लेखसंग्रह

माझी तत्वसरणी ःः विज्ञानीय दृष्टीकोनातून श्रीविष्णूचे दशावतार

Category:

 

श्रीविष्णूच्या या दशावतारात श्रीविष्णूचे अस्तित्व असावयासच हवे. कोणत्या स्वरूपात श्रीविष्णू, या दहाही अवतारात सामावलेले असतील? साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सजीवात आनुवंशिक तत्व म्हणजे जेनेटिक मटेरीअल अस्तित्वात होते. त्याच्यातच उत्क्रांती होतहोत कोट्यवधी प्रजाती उत्क्रांत झाल्या. शेवटी मानव अवतारातहि तेच उत्क्रांत आनुवंशिक तत्व अस्तित्वात आहे. याचा विज्ञानीय अर्थ असा की आनुवंशिक तत्वच, श्रीविष्णूच्या दहाही अवतारात श्रीविष्णूचे प्रतिनिधित्व करते. याचा सरळ सोपा अर्थ म्हणजे, आनुवंशिक तत्व म्हणजेच श्रीविष्णू. अध्यात्मात बुडालेले विज्ञान !!!

लेखसंग्रह

हवामानशास्त्र……..

Category:

 

सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इतर अनेक महत्त्वाची शास्त्रे सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडून दुर्लक्षित झालेली दिसतात. मात्र माहिती तंत्रज्ञानाची जोड या अनेक शास्त्रांना मिळाली आणि या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग सकारात्मकपणे केला तर ते मानवी जीवनासाठी उपयुक्त ठरते, हे हवामानशास्त्राद्वारे सिद्ध झाले आहे. सुनामी किंवा चक्रीवादळ, अतिपर्जन्यवृष्टी या सारख्या आपत्ती उद्भवण्यापूर्वीची सूचना सहज मिळते. याचे कारण म्हणजे प्रगत असे हवामानशास्त्र होय.

लेखसंग्रह

मीरा (MIRA)महासंगणक

Category:

 

मीरा (एमआयआरए) हा लॅटिन शब्द असून, त्याचा अर्थ आश्चर्यकारक वस्तू असा होतो. अमेरिकेला तिचे महासत्तापद टिकवायचे असेल तर एखादा मोठा शोध लागणे गरजेचे आहे. त्यासाठी अध्यक्ष बराक ओबामा लोकांच्या कानीकपाळी ओरडून भारत व चीनमध्ये महत्त्वाचे शोध लागायला नकोत असे सांगत आहेत

लेखसंग्रह

अश्मयुगापासून आजपर्यंत

Category:

 

आरशांचा उल्लेख रामायण-महाभारतातही आढळतो. ग्रीक, रोमन, आपली सिंधु संस्कृती यांच्या भरभराटीच्या कालखंडातही आरशांचा उपयोग होत असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. संथ जलाशयाच्या पाण्यात डोकावून पाहताना आपणच आपल्याकडे पाहत असल्याचं दिसल्यापासून ही जादू आपल्या घरच्या घरीच हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

लेखसंग्रह

अंतराळातून… संपूर्ण सूर्यदर्शन

Category:

 

सूर्यावर घडणार्‍या लहान-मोठ्या घटना पृथ्वीवर चुंबकीय वादळांसारखे परिणाम घडून आणतात. या घडामोडींचं स्वरूप विध्वंसात्मकही असू शकतं. या घडामोडींचं विश्लेषण अधिक तपशीलवार करता येण्यासाठी आपल्याकडे सूर्याचं त्रिमितीय चित्र असण्याची आवश्यकता आहे. एखादी सौरज्वाला उफाळली तर त्या सौरज्वालेचा विस्तार केवढा आहे, तिचा उफाळ किती व कोणत्या दिशेने आहे, सौरज्वालेतून किती प्रमाणात, कोणत्या दिशेने पदार्थ बाहेर उत्सर्जित केले गेले आहेत, ही सर्व माहिती अधिक वस्तुनिष्ठ स्वरूपात आपल्याला अशा त्रिमितीय चित्रावरून मिळू शकते. पृथ्वीवरील दुर्बिणींतून, तसंच अंतराळातील सोहोसारख्या यानांकडून सूर्याच्या पृष्ठभागाची छायाचित्रं सतत टिपली जात असतात.

लेखसंग्रह

दिवस घटला…!

Category:

 

जपानमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपानंवर पृथ्वीच्या प्रदक्षिणाकाळात घट होऊन दिवसाचा कालावधी कमी झाला आहे….. का?

लेखसंग्रह

चेर्नोबिल दुर्घटना

Category:

 

अणुविद्युत्निर्मितीमध्ये अणुभट्टीची सुरक्षितता सर्वोपरी असते. बाकी सर्व गोष्टी त्यानंतर येतात. परंतु चेर्नोबिल दुर्घटनेत डिझाइनमधील त्रुटी, मानवी चुका, प्रचालकांच्या ज्ञानाची कमतरता आणि सुरक्षिततेबाबतची अक्षम्य बेपर्वाई या गोष्टी कारणीभूत ठरल्या. याच दुर्घटनेस यंदाच्या पंचवीस एप्रिल रोजी पंचवीस वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने या गंभीर अपघाताचा हा आलेख…..

लेखसंग्रह

जपानमधील कालप्रलय

Category:

 

जपानला 1854 साली 8.4 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यापेक्षा अधिकचा म्हणजे 8.9 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंप शुक्रवार दिनांक 11 मार्च, 2011 रोजी जपानच्या वेळेप्रमाणे दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी झाला आहे. त्या वेळी भारतात सकाळचे 11 वाजून 16 मिनिटे झाली होती. पण 2004 साली सुमात्रा बेटात झालेला भूकंपही 8.9 तीव्रतेचा होता. म्हणजे तेव्हाचा सुमात्रातील भूकंप आणि आताचा जपानमधील भूकंप हे सारख्याच तीव्रतेचे होते.

लेखसंग्रह

महाराष्ट्र दिनानिमित्त संकल्प करुया मराठीतूनच इ-मेल पाठवण्याचा मराठीत लिहिण्याचा

Category:

 

आपल्यापैकी कितीजणांच्या संगणकावर मराठीत काम करण्याची सोय आहे? किती जण मराठीत इ-मेल आणि कागदावरील पत्रव्यवहार करतात? कितीजण फेसबुकवर मराठीत लिहितात? मराठी माणसाने दुसर्‍या मराठी माणसाला इ-मेल फक्त मराठीतच पाठवावे असा संकल्प या महाराष्ट्रदिनी करायला काय हरकत आहे? फेसबुकवर लिहिताना शक्यतो मराठीतच लिहायचे असाही संकल्प करायला काय हरकत आहे?