साहित्य - ललित

दाढावळ

Category:

 

माझ्या मित्राच्या घराण्यात कोणालाच अक्कलदाढ आली नव्हती. बातमी घराबाहेर लीक झाली आणि गावभर पसरत पसरत गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमधे पोहोचली. घराण्याचं पितळ उघड पडून होणारी नाचक्की टाळण्यासाठी मित्राच्या वडिलांनी मला मध्यस्थीची गळ घातली आणि मी गिनीज बुक वाल्यांना बातमी प्रसिध्द करण्यापासून थोपवायच ठरवल.

साहित्य - ललित

भय इथले संपत नाही…

Category:

 

तिन्हीसांजेला मन असंच खूप हळवं झालं ….पार दूर दक्षिणेला … समुद्र किनाऱ्यावर जावंसं वाटायला लागलं …. बारदेशात …. खरं तर अति प्रबळ इच्छा झाली … इतकी की वाऱ्याच्या वेगाने धावत जावं … पण वास्तवातलं जग तेवढं सोपं नाही ना … प्रत्यक्ष जरी जाऊ शकलो नाही तरी मन मात्र शेकडो मैल दूर असलेल्या त्या किनाऱ्यावर गेलंच

साहित्य - ललित

दंतमंदीर

Category:

 

भक्तांपर्यत माझ्या डेंटल ट्रिटमेंटची बातमी कशी काय लिक झाली कळायलाच मार्ग नाहीये. मला पुसटशीही कल्पनाही नव्हती की भक्त माझ्या मागावर आहेत आणि शेवटी एक दिवस माझा निजी दंत चिकित्सक दत्तु दातारला त्यांनी माझ्या अपरोक्ष गाठलेच. कसली एवढी भुरळ घातली माहित नाही पण माझ्या डेंटल ट्रीटमेंटची पूर्ण डीटेल्स भक्तांनी, त्याच्याकडुन मिळवली; किती इंप्लांट किती रुट कँनॉल, किती क्राउन, एकुण खर्च, वगैरे, वगैरे.

साहित्य - ललित

अंबानी (विनोदी लेख)

Category:

 

सर्वात श्रीमंत भारतीय हे बिरुद सतत ११व्या वर्षी मिळाल्याच कळताच मी त्याला फोन करण्यापूर्वीच मुकेशचा फोन माझ्या फोनवर खणखणला. आनंदाच भरत येउन त्याचे शब्द थरथरत होते. मला म्हणला ” पक्या, लेका हेलीकॉप्टर पाठवतोय लगेचच एंटिलियावर ये; केंव्हा एकदा तु भेटशील अस झालय. येताना छाया भाभीलाही घेउन ये ” मैत्रीचा उमाळा आलेल्या मुकेशच मन मी मोडु शकलो नाही.

साहित्य - ललित

टक्कल पुराण

Category:

 

मला ‘बाल’वयात जेंव्हा टक्कलाविषयी फारशी माहीती नव्हती तेंव्हा वाटायच की काही लोक जसे केस वाढवतात तसेच काही प्रतिस्पर्धी लोक टक्कल वाढवत असावेत. वाढत्या वयानुसार टक्कलांचे विविध आकार तसेच तुरळक केसांचा त्याच्या अवती भवतीचा वावर हा माझ्या टक्कलाविषयीच्या उत्कंठेचा केंद्रबिंदु होत गेला. टक्कल या विषयाचा खोलवर विचार करत करत आता तर माझेही केस झडत जाउन मीही स्वयंप्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे परंतु तरीही माझा त्याविषयीचा अभ्यास तितक्याच चिकाटीने चालू आहे.

लेखसंग्रह

फो पो – पोळी ते फोडणीची पोळी

Category:

 

महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत फोडणीची पोळी तिच्या शिळेपणामुळे नैवेद्यासाठी जरी निषिध्द मानली गेली असली तरी ती खवैयाच्या जिभेवर मात्र पहिल्या पंगतित विराजमान असते. तिचे जीवन तर मानवीजीवनासाठी आदर्श वस्तूपाठच असते.

लेखसंग्रह

ममता’ ….. रहें ना रहें हम, महका करेंगे ….

Category:

 

सिनेमावर कितीही लिहिता येईल ….. हे काही परीक्षण वगैरे अजिबात नाहीये ….. सिनेमा बघितल्यावर मनाला जसं वाटलं ते तसंच्या तसं लिहिलंय …. मला सुचित्रा सेनने खूप भुरळ घातली ….तिच्यातल्या वेगळ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाने …. माझ्यातल्या लेन्समनला तर खूपच ….. मला तिचे फोटो काढायला खूप आवडलं असतं …. अर्थात ही आता नुसतीच कल्पना ….. तिच्यावर मात्र कधीतरी खास लिहिणार आहे ….. खूप वाचलंय मी हा सिमेना बघितल्यावर …. त्या साठी एखादे वेळेस कोलकात्याला जाईनही … बघू ….

लेखसंग्रह

सिझलर

Category:

 

मोबाईलवरचा फोटो माझ्या संकटविमोचक मुलीला सेंड करुन ” पोळपाटावरचा जिन्नस झुम करुन पहा आणि कसा खायचा ते सांग ” असे कळवले. ताबडतोब तिचा फोन आला आणि आळीपाळीनी तिच्या इंन्स्ट्रक्शन घेत घेत आम्ही सिझलरला गिळंकृत केल.

लेखसंग्रह

हैदराबादहून परत मुंबई…

Category:

 

जवळ जवळ पावणे तीन वर्षाच्या नंतर आम्ही हैदराबादला रामराम केला . .. आणि संध्याकाळी मुंबईला प्रस्थान केलं… शुक्रवार आणि शनिवार फार जड गेले … शनिवारी सकाळी तर फारच …. गाडीतून जुने शहर … चारमिनार .. अफझलगंज … कराची बेकरी … हिमायत नगर … हुसेन सागर असा एक मोठा फेरफटका मारला … सगळं डोळ्यात भरून घेतलं … मन फार जड झालं … डोळ्यांच्या कडा ओलावल्या …

साहित्य - ललित

मच्छर

Category:

 

वेधशाळेनी हलक्याहून अधिक आणि मध्यमहून कमी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केलाय म्हणजे नक्की काय याचा मथितार्थ माझ्याही आधी आमच्या एरीयातील डासांना कळला आणि त्यांनी अक्षरशः हैदोस घातला. मानवीडंखासाठी आसुसलेले त्यांचे दात शिवशिवायला लागले.