समुद्राने मला एक गोष्ट शिकवली,
काही लाटा जवळ येतात फक्त दूर जाण्यासाठी.
किनाऱ्यावर अलगद स्पर्श करून,
आठवणींचे शिंपले मनात ठेवण्यासाठी.
त्या येतात जणू कायमच्या सोबतीला,
स्वप्नांच्या वाळूत नावे कोरण्यासाठी.
पण भरती ओसरून गेल्यावर कळते,
त्या होत्या फक्त निरोप देण्यासाठी.
समुद्र मात्र शांत उभा असतो,
विरहाचे गूढ अलगद उलगडण्यासाठी.
कारण प्रत्येक भेट ही मुक्काम नसते,
काही नाती असतात फक्त शिकवण देण्यासाठी.
म्हणून आता लाटांवर राग नाही,
त्यांच्या जाण्याची खंतही नाही.
त्या आल्या, मनाला स्पर्शून गेल्या,
आणि मला स्वतःलाच भेटायला शिकवून गेल्या.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
समुद्राने मला एक गोष्ट शिकवली,
काही लाटा जवळ येतात फक्त दूर जाण्यासाठी.
किनाऱ्यावर अलगद स्पर्श करून,
आठवणींचे शिंपले मनात ठेवण्यासाठी.
त्या येतात जणू कायमच्या सोबतीला,
स्वप्नांच्या वाळूत नावे कोरण्यासाठी.
पण भरती ओसरून गेल्यावर कळते,
त्या होत्या फक्त निरोप देण्यासाठी.
समुद्र मात्र शांत उभा असतो,
विरहाचे गूढ अलगद उलगडण्यासाठी.
कारण प्रत्येक भेट ही मुक्काम नसते,
काही नाती असतात फक्त शिकवण देण्यासाठी.
म्हणून आता लाटांवर राग नाही,
त्यांच्या जाण्याची खंतही नाही.
त्या आल्या, मनाला स्पर्शून गेल्या,
आणि मला स्वतःलाच भेटायला शिकवून गेल्या.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Post Views: 2