वंचित वर्गातील मुलांचे शिक्षण तसेच निराधार महिलांच्या उत्थानासाठी पायाभूत स्वरुपाचे कार्य करण्याच्या हेतूने दिवंगत स्वातंत्र्य सेनानी तात्या सरवटे यांनी इंदूरच्या पागनीसपाग्यात सुमारे ६० वर्षांपूर्वी बाल निकेतन संघाची स्थापना केली तेंव्हा त्यांच्या समवेत कन्या शालिनीताई या बिनीच्या शिलेदार होत्या. निव्र्याज सेवेचा वसा वडिलांकडून घेतल्यानंतर तो आजन्म पाळताना शालिनीताईंनी त्याला प्रयोगशिलतेची जोड देऊन समाजहितैषी कामाचा एक मानदंड आखून दिला.
गुरुवारी वयाच्या ९८व्या वर्षी शालिनीताईंचे निधन झाले तेंव्हा प्रत्येक इंदूरकर हळहळला. इंदूर आणि मध्य प्रदेशच्या शाजापूर, झाबुआ येथील आदिवासी व वंचितांसाठी बाल निकेतन संघाच्या माध्यमातून काम करताना ताईंनी मोठा गोतावळा जोडला. एखाद्याला, विशेषत ज्याला कशाचाही आधार नाही, अशा दुर्बलाला उभे करून आत्मनिर्भर करणे हे मानवसेवेचे कार्य ताई शेवटपर्यंत अथकपणे करीत राहिल्या. रोज शिकत राहा, सचोटीने व्यवहार करा अन् गरजूंना मदतीसाठी तत्पर राहा ही साधीसोपी त्रिसूत्री स्व. तात्या सरवटे यांनी आखून दिली होती, ताईंनी ती जीवनभर एखाद्या व्रतासारखी पाळली. वडिलांप्रामाणे बंधू व्ही. व्ही. सरवटे तसेच पती दादासाहेब मोघे यांची त्यांना सक्रिय साथ लाभली. बाल निकेतन संघ स्थापन करण्याचा निर्णय झाल्यानंतर या क्षेत्रातील कामाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी ताई त्याकाळी अलीगडच्या विश्व विद्यालयात दाखल झाल्या. बालशिक्षणाच्या प्रणेत्या मादाम माँटेसरी यांच्याकडे कराचीला जाऊन त्यांनी मार्गदर्शन घेतले. हाती घेतलेल्या कामाला त्यांनी प्रयोगशीलतेची जोड दिली. बाल शिक्षणाच्या मार्गातील अनेक अडचणींचे भान त्यांना आले होते, आणि म्हणूनच याबाबत नेमके काय करावे याची त्याना जाण होती. बालशिक्षणाच्या बरोबरीने पोषण व दुर्बल घटकातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न त्यांनी हाती घेतला. गरीब महिलांच्या रोजगारासाठी त्यांनी विविध प्रकल्प राबविले. लहान मुलांसाठी ‘झुला घर' सुरू करून अनेक भागांत त्यांची साखळी तयार केली. शहरी भागाच्या गरीब वस्त्यांतील आरोग्याचा प्रश्नही आपल्या अंगीभूत कार्यात सामावून घेतला. एकात्मिक विकासासाठी त्यांनी केलेले कार्य अनेक सेवाभावी संस्थांसाठी आर्दशवत ठरले याचे कारण हेच की, या कामासाठी काय काय करावे याबाबतची ताईंची भूमिका स्पष्ट होती व त्याला कृतिशिलतेची जोड होती. शाळा, ग्रंथालये, महिलांसाठी प्रशिक्षण केंद्रे, अनाथालय, वात्सल्यधाम, शैक्षणिक साहित्य बनवण्याची केंद्रे आदी प्रयोग राबवून त्यांनी समाजातील मोठय़ा घटकाला त्यात सामावून घेतले. निरपेक्ष सेवा हाच त्यांचा मूलमंत्र राहिला. बाल निकेतन संघाच्या कार्याने प्रभावीत झालेल्यांत आचार्य विनोबा भावे, पं जवाहरलाल नेहरू, डॉ. राधाकृष्णन, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी आदी अनेक मान्यवरांचा समावेश करावा लागेल. १९६० साली त्यांना पद्मश्री किताबाने गौरवण्यात आले. सेवाभावी संस्थेच्या कार्याचा वस्तूपाठ घालून देणाऱ्या ताई शेवटपर्यंत निगर्वी राहिल्या. त्यांचे व्यक्तिमत्वच इतके आश्वासक अन् प्रेमळ होते की त्यांच्या केवळ दर्शनानेही अनेकजण आश्वस्थ होत असत. त्यांच्या निधनाने एका सेवाव्रतीला आपण मुकलो आहेत.
