पर्यावरणीय हायकू

आला मान्सून, मान्सून आला
सज्ज-सज्ज स्वागताला
तुंबलेला नालान् नाला.

कचरा-डोंगर
गटार-सागर
अशक्य उल्लंघन हनुमंताही.

रामानें शिवधनू भंगलें.
पण, त्याआधीं प्रदूषणानें
अर्धवट होतें खाल्लें.

त्रिशंकू आहे आजचा माणूस.
प्रदूषणाला स्वीकारत नाहीं
अन् मारतही नाहीं.

विश्वामित्राची प्रतिसृष्टी
कुठे आहे, शोधूंया चला.
पण सावध! तिथेंही प्रदूषण असेल!

व्यास रचणार कसें हें महाभारत ?
गणपती लिहिणार कसा ?
हा प्रदूषण-विजय नामक इतिहास आहे.

सुभाष स. नाईक



आला मान्सून, मान्सून आला
सज्ज-सज्ज स्वागताला
तुंबलेला नालान् नाला.

कचरा-डोंगर
गटार-सागर
अशक्य उल्लंघन हनुमंताही.

रामानें शिवधनू भंगलें.
पण, त्याआधीं प्रदूषणानें
अर्धवट होतें खाल्लें.

त्रिशंकू आहे आजचा माणूस.
प्रदूषणाला स्वीकारत नाहीं
अन् मारतही नाहीं.

विश्वामित्राची प्रतिसृष्टी
कुठे आहे, शोधूंया चला.
पण सावध! तिथेंही प्रदूषण असेल!

व्यास रचणार कसें हें महाभारत ?
गणपती लिहिणार कसा ?
हा प्रदूषण-विजय नामक इतिहास आहे.

सुभाष स. नाईक

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →