लेखसंग्रह

श्री. मुसा शेख : मला मिळालेलं सरस्वतीचं देणं..

Category:

 

देवाने याउप्पर मला इतर काही नाही दिलं तरी माझी काही तक्रार नाही, कारण मला मकरंदजी, मुसाजी आणि अशाच काही निस्वार्थ मित्रांचं जे देणं सरस्वतीच्या आशीर्वादाने मिळालंय, ते कुठल्याही लक्ष्मीपुत्राच्या नशिबात नाही..

लेखसंग्रह

बलात्कार का होतात?

Category:

 

देशात नुकत्याच घडणाऱ्या विविध बलात्कारांच्या बातम्या आणि त्यतून सरकारवर केले दोषारोप हा राजकारणाचा भाग आहे. बलात्काराची कारण सामाजिक आणि मानसिक आहेत. स्त्री-पुरुषांचा सेक्स बद्दल असलेला नैसर्गिक कल या मागे आहे. कोणतंही सरकार आणि कितीही कठोर शिक्षा बलात्कारांना आळा घालू शकत नाहीत.

क्विन व्हिक्टोरीयाचा ब्रिटीशकालीन मखर सापडला
लेखसंग्रह

क्विन व्हिक्टोरीयाचा ब्रिटीशकालीन मखर सापडला

Category:

 

महालक्ष्मीच्या भुलाभाई देसाई रोजवर ब्रिच कॅन्डी हाॅस्पिटल आहे. या हाॅस्पिटलच्या समोरच्या उंचं इमारतीत ‘रेमंड्स’चं मोठं शोरुम आहे. ही इमारत म्हणजे रेमंड्सच्या सिंघानीयांचं नवं घर. या इमारतीच्या दर्शनी भागावरच हे मखर आणि त्यात एक पुतळा बसवलेला पाहायला मिळेल.अगदी हमरस्त्यावर आणि सहज दिसेल अशा ठिकाणी हे मखर आहे. इच्छुकांनी जाऊन जरूर बघून यावं.

लेखसंग्रह

तुमचा पक्ष कोणता?

Category:

 

निवडणूकांना आता फक्त वर्ष राहीलंय. मतदारांना फितवण्याचे आणि भडकवण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. तरी डोकं शांत ठेवा. तुमच्या जीवावर पोळी भाजायचा सर्वांचा कावा लक्षात घेऊन, या निवडणूकीत तुमचा पक्ष कोणता असं कुणी विचारलं, तर ‘देश आणि देशहित’ हाच आमचा पक्ष असं ठणकावून सांगायला कचरू नका..

साहित्य - ललित

लग्न; समस्या की समोसा?

Category:

 

‘मनगट आणि बुद्धीच्या जोरावर जगातल्या सर्व समस्यांवर मार्ग काढता येतो’, या अर्थाचं एक विवेकानंदांचं वाक्य आहे. मी काही ते वाचलेलं नाही. विवेकानंदांचं नसलं, तरी जागतल्या बऱ्याच विचारवंत, तत्ववेत्त्यांनी अशाच अर्थाचं काही न काही, कधी ना कधी सांगीतलेलं आहे.

लेखसंग्रह

जो पेजेला देतो, तो शेजेला घेतोच.. अर्थात आपली लोकशाही

Category:

 

जो शेजेला घेतो, तो शेजवर जे करेल ते निमुटपणे सहन करायचं असतं हे ओघानंच येतं. आपण आपल्यामुळेच लोकप्रतिनिधींच्या शेजेवर चढवले गेलो आहोत आणि वेळीच जागे झालो नाही, तर अनैसर्गिक बलात्कार अटळ आहे..

साहित्य - ललित

मुद्राराक्षस : आधुनिक काळातला..

Category:

 

हल्ली हा जुना मुद्रा राक्षस मोबाईलवर भेटू लागलाय. पुन्हा पुन्हा आणि वारंवार. मुद्रा राक्षस हे नांव सर्व काम छपाईच्या मशिनवर व्हायचं त्या काळातलं आहे. सध्या टायपिंगचा काळ असल्याने याला ‘टायपो डेमाॅन’ म्हणावं का, की त्याला आणखी कुठलं मराठी नांव द्यावं हे कळत नाही.

साहित्य - ललित

मी श्रीमंत झालो

Category:

 

कोणत्याही कलावंताला मी देवाचा पृथ्वीवरचा अंश (अवतार नव्हे, अवतार भ्रष्ट असू शकतो) मानतो आणि म्हणून प्रभाकरपंतानी काढलेलं माझं व्यंगचित्र मला साक्षात देवाचा आशीर्वादच वाटतो.. देवाचा आशिर्वाद असाच अचानक मिळत असतो, तो ओळखता आला पाहिजे मात्र..!!

लेखसंग्रह

श्री. (ना)राज ठाकरे आणि पाडव्याचं भाषण

Category:

 

परवाच्या पाडव्याच्या सभेला जमलेली प्रचंड गर्दी मनसेसाठी नसून श्री. राज ठाकरेंसाठी होती याविषयी कुणाचं दुमत असू नये. या सभेत पक्षाचा घसरणारा क्रमांक वर आणण्यासाठी राज ठाकरे यांनी तेथे जमलेल्या कार्यकर्त्याना काहीतरी गृहपाठ देणं अपेक्षित होतं, पण तसं घडलं नाही. केवळ मराठी माणूस आणि मराठी भाषा हा, सध्याच्या काळात, राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही. श्री. राज ठाकरेंना आता आपला पाया अधिक व्यापक करण्याची गरज आहे.

लेखसंग्रह

स्वामी समर्थ आणि इतर अवतारी पुरुषांचा मूक संदेश

Category:

 

अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, कणकवलीचे भालचंद्र महाराज किंवा नागडेबाबा इत्यादी कोणत्याही अवतारांबाबत माझा सखोल असा अभ्यास नसला, तरी एक निरीक्षण आहे आणि ते माझ्यापुरतं खरं आहे हे मला पटलेलं आहे. अर्थात, माझं मत आपल्याला मान्य असायलाच हवं, असा काही माझा आग्रह नाही. मला या अवतारी पुरुषांबद्दल काय वाटतं ते मी या लेखात मांडायचा प्रत्न केला आहे. या लेखातून कोणाच्या भावना दुखावाव्यात असा माझा हेतू नाही.