लेखसंग्रह

काळा फळा…

Category:

 

खेड्यातील शाळांमध्ये स्वातंत्र्यानंतर भिंतीलाच आयताकृती काळा रंग देऊन फळा केला जात असे. काही ठिकाणी तिकाटण्यावर काळा फळा ठेवून गुरूजी शिकवत असत. शहरातील शाळेमध्ये भिंतीवर लाकडी चौकट असलेले फळे असत. पहिली ते चौथीपर्यंत मी फळ्याच्या जवळ जाऊ शकलो नव्हतो. लांबूनच फळा निरखत होतो.

लेखसंग्रह

इथे’ ओशाळला’ कोरोना

Category:

 

लाॅकडाऊन सुरु झाल्यापासून माणसातील छुप्या ‘सैताना’ने त्याच्या चांगुलपणावर कुरघोडी केली व तो ‘सैतानीवृत्ती’ने वागू लागला…गेल्या दोन महिन्यांत वर्तमानपत्रातील आलेल्या बातम्यांवरुन तयार केलेल्या या पूर्णपणे काल्पनिक पाच अति लघु कथा…

लेखसंग्रह

लेडी विथ द लॅम्प’

Category:

 

परिचारिकेला इंग्रजीमध्ये नर्स म्हटले जाते. डाॅक्टरच्या हाताखाली नर्स, ही मदतनीस म्हणून काम करीत असते. पेशंटला हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून नर्स त्या पेशंटची काळजी घेत असते. डाॅक्टरांची व्हिजीट झाल्यावर त्यांनी सांगितलेल्या सूचनांनुसार पेशंटला इंजेक्शन, औषधे वेळेवर देण्याचे काम नर्सचे असते. पेशंटच्या हाकेला नर्सच धावून येत असते. पेशंट बरा झाल्यावर तो घरी जातो. पेशंट नर्सच्या संपर्कात राहिल्यामुळे ती त्याला सहसा विसरत नाही. तिच्या सेवाभावी वृत्तीमुळे दोघांत एक जिवाभावाचं नातं निर्माण झालेलं असतं.

साहित्य - ललित

मुर्खाचं नंदनवन कुठं बरं आहे?

Category:

 

माणसाच्या मूर्खपणावर आईनस्टाईन सरांचा किती विश्वास होता बघा. हे सर म्हणजे एकदम बाप माणूस हे आपणास ठाऊक आहेच. सगळया मानवांपेक्षा या सरांचा मेंदू अधिक विकसित झाल्याचं नंतर सिध्द झालं.इतर मानवांपेक्षा हुषारीच्या बाबतीत अनेक पावलं समोर असलेलं सर असं म्हणतात म्हणजे ते सत्यच असलं पाहिजे,नाही का?

साहित्य - ललित

साठी बुध्दी..

Category:

 

महाराज आणि प्रधानजी उपवनात नित्याप्रमाणे फिरायला निघाले. थोडे अंतर चालून झाल्यावर प्रधानजीला महाराज विचारत झाले, प्रधानजी साठीझाली की काय होतं हो..

साहित्य - ललित

ध’ चा ‘मा’

Category:

 

कोण आहे रे तिकडे,महाराजांनी आवाज दिला.सेवक दौडतच आला. महाराज आज्ञा असावी. अरे, प्रधानांना ताबडतोब इकडे उचलून आण. महाराज गरजले. उचलून ? मी नाही समजलो महाराज, सेवक भीत भीत म्हणाला. गधड्या मला म्हणायचं होतं ताबडतोब त्यांना बोलावून आण. जसे असतील तसे.
टॉवेलात असतील तरी चालतील कां तुम्हांस..

लेखसंग्रह

भारताचे अंतराळक्षेत्रातील स्थान

Category:

 

एकंदरीत भविष्य काळात अंतराळ ही देखील प्रमुख युद्धभूमी असेल हे लक्षात घेऊन भारताने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक बैठकीत देशाच्या स्वसंरक्षणासाठी ‘डिफेन्स स्पेस रिसर्च एजन्सी’च्या (डीएसआरए) स्थापनेचा खूप चांगला निर्णय घेतला. ही यंत्रणा अंतराळ युद्धासाठी आवश्यक असलेली शस्त्रात्रे व त्यासंबंधीचे तंत्रज्ञान विकसित करील. या संशोधनाच्या माध्यमातून ‘डिफेन्स स्पेस एजन्सी’ला सहाय्य करण्याचे काम (डीएसआरए) द्वारे केले जाईल. आणि भारताने घेतलेला निर्णय खरोखरच स्तुत्य आणि संरक्षण दृष्ट्या आवश्यक आहे.

लेखसंग्रह

मुंबईतल्या रेल्वे स्टेशनांवरचे ब्रिटिशकालीन रॅम्प्स

Category:

 

मध्य रेल्वेवरच्या चिंचपोकळी आणि करी रोड या स्टेशन्सशी माझा लहानपणापासूनचा संबंध. त्याचं कारण माझं आजोळ लालबागचं. माझं राहाणं पश्चिम रेल्वेवरच्या प्रथम अंधेरी आणि नंतर दहिसरचं. लहानपणी अंधेरीला राहात असताना, आईच बोट धरून मामाकडे जाण्याचा आवडता मार्ग म्हणजे, ‘४ लिमिटेड’ बस. वरच्या डेकवर सर्वात पहिल्या सीटवर जाऊन बसलं, की स्वर्ग हातात आल्याचा आनंद व्हायचा. अंधेरी पश्चिमेतल्या ‘कॅफे अल्फा’च्या समोरच्या पहिल्या स्टोपवर बस आली, की आपली आवडती सीट पकडायची आणि टकमक पाहत लालबाग मार्केटच्या स्टॅपवर उतरायचं, ह्यात बडा आनंद होता.

साहित्य - ललित

आठवलेली आणखी एक गोष्ट

Category:

 

अशाच दिवशी एका गांवात एक स्पर्धा असल्याची बातमी पेप्रात येते. ही स्पर्धा असते एक झाड तोडायची. त्या गांवाच्या वेशीवर बरेच दिवसापासून वठलेल्या अवस्थेत उभा असलेला एक भक्तम वृक्षराज गांवकऱ्यांना तोडायचा असतो. खरं तर कोणतंही एखादं जिवंत झाड तोडणं म्हणजे माणसाच्या डाव्या हाताचा खेळ, त्यात हे तर मेलेलं झाड. ते तडायला किती वेळ लागणार?