समुद्रातला पाऊस
Category:
लेखसंग्रहजहाजावर असताना बऱ्याच वेळा पाऊस पडताना न दिसता कधी धावत पळत जाताना तर कधी मस्तपैकी रमतगमत चालत जाताना दिसतो. जेव्हा सोसाट्याचा वारा असतो तेव्हा धावतपळत तर जेव्हा मंद वारा असतो तेव्हा रमतगमत चालताना दिसतो. कधी कधी एका दिशेकडील क्षितिज काळे कुट्ट होते तर कधी दोन किंवा तीन आणि कधी कधी तर चहुबाजूचे क्षितिज अंधारून जाते.