वंचित वर्गातील मुलांचे शिक्षण तसेच निराधार महिलांच्या उत्थानासाठी पायाभूत स्वरुपाचे कार्य करण्याच्या हेतूने दिवंगत स्वातंत्र्य सेनानी तात्या सरवटे यांनी इंदूरच्या पागनीसपाग्यात सुमारे ६० वर्षांपूर्वी बाल निकेतन संघाची स्थापना केली तेंव्हा त्यांच्या समवेत कन्या शालिनीताई या बिनीच्या शिलेदार होत्या. निव्र्याज सेवेचा वसा वडिलांकडून घेतल्यानंतर तो आजन्म पाळताना शालिनीताईंनी त्याला प्रयोगशिलतेची जोड देऊन समाजहितैषी कामाचा एक मानदंड आखून दिला.
गुरुवारी वयाच्या ९८व्या वर्षी शालिनीताईंचे निधन झाले तेंव्हा प्रत्येक इंदूरकर हळहळला. इंदूर आणि मध्य प्रदेशच्या शाजापूर, झाबुआ येथील आदिवासी व वंचितांसाठी बाल निकेतन संघाच्या माध्यमातून काम करताना ताईंनी मोठा गोतावळा जोडला. एखाद्याला, विशेषत ज्याला कशाचाही आधार नाही, अशा दुर्बलाला उभे करून आत्मनिर्भर करणे हे मानवसेवेचे कार्य ताई शेवटपर्यंत अथकपणे करीत राहिल्या. रोज शिकत राहा, सचोटीने व्यवहार करा अन् गरजूंना मदतीसाठी तत्पर राहा ही साधीसोपी त्रिसूत्री स्व. तात्या सरवटे यांनी आखून दिली होती, ताईंनी ती जीवनभर एखाद्या व्रतासारखी पाळली. वडिलांप्रामाणे बंधू व्ही. व्ही. सरवटे तसेच पती दादासाहेब मोघे यांची त्यांना सक्रिय साथ लाभली. बाल निकेतन संघ स्थापन करण्याचा निर्णय झाल्यानंतर या क्षेत्रातील कामाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी ताई त्याकाळी अलीगडच्या विश्व विद्यालयात दाखल झाल्या. बालशिक्षणाच्या प्रणेत्या मादाम माँटेसरी यांच्याकडे कराचीला जाऊन त्यांनी मार्गदर्शन घेतले. हाती घेतलेल्या कामाला त्यांनी प्रयोगशीलतेची जोड दिली. बाल शिक्षणाच्या मार्गातील अनेक अडचणींचे भान त्यांना आले होते, आणि म्हणूनच याबाबत नेमके काय करावे याची त्याना जाण होती. बालशिक्षणाच्या बरोबरीने पोषण व दुर्बल घटकातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न त्यांनी हाती घेतला. गरीब महिलांच्या रोजगारासाठी त्यांनी विविध प्रकल्प राबविले. लहान मुलांसाठी ‘झुला घर’ सुरू करून अनेक भागांत त्यांची साखळी तयार केली. शहरी भागाच्या गरीब वस्त्यांतील आरोग्याचा प्रश्नही आपल्या अंगीभूत कार्यात सामावून घेतला. एकात्मिक विकासासाठी त्यांनी केलेले कार्य अनेक सेवाभावी संस्थांसाठी आर्दशवत ठरले याचे कारण हेच की, या कामासाठी काय काय करावे याबाबतची ताईंची भूमिका स्पष्ट होती व त्याला कृतिशिलतेची जोड होती. शाळा, ग्रंथालये, महिलांसाठी प्रशिक्षण केंद्रे, अनाथालय, वात्सल्यधाम, शैक्षणिक साहित्य बनवण्याची केंद्रे आदी प्रयोग राबवून त्यांनी समाजातील मोठय़ा घटकाला त्यात सामावून घेतले. निरपेक्ष सेवा हाच त्यांचा मूलमंत्र राहिला. बाल निकेतन संघाच्या कार्याने प्रभावीत झालेल्यांत आचार्य विनोबा भावे, पं जवाहरलाल नेहरू, डॉ. राधाकृष्णन, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी आदी अनेक मान्यवरांचा समावेश करावा लागेल. १९६० साली त्यांना पद्मश्री किताबाने गौरवण्यात आले. सेवाभावी संस्थेच्या कार्याचा वस्तूपाठ घालून देणाऱ्या ताई शेवटपर्यंत निगर्वी राहिल्या. त्यांचे व्यक्तिमत्वच इतके आश्वासक अन् प्रेमळ होते की त्यांच्या केवळ दर्शनानेही अनेकजण आश्वस्थ होत असत. त्यांच्या निधनाने एका सेवाव्रतीला आपण मुकलो आहेत.