कापसाचे निम्मे क्षेत्र विदर्भात
Category:
शहरे आणि गावेकापूस हे विदर्भाचे मुख्य पीक असून राज्यातील ३२ लाख हेक्टरपैकी निम्मे म्हणजे १६ लाख हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे.
Category:
शहरे आणि गावेकापूस हे विदर्भाचे मुख्य पीक असून राज्यातील ३२ लाख हेक्टरपैकी निम्मे म्हणजे १६ लाख हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे.
Category:
शहरे आणि गावेप्रत्येक मोठ्या शहरात एखादा प्रमुख व्यापारी भाग असतो. राजधानी दिल्ली शहरात असा प्रमुख व्यापारी भाग आहे कॅनॉट प्लेस येथे.
Category:
शहरे आणि गावेजळगाव जिल्हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. याचबरोबर या जिल्ह्यात जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती तुप व तेल गिरण्या, अन्नप्रक्रिया उद्योग हे उद्योग मोठया प्रमाणावर चालतात.
Category:
शहरे आणि गावेगडचिरोली जिल्ह्याचा बराचसा भाग जंगलांनी व्यापला असल्याने येथील आदिवासींची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आदिवासींच्या घराला ‘टोळा’ असे म्हणतात. गोंड वस्तीच्या गावांमध्ये गावाच्या मध्यभागी ‘युवागृह’ असते.
Category:
शहरे आणि गावेऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती,मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे. येथील मसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघरच मानले जाते. या जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात.
Category:
शहरे आणि गावेकोल्हापूर जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात. सहकारी साखर कारखान्यांमुळे ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे. पश्चिमेकडील भागात मुख्यत: भात पिकतो. खरीप पिकांमध्ये मुख्यत: भाताव्यतिरिक्त ऊस, भुईमूग, सोयाबीन व ज्वारी, नाचणी काही प्रमाणात असतात. रब्बी पिकांमध्ये मुख्यत: ज्वारी, गहू आणि तूर ही पिके घेतली जातात.
Category:
शहरे आणि गावेगोविंदराव टेंबे हे ज्येष्ठ कलावंत कोल्हापूरचेच. श्री. टेंबे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट हार्मोनियम वादक होत. आजही त्यांचे नाव संगीत क्षेत्रात आदराने घेतले जाते. त्यांनी काही नाटकांतून अभिनयही केला, पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी नाटकातील पदांना शास्त्रीय संगीतावर आधारित उत्कृष्ट चाली दिल्या.
Category:
शहरे आणि गावेकोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा, लिंगायत, जैन व धनगर लोक मोठ्या संख्येने राहतात. ग्रामीण व शहरी लोकसंख्येचे प्रमाण अनुक्रमे सुमारे ७०% व ३०% आहे. यावरून जिल्ह्याचे ग्रामीण स्वरूप लक्षात येते. हा जिल्हा सधन मानला जातो.
Category:
शहरे आणि गावेकोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा आहे. त्याच्या पश्चिम-नैऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा, पश्चिम-वायव्येला रत्नागिरी जिल्हा, उत्तर-ईशान्येला सांगली जिल्हा तर दक्षिणेला कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची रांग असून तेथील भाग डोंगराळ आहे. भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे पश्चिम रांग , मध्य रांग आणि पूर्व रांग असे तीन विभाग मानले जातात.
Category:
शहरे आणि गावेकोल्हापुरातील श्रीमहालक्ष्मी मंदिर हे पूर्ण शक्तिपीठ तर आहेच, शिवाय ते स्थापत्य शास्त्रातील व कलेतील एक उत्तम प्रतीचा नमुना म्हणून गणले जाते. श्री महालक्ष्मीचे मंदिर कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti