12-M-vaicharik
हजार तोंडांचा रावण – एक झलक !
Category:
लेखसंग्रहडायनासोरहून कितीतरी पटीने मोठा भीमकाय भ्रष्टाचार धावताधावता थांबला. तरी तो बराच पुढे आलेला होता. त्याच्या पायांना लाखो अश्वांचा वेग मिळालेला होता, तर अनेक हत्ती सामावतील एवढे मोठे पोट झालेले होते. स्वतःला आवरायला, सावरायला त्याने बराच वेळ घेतला. नंतर जागच्या जागी उभे राहून मोठ्या कष्टाने त्याने मान वळवली.
हजार तोंडांचा रावण – मनोगत
Category:
लेखसंग्रहजागतिक, राष्ट्रीय, प्रांतीय अशा सर्वच जागी अशांतता असेल तर समाज, कुटुंब आणि वैयक्तिकरीत्या माणूस हा देखील स्वस्थ राहू शकत नाही. जगण्यासाठीचा माणसाचा संघर्ष आज कैक पटींनी वाढलेला आहे. म्हणून प्रत्येक जण आज अस्वस्थ आहे. असमाधानी आहे.
बीज भाषण : मराठी कथात्म!
Category:
लेखसंग्रहमी कथा विषयी बोलणार आहे, पण हे मी माझ्या कथांचे संदर्भ घेऊन बोलणार आहे.कथा म्हणजे काय? काल्पनिकते मध्ये वास्तविकता किंवा वास्तविकते मध्ये काल्पनिकतेचे मिसळ करून व्यक्त होणे.सर्वस्वी वास्तविक किंवा सर्वस्वी काल्पनिक असे काहीच नसते. पण विचार आणि चिंतन ही लेखकाची शिदोरी आहे. यातून जी जन्म घेते ती कविता किंवा कथा.
पुरुषपण भारी देवा
Category:
लेखसंग्रहकायओ?काय चाललंय!बसले का लॅपटॉप उघडून!रविवार आहे ना?तरी सुद्धा काम?बाहेर मस्त पाऊस पडतोय..छान वातावरण आहे..चल जावू कुठंतरी!नाहीतर फिरायला..सिनेमाला नाटकाला!स्वतःहून कधी म्हणायची इच्छा होत नाहीका हो तुम्हाला?म्हटलं आज उद्या कधीतरी स्वतःहून म्हणाल..चल जावू या ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाला!पण कसलं काय!आपल्या सोसायटीतल्या सगळ्या जावून पाहून सुद्धा आल्या!त्याचं कायये कामा शिवाय काहींचं सुचत नाही ना आम्हाला!एक सांगा!आपण दोघं शेवटचं बाहेर कधी गेलो आठवत का?घरातलं करा तुमचं बघा!राब राब राबा.. सुट्टीची वाट पाहत रविवार पर्यत थांबा!पण नाही..बायकोला समजून घ्यायचंच नाही म्हटल्यावर इलाजचं खुंटला..खरंय ना?
आत्महत्या समस्या की उपाय ?
Category:
लेखसंग्रहशिर्षक वाचून हैराण झाला असाल परंतु हे आजचे वास्तव आहे हे कुणीही नाकारणार नाही. एखादी समस्या आली की आपण उपाय शोधतो अर्थात अनेक उपाय असतात ते थकले की माणूस त्या समस्यांना कंटाळतो आणि मग तो शेवटच्या उपायाकडे वळतो तो म्हणजे आत्महत्या.
आजपर्यंत अनेक डॉक्टर्स , समन्वयक उत्तम भूमिका निभावतात परंतु मानवी मन भन्नाट आणि प्रचंड वेगवान आहे.
जोडीदार निवडतांना – भाग १
Category:
लेखसंग्रहकाय करू काही समजत नव्हतं , कोणत्या स्थळाची / वराची निवड करू ? भल्या मोठ्या पगाराची शहरात नोकरी करणारा ,कि गेल्या तीनचार वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरु केलेला , कि प्रगतिशील असलेल्या एखाद्या गावात स्वतःचा जमीन जुमला , बंगला , शेतकरी असलेला ग्रामीण भागात राहणारा .
मानसिक दबाब
Category:
लेखसंग्रहहा फोटो नीट पहा. आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेफ थॉ़म्पसनने ७ खेळाडुंना क्षेत्ररक्षण करण्यासाठी अगदी फलंदाजाजवळ लावले आहें. म्हणजे यष्टी रक्षक तसेंच स्वतः मिळुन असें नऊ खेळाडु खेळपट्टी जवळच आहेत. राहता राहीलें २ खेळाडु उर्वरीत मैदानात क्षेत्र रक्षणासाठी उरतात.
दुःखाचा डोंगर कोसळला….
Category:
लेखसंग्रहसजीवसृष्टीला आपल्या कुशीत खेळवणारा निसर्गही कधी कधी इतका क्रूर आणि हिंस्त्र होतो की त्याच्या क्रौर्याची परिसीमाच होते. गेली तीन दिवस सूरू असलेला हा जलप्रपात काही केल्या थांबण्याचे नाव घेईना तेव्हाच मनात भयचकित करणाऱ्या घटनांची शंका येऊ लागली होती. नियतीच्या मनात जे असत ते ती घडवतेच लहानस छिद्रदेखील जहाज बुडवत इथे तर आभाळच फाटलं होत.
कूछ तो लोग कहेंगे
Category:
लेखसंग्रहमाणूस हा सामाजिक प्राणी आहे. आपली जडण घडण देखील या समाजात झाली आहे… आपण सर्व या समाजाचे भाग आहोत आणि या समाजात राहणाऱ्या लोकांची आपण जरा जास्तच पर्वा करतो. आम्हाला नेहमी अशी भीती असते ही लोकं काय म्हणतील पण आपण विसरलो की आपल्या त्रास आणि संघर्ष या मध्ये हे लोकं कधीच आपल्या सोबत नसतात.