लेखसंग्रह

टेक्नॉलॉजीय तस्मै नम: ; अर्थात जी.पी.एस.मुळे हरवलेला संवाद

Category:

 

व्हाट्सॲप, ट्विटर, फेसबूक यामुळे दुरदूरची माणसं जोडली गेली हे खरं असलं तरी जवळच्या माणसांमधला संवाद तुटला. शेजारी असलेल्या माणसांशी सरळ बोलून संवाद साधण्यापेक्षा दूरवर असलेल्या कुठल्यातरी (बऱ्याचदा अनोळखी) माणसाशी टायपील संवाद साधण्याच्या प्रयत्नात आपण सारेच असतो. हल्ली यात तरुण, प्रौढ किंना वय झालेले असा भेद नसतो. घरोघरी हेच दृष्य दिसतं. कुटूंबातील सर्व वयाचे सदस्य आपापल्या मोबाईलमधे डोकं घालून आणि कानात इअरफोनचे बोळे खुपसून तिसऱ्याच कुठल्यातरी व्यक्तीशी संवाद साधत बसलेले दिसणं आता आम बात है..

लेखसंग्रह

घाबरलेले पुतळे..

Category:

 

नुकतीच देशात काही पुतळे उखडायची किंवा पुतळ्यांची नासधूस करायच्या काही लहान-मोठ्या घटना घडून गेल्या. जगभरात कधी ना कधी हे होतंच असतं. आता हे चुक की बरोबर, यावर भाष्य करण्याची माझी कुवत नाही आणि माझी ती पात्रताही नाही आणि या लेखाचा तो विषयही नाही.

लेखसंग्रह

माणसं काळजात उतरलेली..

Category:

 

अमरजित आमले…चित्रपटांत जाऊ इच्छिणाऱ्या ‘वेड्यां’चं आयुष्य घडवण्यासाठी स्वत:चं आयुष्य उधळवलेला एक ‘मिशनरी’..अमरजित माझा मित्र. आमची ओळख बँकेत झाली. एकाच बँकेत आम्ही नोकरीला. तो दादर शाखेत तर मी पार्ले शाखेत. हो अगदी सरधोपट आणि अगदी फॉर्मल ओळख झाली. खरं सांगायचं, तर ….

लेखसंग्रह

श्रीदेवी, पद्मश्री आणि तिरंगा..

Category:

 

श्रीदेवीचा दुबईत अपघाती मृत्यू झाला आणि ती बातमी आपल्या रिकामटेकड्या लोकांच्या देशात एकदम महत्वाची झाली. क्षणात आपल्या सर्व वैयक्तिक आणि राष्ट्रीय समस्या शुल्लक झाल्या आणि तीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय असावं, याची चर्चा करणं राष्ट्रीय महत्वाचं झालं.

साहित्य - ललित

शब्दांची पालखी – भाग तीन

Category:

 

मला पुढं ‘किशोर’ गवसला आणि वेड लावता झाला. २४ पानांची करमणूक आणि लोकसत्ता चांदोबामुळे मनाची घडवणूक नकळत सुरु असतानाच, बोरकरांच्या त्या अस्तावस्त घरात मला चांदोबाचं अधिक शहाणं भावंड म्हणता येईल असा ‘किशोर’ हाताशी लागला. ‘किशोर’ने माझ्या खांद्यावर मित्रासारखा हळूच हात टाकून, मला आजुबाजूला दिसू शकणाऱ्या माझ्याच जगातल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. ‘किशोर’मधल्या कथा माझ्याच वयाच्या मुलांच्या असायच्या. कथेतल्या मुलांचं वय साधारण माझ्याइतकंच असल्याने त्या कथा मनाला भावायच्याही.. चांदोबापेक्षा किशोरचं आकारासहीत असलेलं हे वेगळं जग मला आवडत होतं.

लेखसंग्रह

महाराष्ट्र, मराठी माणूस आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी

Category:

 

मराठी माणसाला भांडल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिन्दवी स्वराज्यापासून ते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रापर्यंत मराठी जनांनी सर्व भांडूनच मिळवलंय. फक्त दुर्दैव येवढच, की आता मराठी भाषेसाठी स्वत:ला मराठी म्हणवणाऱ्या लोकांशीच भांडायची वेळ आली आहे.

लेखसंग्रह

लाजतो भाग्यास.. आम्ही बोलतो मराठी..

Category:

 

मातृभाषा बोलायची कोणाला मरणाची लाज वाटत असेल, तर ती आपल्याच देशी (यात मराठी बहुसंख्येने व इतर प्रांतीय अपवादाने) लोकांना..!!आपल्या भाषेबद्दल, कपड्यांबद्ल लाज आणि न्युनगंड बाळगणे हेच आमचे सर्वात मोठे भूषण..!”

लेखसंग्रह

वैज्ञानिक दृष्टीकोन

Category:

 

‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ हा हल्ली वाक्प्रचार म्हणून वापरला जातो असं माझं मत आहे. आपल्याला न पटलेल्या गोष्टींवर हा वाक्प्रचार एखाद्याच्या तोंडावर फेकून मारला, की मग पुढची चर्चाच खुंटते.

लेखसंग्रह

वाळकेश्वरची पाटी

Category:

 

वाळकेश्वरच्या सुप्रसिद्ध रस्त्यावरील ‘तीन बत्ती’ तिठ्यापाशी वाळकेश्वर या ऐतिहासिक परिसराची माहिती देणारा एक स्टीलचा फलक एका खाजगी संस्थेने लावलेला आहे. या फलकावरील मराठी भाषेतील माहिती, माननीय राज्यपालांचे जन संपर्क अधिकारी श्री. उमेश काशिकर यांनी माझ्याकडून लिहून घेतलेली आहे. या पाटीवरील लिखाणासाठी माझं नांव त्या पाटीवरील माहितीखाली लिहून मला श्रेयही देण्यात आलं आहे. श्री. उमेश काशिकरांच्या या औदार्याबद्दल मी त्यांचा आणि त्या संस्थेचा आभारी आहे..! दुसऱ्याचं श्रेय लाटण्याची अहमिहीका लागलेल्या आजच्या दिवसांत असं औदार्य दुर्मिळ आहे आणि म्हणून त्याची किंमत मोठी आहे..

साहित्य - ललित

माझा लेखनप्रवास…

Category:

 

… आणि या प्रवासातला माझा सोबती… माझ्या गत तिनेक वर्षातल्या लेखनप्रवासात मला ज्याने न थकता अखंड आणि अबोल साथ दिली, त्याही त्याच्या तिन पिढ्या, त्या माझ्या सोबत्याचा, माझ्या मोबाईलचा, उल्लेख केला नाही तर ते कृतघ्नपणाचं ठरेल.