नक्की काय करावं?
Category:
लेखसंग्रहकुणी नोंद घेतलीय की नाही हे कळायला काही मार्ग नाही, पण गेले काही दिवस एक जाहिरात इलेक्ट्राॅनिक मिडीयावर झळकतेय. ही जाहिरात आहे ‘सहारा श्री’ श्री. सुब्रतो राॅय सहारा यांची. तेच सुब्रतो राॅय सहारा, ज्यांच्यावर गुंतवणूकदारांचे हजारो करोड रुपये लुटल्याचा आरोप सिग्ध झालाय. त्यांचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना कारावासही भोगायला लागलाय. त्यातही त्यांचा आडमुठेपणा सुरुच होता. विविध कारणं दाखवून त्यांनी गुंतवणूकधारकांच्या पैशांतून खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तांचा लिलाव टाळण्याचे त्यांचे उद्योग सरु आहेतच. याला माज म्हणतात आणि हा माज सुप्रिम कोर्टाने बरोबर ओळखून त्यांना काट्यावर पकडलंय आणि कोर्ट त्यांना वेळोवेळी फटकारतंयही.