मॅन ओव्हरबोर्ड
Category:
लेखसंग्रहबंगालच्या उपसागरात एक मासेमारी करणारी भारतीय बोट पाण्यात बुडाली. त्या बोटीवर 15 सहकाऱ्यांसह असणारा एक भारतीय खलाशी रबिंद्र दास सुमारे पाच दिवस कशाच्या तरी आधारावर तरंगत राहिला पण 600 km खोल समुद्रात प्रवाहा सह वाहून गेला. समुद्रात पाच दिवस अन्न आणि पाण्याशिवाय तेही वादळी हवामानात तो जिवंत राहिला होता. हवामान खराब त्यात जी बोट बुडाली होती त्यावर काम करणाऱ्या खलाशांपैकी कोणाच्या नातेवाईकांना या गोष्टीची कल्पना होती की नव्हती कोणास ठाऊक.