नोव्हेंबर ०६ – स्लॅटर स्लॉटर आणि कामिकाझे किड
Category:
लेखसंग्रह१९९९ : मायकेल स्लॅटरचा धमाका. ब्रिस्बेन कसोटीत पाकिस्तानच्या ३६७ धावांना प्रत्युत्तर देताना कुणीही सावधच सुरुवात केली असती पण मायकेल स्लॅटरने वेगवान १६९ धावा काढल्या आणि ग्रेग ब्लिवेटसोबत पहिल्या जोडीसाठी २६९ धावा रचल्या.
१९५६ : पश्चिम ऑस्ट्रेलियात ग्रॅएम वूडचा जन्म. या डावखुर्या सलामीवीराला ‘कामिकाझे किड’ (स्वतःला गोत्यात आणणार्या गोष्टी स्वतःहून करणारा मुलगा) असे संबोधले जाते.