पर्याय म्हणून जर माझं नाव असेल,
तर माझं नसणंच जास्त खरं ठरेल.
गरज लागली की आठवण येणं,
याला प्रेम म्हणायचं धाडस नको.
तुझ्या वेळेच्या उरलेल्या क्षणात,
मी बसवलेली सोय नको.
कोणीच नसलं की आठवण येणं,
याला आपुलकीचं नाव नको.
अर्धवट हक्क, अपुरी माया,
यांनी नाती जगत नाहीत.
मी पूर्ण देतो, पूर्ण मागतो,
मधली तडजोड मला जमत नाही.
जिथे मी पहिला नाही,
तिथे मी उभाच राहत नाही.
कारण पर्याय म्हणून जगलेलं नातं,
शेवटी स्वतःशीच दगा देतं.
पर्याय म्हणून माझी निवड असेल,
तर तो अध्याय तिथेच संपलेला बरा.
आता मी थांबतो इथेच,
कारण पुढे जाण्यासारखं काही उरलेलं नाही.
नात्याला नाव न देता,
मी इथेच शून्य होतो.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
पर्याय म्हणून जर माझं नाव असेल,
तर माझं नसणंच जास्त खरं ठरेल.
गरज लागली की आठवण येणं,
याला प्रेम म्हणायचं धाडस नको.
तुझ्या वेळेच्या उरलेल्या क्षणात,
मी बसवलेली सोय नको.
कोणीच नसलं की आठवण येणं,
याला आपुलकीचं नाव नको.
अर्धवट हक्क, अपुरी माया,
यांनी नाती जगत नाहीत.
मी पूर्ण देतो, पूर्ण मागतो,
मधली तडजोड मला जमत नाही.
जिथे मी पहिला नाही,
तिथे मी उभाच राहत नाही.
कारण पर्याय म्हणून जगलेलं नातं,
शेवटी स्वतःशीच दगा देतं.
पर्याय म्हणून माझी निवड असेल,
तर तो अध्याय तिथेच संपलेला बरा.
आता मी थांबतो इथेच,
कारण पुढे जाण्यासारखं काही उरलेलं नाही.
नात्याला नाव न देता,
मी इथेच शून्य होतो.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
Post Views: 1