श्रीधर व्यंकटेश केतकर

(1884 - 1937)

महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचं अवजड -अवघड कार्य केतकरांनी पूर्ण केलं, हे त्यांचं ठळक योगदान म्हणायला हवं. पण याशिवाय केतकर समाजशास्त्रज्ञ, इतिहाससंशोधक आणि कादंबरीकार होते.

इ.स. 1911 साली अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठांची पदवी त्यांनी मिळवली. `द हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया` ही त्याची पदवी त्यांनी मिळवली. `द हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया हा त्यांचा विषय होता. यात या विषयावरचे अनेक मूलभूत विचार त्यांनी मांडले आहेत. भारतीय सर्थशास्त्र आणि कायदा याचाही त्यांचा अभ्यास होता.

1915 साली तेवीस भागांच्या ज्ञानकोशाचं काम त्यांनी हाती घेतलं विशेष आर्थिक पाठबळ नसताना, आणि इतर संशोधकलेखकांची मदत नसतानाही हे मोठं कार्य त्यांनी चौदा वर्षात पूर्ण केलं. या कोशाच्या लिखाणापासून ते छापून घेण्यापर्यंत अनेक अडथळे आले. अखेरीस स्वतचाच छापखाना काढून त्यांनी ज्ञानकोश छापून घेतला. छापखान्यासाठी `लिमिटेड कंपनी`चा अभिनव प्रयोग केतकरांनी केला. या सार्‍या खटाटोपांचं वर्णन `माझे बारा वर्षाचे काम ऊर्फ ज्ञानकोश मंडळांचा इतिहास` यात त्यांनी केलं आहे.

`गोंडवनातील प्रियंवदा`, `ब्राम्हणकन्या` या त्यांच्या काही कादंबर्‍या आहेत. `महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण` यात वाड्गमयीन तर निशस्त्रांचे राजकारण`, `व्हिक्टोरिअस इंडिया` या दोन गंथांत राजकीय मतं प्रगट केली आहेत.

साहित्यातून त्यांनी सुधारणावादी विचार मांडला. त्यांचं वैयक्तिक जीवनही इतर चारचौघांपेक्षा निरांळ होतं. एका जर्मन ज्यू स्त्रीला विधिवत हिंदू धर्मात आणून तिच्याशी केतकरांनी विवाह केला होता. अपत्य नसल्यामुळे दोन अनाथ मुलांनाही सांभाळलं.

कोणतीही अत्याधुनिक साधनं. मदत हाताशी नसताना फक्त चौदा वर्षात ज्ञानकोश पूर्ण करणारे केतकर `ज्ञानकोशकार` म्हणूनच प्रामुख्याने प्रसिध्द आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

(1884 – 1937)

Author