निर्माण करणे फक्त गुलजारसारख्या प्रतिभावंताला जमू शकते.

साहित्य - ललित

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – ६

Category:

 

घरच्यांना फसवून, क्लास बदलून राहणारे तरुणही कोटा फॅक्टरीत भेटतात. प्रत्येक ” ईशान अवस्थी “ला निकुंभ सर भेटत नाही इथे! दिवसरात्र क्लासमध्ये घालवल्यावरही इथे मुले एज्युकेशनल ऍप वरील लाईव्ह सेशन्स ऐकत असतात. प्रवेश घेतानाच क्लासने टाय-अप केलेल्या महाविद्यालयात अधून-मधून प्रयोग करायला जात असतात. पूर्ण दिवस क्लास केल्यावर महाविद्यालयात जायला वेळ/ऊर्जा कोठे? आणि तसही सगळं क्लासमध्ये कव्हर होतंच.

साहित्य - ललित

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – ५

Category:

 

उत्खनन करताना काही नाजूक,हळवे आणि कोवळे क्षणही सापडतात “या” कोटा गांवात ! वयच असं असतं या शहरातल्या लोकसंख्येचं की आपोआप तलम नातेबंध तयार व्हायला सुरुवात होते. ती अलगद कलाकुसर बघण्याची चीज आहे. अभ्यास हा जोडणारा स्वाभाविक सेतू असला तरीही स्पर्शाधारित नसलेलं कोवळिकीचं प्रेम येथे भेटतं. मुलींचं हॉस्टेल /पीजी सोय अर्थातच स्वतंत्र असलं तरीही वयापुढे/सहवासापुढे काही चालत नाही.