कॅश व्हॅन
Category:
साहित्य - ललितबायको ज्या शाखेत काम करत होती. ती ब्रँच करन्सी चेस्ट अशा स्वरूपातली होती. बायकोची स्टेट बँक नव्हती. त्यामुळे त्यांच्या बँकेच्या करन्सी चेस्ट कमीच. बँकेची सुमारे दोनशे किमी परिघातली ही एकच करन्सी ब्रँच. परिसरातील प्रत्येक शाखेतील स्टाफने जरुरीप्रमाणे कॅश रॅमिटन्स घेऊन जाणे आणि आणणे यामध्ये वेळ, पैसा खर्च, कर्मचारी लागतात.