कथा

सतर्क ग्राहक

Category:

 

मी मुंबईत वांद्रे येथे एक सरकारी बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत होतो तेव्हाची गोष्ट आहे. या शाखेचे बहुतांश ग्राहक अनिवासी भारतीय असल्याने ते लाखात कमी आणि कोटींमध्ये जास्त व्यवहार करायचे. त्यामुळे या शाखेत फसवणुकीचे (फ्रॉड) प्रकार नेहमी होत असत.

कथा

आनंद या जीवनाचा

Category:

 

तिने गर्रकन मानेला झटका देत माझ्याकडे मान वळवली. पूर्वी 180 अंश कोनात तिची मान वळायची आता 80 अंशापर्यंत जेमतेम पोहोचते. तिने विचारलं, ‘तुमचं पूर्वी प्रेमप्रकरण होतं कीकाय? छे.. मी सोडल्यास एवढी रिस्क घेईल कोण?’ पण तिला काय वाटलं कोणास ठाऊक, तिने पुन्हा विचारलं, ‘तुम्हाला दुसऱ्या कोणामुळे मूल वगैरे झालंय का?’

लेखसंग्रह

जीवेत् ‘दत्ताजी’ शतम्…

Category:

 

मद्रासमधील चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत दोघांचे सूर जुळले व राजा परांजपे यांचे सोबत तो तरुण पुण्याला आला व त्यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातून सहायक दिग्दर्शक म्हणून त्याने चित्रपट सृष्टीतील ‘श्रीगणेशा’ केला… तो तरुण म्हणजेच आज नव्वदाव्या वर्षांत पदार्पण करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक, ऋषितुल्य राजदत्तजी!!!

कथा

जमेल तेवढे तर करू!

Category:

 

वेगळं राहिलं म्हणजे आपण गॅस बंद न केल्यामुळे दूध उतू जाऊन भांडं जळून काळं कसं होतं, किल्ली घरात विसरल्यावर कसा कल्लोळ होतो, भाजी आणायला गेल्यावर नाइलाजाने आपल्याला न आवडणारा भोपळा किंवा दुधी कशी ‘झक मारत’ घ्यावी लागते, आपली गाडी कितीही मोठी असली तरी त्यातून दळण कसे आणावे लागते वगैरे…’ अनिल. इथे सर्वांच्या हास्याचा धबधबा!

लेखसंग्रह

धनुषकोडी आणि रामसेतू…

Category:

 

भारतात प्रत्येक ठिकाणी विविधता आहे. भारतात अशा काही जागा आहेत जिथे आजही माणूस आणि निसर्ग एकरूप होतो. जिकडे आजही काही रहस्य आहेत. तामिळनाडूच्या रामेश्वर जिल्ह्यातलं धनुषकोडी हे असंच एक गावं. ह्या गावाचा संदर्भ अगदी रामायणातील आहे.

लेखसंग्रह

कोकण रेल्वे : असामान्य आणि अफलातून इंजिनिअरिंग

Category:

 

कोकण रेल्वे हा प्रोजेक्ट भारतासाठी स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा आणि अवघड असा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट होता ह्यात संशय नाही. हा प्रोजेक्ट अनेक खडतर परिश्रमानंतर यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. आज कोकण रेल्वे रोज तीन राज्यातून 741 कि.मी.चा प्रवास करते. हा रेल्वेमार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक ह्या तीन राज्यांतून जातो. कोकण रेल्वेची हद्द मुंबई जवळील रोहा येथून सुरू होते ते थोकूर ह्या मंगलोर जवळील दक्षिण कर्नाटकमधील रेल्वे स्टेशनला संपते.

कथा

संस्कारांची जपणूक

Category:

 

रमाबाईंना हुरहूर लागली होती.. असं काय घडलं आहे.. आज माझी दोन्ही लेकरं न सांगता, नमस्कार न करता गेले आहेत.. असंख्य विचार मनात येत होते. पण त्यांनी ठरवले होते की, आज डोळ्यातून पाण्याचा थेंब काढायचा नाही. त्या पुढील कामासाठी वळल्या इतक्यात संदीपचा फोन आला, ‘आई, आम्हां दोघांनाही कंपनीच्या कामानिमित्त बाहेर जावं लागत आहे, तेव्हा तू तुझी बॅग भरून ठेव.

लेखसंग्रह

रंगमहर्षी एम. आर. आचरेकर…

Category:

 

१९५१ साली राज कपूरचा ‘आवारा’ प्रदर्शित झाला. त्यातील ‘घर आया, मेरा परदेसी..’ या स्वप्नगीताला रसिकांनी डोक्यावर घेतले. त्या गाण्यासाठी मोठमोठ्या मूर्ती, मनोरे, मुखवटे, एलिफंटा येथील त्रिमूर्तीचे सेट्स उभे केले होते. कृत्रिम धुराच्या सहाय्याने सेटवर स्वर्गीय वातावरण निर्मिती केलेली होती. जेव्हा हे गाणं संपतं तेव्हा त्या मूर्तीं पडतात असे दाखविले होते. हे कलादिग्दर्शन केलं होतं, राजकपूरचे सर्वाधिक चित्रपटांचे कलादिग्दर्शन करणारे महाराष्ट्राचे महान चित्रकार मुरलीधर रामचंद्र आचरेकर यांनी!

लेखसंग्रह

चिक्कूची ‘बी’

Category:

 

फेसबुकवर आज एक पोस्ट वाचनात आली. निवृत्तीला आलेल्या एका गृहस्थांनी, निवृत्तीनंतर पत्नीसह स्वतंत्र राहण्यासाठी एक छोटा फ्लॅट घेऊन ठेवला होता. मुलाचं त्याच्या मैत्रिणीशी लग्न लावून दिल्यावर ते दोघे पती-पत्नी दोन्ही वेळच्या जेवणासाठी एकत्र येऊन नंतर आपल्या फ्लॅटमध्ये राहू लागले. त्यावर सुनेने विचारले, ‘मला सर्वजण नावं ठेवतील, माझ्या त्रासामुळे तुम्ही स्वतंत्र राहू लागलात म्हणून.

कथा

फोटो झिंको

Category:

 

शनिवार होता, दुपारचे चार वाजले होते. मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. त्यावेळी शनिवारी बँकेचे कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत चालत असे. सोमवारी सुट्टी होती म्हणून बाहेर गावची मंडळी त्यांच्या गाडीच्या वेळेनुसार, काम संपवून किंवा उरलेले काम आपल्या सहकाऱ्यांवर सोपवून निघून गेली होती.