स्वरांच्या नभात आज… एक तारा हरपला…
गंध सुरांचा देत देत… शांत निजून गेला…
ओठांवरती गीत तिचे… अजूनही दाटते…
आशाताईंच्या आठवणींनी… मन हे भरून येते…
कधी लावणीच्या ठेक्यावरती… रंग भरले…
कधी विरहाच्या वेदनेला… स्वरांत गुंफले…
कधी खट्याळ… कधी कोमल… कधी दर्दभरी तान…
प्रत्येक सुरात झंकारली… तिच्या स्वरांची शान…
“पिया तू…”च्या लयीत… धुंद जग हे झाले…
“दिल चीज क्या है”… म्हणता… काळही थबकले…
मराठी भावगीतांत… तिचे ममत्व दाटले…
नाट्यगीतांच्या ओव्यात… स्वर मोत्यासारखे वाटले…
जीवनात दुःखांचे वादळ… जरी वाहिले…
तरी हास्य ओठी ठेवून… ती गातच राहिली…
जिद्दीच्या त्या ज्योतीने… नभ उजळून गेले…
स्वतः जळत जळत… कित्येक जीव पेटवून गेली…
आज देह गेला… तरी तिचे स्वर अमर राहतील…
प्रत्येक पिढीच्या श्वासात… तिचे सूर वाहतील…
आशा नावाची ती… केवळ गायिका नव्हती,
ती… भारतभूमीच्या कंठातील अमर स्वर होती…
*आशाताई…*
तुम्ही गेलात…
पण तुमचा आवाज…
आमच्या हृदयात…
आमच्या श्वासात…
आणि या देशाच्या प्रत्येक सुरात…
सदैव जिवंत राहील…
*भावपूर्ण श्रद्धांजली.*
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212