लेखसंग्रह

मेंदूची ‘पुरातन’ शस्त्रक्रिया

Category:

 

शस्त्रक्रिया हा वैद्यकशास्त्रातील अत्यंत परवलीचा शब्द आहे. हाडांच्या फ्रॅक्चरपासून ते ह्रदय, किडनी यात बिघाड झाल्यास ‘दुरूस्ती’ करण्यासाठी प्रत्यक्षात तो अवयव उघडण्याची पध्दत गेल्या शतकात जन्माला आली.

लेखसंग्रह

ॲ‍ॅमनिओ पॅच – एक वरदान

Category:

 

ज्या गर्भार महिलेच्या गर्भाशयातील पाणी काही कारणास्तव अचानकपणे कमी झालेले किंवा निघून गेलेले असते, अशा गर्भाची नीट वाढ होत नाही व त्याच्या जगण्याची शक्यताही धूसर होते. अशा वेळी ‘अॅमनिओ पॅच’ या वैशिष्ट्यपूर्ण शस्त्रक्रियेद्वारे त्या बाळास जीवदान देता येते व प्रसूतीही चिंतामुक्त होऊ शकते. हे शक्य केले आहे नाशिकच्या एका सहृदय महिला डॉक्टरने!

लेखसंग्रह

आईबाबांनो, भांडा; पण जरा जपून, मुलं शिकताहेत!

Category:

 

आई-वडिलांचे भांडण ही मुलांची जागतिक समस्या आहे. भांडण बघताना मुलांच्या रक्तात कॉर्टिसॉल नावाचे तणाव निर्माण करणारे इंद्रियक्रियाप्रवर्तक (हॉर्मोन) वाढते. मुलाला असुरक्षित वाटू लागते. वादविवाद, शिव्याशाप, धक्काबुक्की, मारहाण, फेकाफेकी अशा घटना वारंवार घडल्यास त्यांच्या मनांवर, शिक्षणावर गंभीर व कायमस्वरूपी परिणाम होतो.

लेखसंग्रह

वाढत जाणारी गोडी

Category:

 

गहू, तादूळ, मका यांची पीठं म्हणजेही कर्बोदकच. पण ती नुसती किंवा उकडून शिजवून खाल्ली तरी गोड लागत नाहीत. गव्हाच्या पिठापासून तयार केलेला पाव, किंवा चपाती, किंवा तांदळापासून बनवलेला भात किंवा उकड ही काही गोड लागत नाहीत.

लेखसंग्रह

गोडीचं मोजमाप

Category:

 

साखर म्हणजे गोड एवढंच आपल्याला माहिती असतं. पण ही गोडी मोजण्याचाही मानदंड आहे. कोणत्याही गोड पदार्थाची गोडी सहसा मोजली जाते ती सुक्रोजच्या गोडीच्या प्रमाणातच. सुक्रोजची गोडी एक असं मानलं जातं.

लेखसंग्रह

गुडखाद्य

Category:

 

उसाच्या रसापासून साखर तयार करतात तसा गूळ आणि काकवीही तयार केली जाते. गूळ उघड्यावर उकळलेला रस गाळण्यांमधून गाळून तयार केला जातो. उघड्यावर असल्यामुळं त्या रसावरचा हवेचा दाब जास्ती असतो.

लेखसंग्रह

निगोड साखर ?

Category:

 

नावडतीचं मीठ अळणी असं म्हणतात. तसंच मग आणखी कुणाचीशी साखरही निगोड का असू नये? वरवर हा थट्टेचा प्रकार वाटेल. पण खरं पाहता साखरेची गोडी सगळीकडे सारखीच असते असं नाही. अशी ती का बदलते हे समजून घ्यायचं असेल तर आधी साखर म्हणजे काय हेही समजावून घ्यायला हवं.

लेखसंग्रह

शुद्धतेची गोडी

Category:

 

आपण चव चाखतो ती ग्लुकोजची किंवा फ्रुक्टोजची. नुसत्याच लांबलचक माळेची चव आपल्याला घेता येत नाही. म्हणूनच तर साखरेचा दाणा हा केवळ ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचाच बनलेला असतो आणि त्यात इतर कसलीही भेसळ नसते तेव्हाच आपल्याला ती चांगली गोड लागते. एरवी तिची गोड कमीच होण्याची शक्यता असते.

लेखसंग्रह

दुधात साखर !

Category:

 

ज्यांना मधुमेहाच्या व्याधिनं ग्रासलेलं आहे अशा मंडळींच्या रक्तातल्या ग्लुकोजच्या प्रमाणाचं व्यवस्थित नियंत्रण होऊ शकत नाही. रक्तात ग्लुकोज साठत जातो. त्यामुळं त्यांच्या शरीरस्वास्थ्याला बाधा येते. त्यांच्या खाण्याला गोडाची चव तर द्यायची पण त्यांना ग्लुकोजच्या अतिरिक्त सेवनापासून वाचवायचं म्हणून मग काही कृत्रिम साखरी तयार केल्या गेल्या आहेत.

लेखसंग्रह

मीठ आणि साखर

Category:

 

आता तुम्ही म्हणाल की हे सारं सव्यापसव्य करणं वैज्ञानिकांना ठीक आहे हो. आम्ही कुठं असं संशोधन करायला जातो? किंवा आमची काय टाप आहे आईन्स्टाईन महाराजांची खोडी काढण्याची! शिवाय त्यांच्या विधानाबद्दल शंका घ्यायला आधी ते काय म्हणताहेत हे तर समजायला हव. तिथंच तर आमचं घोडं पेंड खातं.